Literature

आदर्श ब्रह्मचर्य

विद्यार्जनाचा ब्रह्मचर्याश्रम फार महत्वाचा आहे. पुढच्या सर्व सुखांचा सीयांचा इथेच सांठा करावयाचा असतो. उत्कृष्ट पायावरच्या इमारतीप्रमाणे अस्खलित ब्रह्मचर्याच्या पायावर आयुष्याची उभारलेली इमारत अधिक दिवस टिकते. ब्रह्मचाऱ्याला शासकारांनी घालून दिलेले नियम पाहू वर्जयेन्मधु मांस च गन्धं माल्यं रसान स्त्रियःशुक्लानि यानि सर्वाणि प्राणिनां चैव हिंसनम् । (मनु. २|१७७ ) मध, मांस खाऊं नयेत. गंधाची उटी, पुष्पमाळा सुगंधी द्रव्यें बर्जावीत. गुळ आदि उष्ण पदार्थ, कांदा, लसूण आदि उत्तेजक पदार्थ, चटकदार पदार्थ, तळलेले पदार्थ खाऊ नयेत. चहा, कॉफी आदि उष्ण पेये त्यजावीत. हॉटेलांतील जिन्नस, खाणावळीचे जेवण सर्वच हें ब्रह्मचर्यपालनाला विरुद्ध आहे. अचकट विचकट सिनेमा, अचकट विचकट भाषण, चेष्टा, विनोद, मस्करी हें कांहीहि असू नये. कामोद्दीपक आहार, विहार, संभाषण, साहचर्य या सर्वांचा ब्रह्मचाऱ्याने त्याग करावा. स्त्रीयांच्या ठिकाणी केवळ मातृदृष्टी ठेवावी. आबालवृद्ध स्त्रियांना मातृवर्ग म्हणून आदरानें व पूज्यतेने वागवावें. शिळे, कुजलेले, आंबवलेले पदार्थ खाऊं नयेत. कठोर आचरणानें व कठोर भाषणानें कुणाचीहि वृत्ति दुखवू नये. हिंसा करूं नये. अभ्यंगमंजन चाक्ष्णो रूपानच्छत्रधारणम् । कामं क्रोधं च लोभं च नर्तनं गीतवादनम् ॥ १७८ ।। ब्रह्मचार्याने साध्य झाल्यास थंड पाण्याने स्नान करावें. रोज तेल लावून ऊन पाण्याचे स्नान करू नये. अंजन, काजळ घालं वगैरे नये. पादुका, जोडे, बूट इत्यादि, छत्री आदि अनावश्यक असल्यास वापरूं नयेत. प्रकृतीवर परिणाम न होईल असें देशकाळ बघून वागावें. काम, क्रोध, लोभ, नाच, गायन, तमाशा, छानछोक यांच्या भरीस पडूं नये. द्यूतं च जनवादं च परिवाई तथानृतम्स्त्रीणां प्रेक्षणालम्भमुपधातं परस्य च || १७९|| पैसे लावून खेळणें, निरर्थक वितंडवाद घालणे, उगीच भांडत बसणे, चिणचिण करणें, तुसडे पणाने वागणे, दुसऱ्यांना बोल ठेवणे, निंदा करणें, खोटें बोलणें, कामदृष्टीनें कुमारिका व स्त्रिया यांकडे बघणें, हास्यविनोद करणें, एकांती लोकांती चाहाटळपणानें भाषण करणें, स्त्रियांच्या कानाजवळ जाऊन बोलणे, त्यांच्या बरोबर पोहणे, खेळणे, फिरावयाला जाणे, नाटक-सिनेमाला जाणे, मनांत त्यांची मूर्ति आठविणे, त्यांना स्पर्श करणें, आलिंगन देणें’ इत्यादि तर कार्यनमनसापि ब्रह्मचाऱ्याच्या ठिकाणी नसावीत. कोणालाह अपकार करूं नये. एकः शयीत सर्वत्र न रेतः स्कंदयेत्क्वचित् । कामाद्धि स्कंदयन्रेतो हिनस्ति व्रतमात्मनः ॥ २८० ॥ पलंगावर न झोंपतां खालीं घोंगडीवर, चटईवर झोपावें. मुत्रस्थानाला स्पर्शच करूं नये.

