Literature

आत्मनिष्ठांचे आत्मगीत

वेदाहमेतं पुरुषं महान्तम् । आदित्यवर्ण तमसः परस्तात् ।। तमेवं विदित्वाऽतिमृत्यमेति ‘नान्यः पन्था विद्यतेऽयनाय ।। ( श्वेताश्वेतर उ.३-८)

-अंधाराच्या कोठडीतून बाहेर निघून जसें अपार तेजाच्या सूर्याचं दर्शन घ्यावें, त्याच्या तेजांत वावरावें त्याचप्रमाणे तमाने भरलेल्या या चराचर विश्वाच्या बाहेर येऊन त्या स्वप्रकाश परमात्म्याचे दर्शन घेतले. त्या स्वयंप्रकाशांत मी आहे. सूर्याप्रमाणे स्वयंप्रकाशानें प्रकाशित असलेले स्वरूप मी बघितलें, ते महान पुरुषस्वरूप मी ओळखलें, तें मी चांगले जाणतों. आपल्या ज्ञानमात्रतेनें, केवल आनंदघनतेनें व केवल स्वयंप्रकाशानें जें सदा प्रकाशत असते, ते परमात्मतत्त्वच मी असा माझा निश्चय झाला आहे. त्या परमात्मस्वरूपाला जाणूनच मर्त्य अमर होतो. परमात्मस्वरूपाच्या ज्ञानाशिवाय भवसिंधु असा दुसरा कोणताहि मार्ग नाही.

तमो हि शारीरप्रपंचमाब्रह्मस्थावरान्तमनन्ताखिलजांड भूतम् । निखिलनिगमोदितसकामकर्मव्यवहारोलोकः । नैषोऽन्धकारोऽयमात्मा |

–तम म्हणजे सर्व शारीरिक प्रपंच, आब्रह्मस्थावरान्त अखिल ब्रह्मांडगोल, वैदिक सकाम कर्म करणारे लोक. हा अंधःकार कांही आत्मा नव्हे. सहस्र भानुमत्तच्छुरितापूरि तत्वादलिप्यापारावारपूर इव । नैषा समाधिः नैषा योगसिद्धिः । नैषा मनोलयः ब्रह्मैक्यं तत् ॥ ( महावाक्योपनिषत् ) हा मंत्र वाचतांना दिवि सूर्यसहस्रस्य भवेद्युगपदुत्थिता । यदि भाः सदृशी सा स्याद्भासस्तस्य महात्मनः । ( भ.गी. ११-१२) हा गीतेचा श्लोक आठवतो. हजारों सूर्याची एकवटलेली प्रभा, त्यांतील तापदायक तीक्ष्णता काढून टाकल्यास जे तिचें अति मृदु, अति सुंदर, सुशांत, आनंदधन रूप शिल्लक राहील तें अपार चिद्रूपच परमात्मरूप होय. आर्द्र ज्वलति ज्योति रहमस्मि । ज्योतिर्ज्वलति ब्रह्माइमस्मि । योऽहमस्मि । ब्रह्माइमस्मि । अहमस्मि ब्रह्माहमस्मि । अहमेवाइं मां जुद्दोमि स्वाहा ॥ ( महा ना. उ. १५) या मंत्रांतहि “ आर्द्र ज्वलति ज्योतिरद्दमस्मि । ” असा उल्लेख आहे. तस्माच्छुकं तेजोमयं ब्रह्मेति सिद्धम् । ( अद्वयतारक उ.) हा आत्मप्रकाश या सामान्य चक्षूंना गोचर होण्यासारखा नाही, हे “दिव्यं ददामि ते चक्षुः।” या त्रिलोकी गुरु भगवंताच्या वाक्यावरून स्पष्ट होतें. सद्गुरुपरमात्मानु गृहीत मनःशक्तीनें व चक्षुरिंद्रियाने याचा साक्षात्कार होतो. श्रीसमर्थांचे वाक्यहि इथे आठवलें : “ सद्गुरुकृपा होय त्यासी । जो शोधी आपणासी । पुढे कळे अनुभवासी । आपेआप वस्तु । दा. बो. ६-१०-११ ॥ सद्गुरु कृपा तेचि किली । जेणें बुद्धि प्रकाशली। द्वैतकपाटें उघडली । एकसरी ।।

७-२-१५ ।। तेथें । सुख साधनाचा ॥१२॥ ” असें वाड । नाहीं मनासी पवाड मनेंत्रीण कैवाड ।

इहैव सन्तोऽथ विद्मस्तद्वयं न चेदवेदीर्महती विनाष्टी: । ये तद्विदुर मृतास्ते भवन्त्यथेतरे दुःखमेवापियान्ति ॥ (बृ. ४-४-१४)– इथेच या लोकांत राहून या देहांत ते परमात्मस्वरूप आपण जाणू या. ते परमात्मतत्त्व आपणच आहों, असे जर या लोकांतच या देहांतच जाणले नाही तर मोठ्या भयंकर आपतला आम्हांला पुढे बळी पडावे लागेल. त्या योगानें आपले अत्यंत अनहित होईल, कल्पनातीत दुःख भोगावे लागेल. आपले स्वरूप जे जाणतात ते अमर होतात. इतर मात्र केवळ दुःखाचीच प्राप्ति करून घेतात. आत्मज्ञान होईपर्यंत कोणालाहि दुःख चुकतच नाहीं.

