Literature

आत्मज्ञानाची बाह्य फलश्रुति

न पश्यो मृत्युं पश्यति न रोगं नोत दुःखता सर्व पश्यः पश्यति सर्वमाप्नोति सर्वशः ॥ ( छां. ७-२६-२) आत्मदृष्टि असणारा मृत्यु पावत नाहीं. त्याला रोग उत्पन्न होत नाहीत. तो दुःखहि अनुभत्रित नाही. सर्वच व्यापून राहिलेले आपले एक आनंदधन स्वरूपच तो पाहातो नी तद्रूप असतो. असल्याच ठिकाणी असून सत्य अशा आनंदघनरूपाने तो सर्व व्यापून टाकतो. विस्ताराची कल्पना आणून दिलेल्या या शेलक्या वाक्यांच्या उदाहरणा वरून श्रुतीचे हृदय व्यक्त होते, तिचे महत्त्व जाणवते. श्रुतीने जीवांवर केलेला उपकार लक्षांत येतो. श्रुतिवचनाच्या पालनानें पूर्वऋषीना बाणलेले ऐश्वर्य डोळ्यापुढे उभे राहातें, आमची आशा अंकुरते, मोक्षसाधनाच्या अनुष्ठानानें लागणाऱ्या निरतिशय आनंदाची कल्पना येते. उन्नत आणि सारभूत व्यावहारिक जीवनांतून निरवधि आत्मीय आनंदाचे दिव्य आयुष्य प्राप्त करून घेण्यास श्रुति शिकविते. याच्यापुढे दिलेला साधनक्रम तसाच डावलून पुढे जाण्यास मन तयार होत नाही. त्यांत तथ्य आहे. आहारशुद्धौ सत्वशुद्धिः सत्वशुद्धौ ध्रुवा स्मृतिः स्मृतिलभ्भे सर्वग्रंथीनां विप्रमोक्षः || – मोक्षाच्या हेतूनें सात्विक आणि सुसंस्कृत अशा अन्नादि जीवनोपयोगी पदार्थांच्या सेवनानें अंतःकरणाची शुद्धि होते आणि विषयां कडचा मनाचा ओढा नष्ट झाला की स्वरूपाचे आवरण नष्ट होऊन आत्म रूपाची स्मृति अचल आणि सुदृढ होते. अशी ब्रह्मैक्यस्मृति सदा टिकून राहिली म्हणजे देहात्मबुद्धि व बहिर्मुग्ववृत्ति राहातच नाहीं. असा या मंत्राचा अर्थ आहे. श्रुतीचें हें मार्गदर्शन आपण लक्षांत ठेवून बागाबयाला पाहिजे.

home-last-sec-img