अहं वृक्षस्य रेरिव । कीर्तिपृष्ठं गिरेरिव । ऊर्ध्वपवित्रो वाजिनीव स्वमृतमस्मि द्रविण सवर्चसं सुमेधा अमृतोक्षितः इति त्रिशंकोर्वेदानु वचनम् ॥ ( तैत्तरीय उ. ) नाशिवंत अशा या सर्व संसारवृक्षाचा अत्रि नाशी असा मीच एक आदि आहे, त्याचे सत्य कारण आहे. अधिष्टानरूपानें व चुंबक लोहवत् सत्तामात्र तेनें मी त्याचा प्रेरक आहे, साक्षी आहे. माझी कीर्तिहि मेरुपर्वताच्या शिखराप्रमाणे अति उन्नत आहे. ऊर्ध्वमूलोऽवाक् शाखाः । या संसारवृक्षाच्यावर जें याचें पवित्र मूळ आहे म्हणून श्रुति सांगते तें ब्रह्मच मी आहें. देहाच्या ऊभागी असलेल्या मस्तकांतील ब्रह्म रंभ्रांत जें ब्रह्म निहित आहे तेंच मी. यश्चायं पुरुषे यश्चासावादित्ये स एकः । —या देहांत आणि त्या सूर्यमंडलांत असणारा आत्मा एकच आहे. सूर्य जसा अमृतस्वरूपी व पवित्र आत्मरूपी आहे त्याप्रमाणेच मीसुद्धां अमृतस्वरूपी ब पवित्र आत्मरूपी आहें. अनेक साधनांनीं, मुख्यतः अध्यात्मश्रणाने मिळवि लेल्या स्वयंप्रकाश आत्मसुखाची ती दिव्य संपत्तीच मी आहे. मी सच्चिदानंद अशा या स्वरूपलक्षणानें अखंड जशाचा तसाच असतो. या सर्वांचा साक्षी सदाच तटस्थ राहून सत्तामात्रे जगत्सृष्टिस्थितिलयकार्ये करतों. सदाच असंग राहण्याचे व अद्वितीय राहण्याचें माझें बुद्धिकौशल्य असम व अवर्णनीय आहे. मला विकार आणि मरण ह्रीं कधीं होतच नाहीत. मी म्हणजे अमृताची केवळ ओतीव मूर्तीच आहे. आत्मस्वरूपाचा साक्षात्कार झाल्यानंतर त्रिशंकूच्या वाणींतून सहज उमटलेले हे अमृतोद्गार आहेत. हृदयाचा बांध फोडून, भेदाचा ठाव पुसून, लौकिकाचा दाब उडवून, अंतरंगांतून उचंबळून वर उसळी घेणार

अनंत आत्मानंदाचा हा उद्रेक आहे. त्रिलोक पावन करणारा, अखिल देव दानव-मानव जातीसच साबध करणारा, अखिल विश्वासच भारून टाकणारा त्रिशंकूच्या आत्मानंदाचा हा परमपवित्र गंगाप्रबाह होय. 

स यो ह वै तदच्छायमशरीरमलोहितं शुभ्रमक्षरं वेदयते यस्तु सोम्य स सर्वज्ञः सर्वो भवति ॥ जो विरक्त तें अज्ञानशून्य, निरावृत, स्वरूपचिन्मात्र व निर्गुण, निराकार असे अति परिशुद्ध अविनाशी आत्मस्वरूप जाणतो तो स्वरूप व सर्वज्ञ होतो.

हा ३ वुहा ३ वुहा ३ वु || अहमन्नमहमन्नमहमन्नम् अहमश्नादोऽ ३  अहमन्नादोऽहमन्नादः ॥ अलोकदह लोकदह लोककृत ॥ अहमस्मि प्रथमजाऋता ३ स्य। पूर्व देवेभ्योऽमृतस्यना ३ भायि । यो मा ददाति स इंदेव माऽ ३ वः । अहमन्नमन्नमदन्तमा ३ द्मि। अहं विश्वं भुवनमभ्यवाम् । सुवर्णज्योतीः || य एवं वेद ॥ ( तै. भृगु व. १० ) “ हा ३ बुहा ३ वुहा ३ वु । ” हे तीन शब्द आश्चर्यदर्शक आहेत. आनंदाच्या उद्रेकानें वर उसळून आलेले स्वैर आलाप आहेत. तें आनंदरूप ब्रह्मच मी. “ आनंदेन जातानि जीवन्ति ।” म्हटल्याप्रमाणे माझ्या आनंदा मुळेच सर्वांचे जीवन चालते. मी आत्मानंदरूपाचे दिव्य अन्न आहे. कळ जांबांचे जीवन असणारा आत्मानंदच मी आहे. ज्याच्या सत्तेनें जग अस्तित्वांत आहे, ज्याच्या ज्ञानरूपतेने ज्ञानसंपन्न आहे, ज्याच्या सुखानें सुखी आहे तेच मी सकळ जगजीवांचे मूळ रूप व त्यामुळेच मी सर्वांचे जीवन अन्न आहे.

को ह्येवान्यात्कः प्राण्यात् । यदेषआकाशो न स्यात् ॥ – या विश्वाच्या अंतर्बाह्य भरून सर्वत्र भरगच्च कोंदाटलेला हा अद्वितीय आत्मानंद नसेल तर अन्य कोणत्या आनंदाने प्राणी जगू शकतात! स्वरूपानंदच सर्व प्राणिमात्रांचें जीवन आहे. तेच खरेखुरे अन्न आहे. स्वरूपाहून अन्य असे आपल्यांत कांहींच असू शकत नाही. अहमेवाहं मां जुहोमि । असाच व्यवहार चालतो. स्वस्वरूपं स्वयं भुंक्ते नास्ति भोज्यं पृथक् खलु | वेवळ आनंदमात्र स्वरूपांत आनंदच स्वयं अन्न व अन्नादहि पण होतो. माझेच स्वरूप मी अनुभवितो म्हणणे काय व माँच अन्न व अन्नाद आहे म्हणणे काय दोन्ही एकच अन्न व अन्न सेवन करणाऱ्याच्या अन्नादाच्या) रूपांनी एक आनंदघन स्वरूपच आहे. म्हणजेच अखिल अन्न व अन्नादांच्यारूपाने स्वरूपच एक आहे. मीच अखिल अन्न व अन्नादरूपाने आहे. मीच अन्न व अखिल अन्नादांना निर्माण केले, म्हणणे म्हणजे स्वमात्र मीच एक आहे असे म्हणणे आहे. माझ्या अद्वितीय निरतिशय आनंदाचे अतिशय महत्व आहे. तेच एक सर्वाधिक सर्वोत्कृष्ट आहे. सर्वाधिक सर्वोत्कृष्टतेने ते अन्यनिरपेक्ष असणे स्वा भाविक झाले. असे हे स्वरूप स्वतः पूर्ण स्वमात्र असल्यामुळे आनंदमानतेत झालेले होणारे व आता असलेले सर्व मीच आहे. सर्व कर्माध्यक्ष, सर्व कर्मफलदाता, सर्वव्यापि, सर्व विश्वाधिपति, सर्वादि हिरण्यगर्भहि माँच आहे.

सर्व देवदेवतांच्या पूर्वी उत्पन्न झालेला विराटहि पण मीच आहे. विष्णु तसा ब्रह्मदेवहि पण मीच आहे. सर्व सत्कीर्ति माझीच आहे. सर्व सत्कतिला मीच कारण आहे. अखिल सत्कर्म व त्यांना कर्ता करविताहि मीच आहे. जीवांच्या मोक्षाला कारणीभूत होणारे अखिल मोक्षोपाय व मोक्षपाणी सद्गुरुहि मीच आहे. मीच अमृतत्वाची नाभि म्हणजे कारण आहे. वर्तुलांतल्या मध्यबिंदु प्रमाणे शरीरांतल्या नाभीप्रमाणे अथवा चक्राच्या मध्यवर्ति गघाप्रमाणे सर्व विश्वाचे मी धारण करतो. शरीरांतल्या नाड्यांप्रमाणे ” अमृतस्य नाभिः । ” नाभीरूप असलेल्या माझ्यापासूनच सर्व जगाचे सारे जीवनोपाय उत्पन्न होतात. चक्राच्या अरा जशा चक्राच्या मध्यभागी असणाऱ्या त्याच्या नाभीत एकत्रित होतात, त्याप्रमाणे जीवनाचा कल जीवप्रीत्यर्थ जीवनाधार मोक्ष रूप असणान्या माझ्यांत म्हणजे आपल्या आत्मानंदरूपांत एकत्रित होतात. शरीराच्या जीवनक्रमांत नाभीपासूनच सर्व नाड्यांना अन्नरस जाऊन पोहोचतो; त्याप्रमाणेच सर्वात्मरूप अशा माझ्यापासूनच जगातल्या आखिल जीवांना जीवन मिळते, आत्मानंदाचा लाभ होतो व आत्म्याप्तीच्या साधनांचा प्रचार आणि प्रसार केला जातो. मोक्ष, मोक्षाची साधने, मोक्षाचे कारण व मुक्तहि मीच आहे. जग, जगाचे जीवन अन्न व जगून असणारा अन्नाद इत्यादि सर्व मीच आहे. अन्नदाता, अन्नभोक्ता व अन्नहि मीच आहे. अद्वितीय आत्मानंदच या सर्वांचे स्वरूप आहे. जो आलेल्या मुमुक्षला आत्मज्ञान देतो अथवा आलेल्या बुभुक्षूला अन्न देतो तो आपले, माझे व दुसऱ्याचे रक्षण करतो आणि स्वतः जिवंत राहातो. दुसरा म्हणून इथे कोणी नसल्यामुळे अन्नाभावाने कोणालाहि झालेल्या कष्टाचा व कोणाच्याहि झालेल्या प्राणहानीचा संबंध आपल्यालाच लागतो. अन्न-जीवन व जिवंत असणारा मीच एक आहे. जो अन्नरूप अशा मला दुसऱ्याला न देता, याचकांना तृप्त न करता आपण यथेष्ट अन्न सेवन करतो तो आपणच आपला मृत्यु ओढवून घेतो. दुसऱ्याला अन्नाभात्रौँ झालेले कष्ट ते याचेच कष्ट आहेत. तशीच दुसऱ्याची झालेली प्राणहानी पण याचांच प्राणहानी आहे. दुसऱ्याला जीवनाचा लाभ न होता आलेलें मरण म्हणजे आपल्यालाच आपल्यापासून जीवनाचा लाभ न होता आपणच मरण पावणे होय. दुसऱ्याला न देतां जो स्वतः मात्र अन्न सेवन करतो त्याला ते अन्नच खाऊन टाकते. तो स्वतःचा नाश स्वतःच करून घेतो म्हणणें काय किंवा त्या अन्नरूपानें मीच त्याचे भक्षण करतो म्हणणे काय सारखेच आहे. स्वरूपाच्या ठिकाणी अन्य काय आहे ! विराट् अथवा ब्रह्मदेवाच्या रूपानें जगाची उत्पत्ति, हिरण्यगर्भ अथवा विष्णूच्या रूपाने जगाचे पालन व ईश्वर अथवा रुद्ररूपाने जगाचा उपसंहार मीच करतो. मी या आत्मीय भावनेत सर्वांची प्रतीति येत असल्यामुळे, ती आखिल प्रतीति, तो यच्चयावत् अनुभव आत्मीय भानांतच आहे. आत्मीय म्हणजे आपल्या भागांत आपण एक असणारा. या दृष्टीने सर्व काही आपणच आहों. मीच एक आहे. सूर्याच्या प्रकाशाप्रमाणे केवळ एकच एक होऊन, हें आत्मीय ज्ञान, हा आत्म प्रकाश सर्व रूपानें चोहीकडे भरगच्च भरून आहे. त्याहून त्यांत अन्य असें आजपर्यंत कांही उत्पन्न झालें नाहीं व पुढेहि कांहीं होणे शक्य नाहीं. अनंत आनंदाचा अद्वितीय महोदधीच मी आहे. त्रिशंकूनें गाइलेल्या आत्म गीताप्रमाणेच हे मृगूनें गाइलेलें आत्मगीत आहे. वामदेवः प्रतिपेदेऽहमनुरभव सूर्यश्चेति ।- मीच मनु, मीच सूर्य इत्यादि उद्गारांनी वामदेवानेंहि आपला सर्वात्मभाव प्रगटविला आहे. (बृ. १-४-१०) वेनस्तत्पश्यन्विश्वा भुष नानि विद्वान्यत्र विश्वं भवत्येकनीडम् । यस्मिन्निद संचविचति सर्व स ओतः प्रोतश्च विभुः प्रजासु प्रतद्वोचे अमृतं नु विद्वान् गंधर्वो नाम निहितं गुहासु ॥ ( म. ना. उ. ३) ज्या ठिकाणी हे समग्र विश्व केंद्रिभूत आहे, ज्याच्यांतच विश्वाच्या साऱ्या घडामोडी होतात, जें या चराचर विश्वांतून ओत प्रोत भरून आहे, जे सर्वांच्या हृदयांतून सांठविलेलें आहे त्या अमृतआत्म रूपाचा साक्षात्कार करून घेऊन विद्वान वेन गंधर्वानें तें सर्वांना सांगितले.

home-last-sec-img