रेलोधारण हे जीवन आहे. रेत बाहेर येईल अशी कोणतीहि क्रिया ब्रह्मचाऱ्यानें करूं नये. तसे केल्यास ब्रह्मचर्यव्रतच नष्ट होतें. बीर्याचा एक थेंब शुद्ध रक्ताच्या ४० थेंबांबरोबर असतो. एका वेळच्या वीर्यपातानें दीड ते दोन तोळे वीर्य म्हणजे पक्कथा एक शेर रक्ताचा नाश झाल्यासारखे होतें. याच दृष्टीनें ब्रह्मचर्य हेच जीवन, वीर्यनाश हाच मृत्यु’ असे म्हटलें जातें. स्वप्ने सिक्त्वा ब्रह्मचारी द्विजः शुक्रमकामतः । स्नात्वार्कमचियित्वा त्रिः पुनर्मामित्यूचं जपेत् ॥ —–कसलीच भावना नसतां अकस्मात स्वप्नांत रंतस्खलन झालें तर स्नान करून उपास्य देवतेचें, सूर्याचें पूजन करून, ब्राह्मण असल्यास ‘ पुनर्मामैत्विंद्रियम् ‘ ( आव. तृ. ३-६) हा मंत्र तीन वेळ म्हणावा. इतरांनी ‘ भीमरूपी’ म्हणाची अथवा ‘हनुमान चालिसा’ म्हणावी.

स्वभाव एष नारीणां नराणाभिह दृषणम । अतोऽर्थान्न प्रमाद्यन्ति प्रमंदासु विपश्चितः ।। ( मनु. २ | २१३ ) स्त्रियांचा प्रभाव नव्हे स्वभावच तो. त्यांचे बोलणे, चालणे, उभे राहणे, अंगचेष्टा सारेंच स्वाभाविकपणेंच शृंगार प्रधान असते. देहस्वभावच त्यांचा तो असतो. त्या मुद्दाम करतात असे नाहीं, पण त्याने अजितेंद्रिय, अनिग्रही मनाच्या मनुष्याच्या कामवृत्ति अकस्मात् जागृत होतात. इंद्रियांचा विकार घडतो हे जाणून होतां होईल तो बहिण आदिकांडून वेगळ्या मुलींच्या स्त्रियांच्या सहवासांत राहणे, बोलणें, प्रेम करणे इत्यादि अनावश्यक गोष्टींचा त्याग करावा. पुढच्या सूचनेचा सर्वांनींच विचार करावा. अविद्वांसमलं लोके विद्वांसमपि वा पुनः । प्रमदा हनुत्पथं नेतुं कामक्रोध वशानुगम् ।। (मनु. २ २१४) – अशी सूचना अनेक शास्त्रकारांनी दिली आहे. मी जितेंद्रिय आहे, ज्ञानी आहे म्हणून कोणी विषांची परीक्षा पाहावयाला जाऊं नये, अग्नींशीं खेळूं नये, अतिक्रम करूं नये, बुध्या विनाकारण स्त्रियांशीं अधिक लगट करूं नये. त्यांच्या सान्निध्यांत अधिक वेळ असू नये. विद्वान म्हणून गणलेल्यालाहि ती मोहवश करून विकार उत्पन्न करते तर अविद्वानांची कथाच काय ! स्वाभाविक देहस्वभावामुळे कामवश झालेल्या अविद्वानांना आणि विद्वानांनाहि स्त्रियांचे सान्निध्य कामविकार उत्पन्न करून कुमार्गी प्रवृत्त करतें. शास्त्रकारांनी असे कुठेच कांहीं होऊं नये म्हणून थोडे पुढे जाऊन, वाइटाला संपूर्ण आळा पडावा म्हणून इतकेंहि सांगून टाकले आहे कीं, मात्रा स्वस्त्रा दुहित्रा वा न विविक्तासनो भवेत् । बलवानिंद्रियग्रामो विद्वांसमपि कर्षति ।। २१५ ।। सख्ख्या नात्याच्या मंडळीशीं अतिप्रसंग होणार नाही म्हणूनः गृहीत धरून तरुण सावत्र आई, सावत्र, चुलत व मावस बहीण. भावाची मुलगी इत्यादिकांबरोबर एकांती अधिक वेळ बंसू, नये. सख्ख्या संबंधाशीहि अति लगट करूं नये अशा ‘अती ‘नेहि निंदा तरी होऊं लाग तेच. शास्त्राच्या नियमानें वागावें म्हणून कितीहि आग्रह धरलेल्या माणसांना सुद्धा हा उद्दाम इंद्रियसमूह व खोडसाळ मन मुद्दाम वि सूचना देवून ठेविली आहे. थोडीशी अतिशयोक्ति वाटली तरी सावध राहाणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. वाइटाची कल्पना करून त्याचा मार्गच बंद करावा, म्हणून थोड्या अधिक निर्बंधांनी प्रतिबंध घातला जातो. भौतिवटतेला समाजांतून वाव मिळू नये हाच यांतला उद्देश. यांतलाच पुढचा एक प्रकार आहे. ” स्मरणं कीर्तनं केलिः प्रेक्षणं गुह्यभाषणम् । संकल्पोऽध्यवसायश्च क्रियानिष्पत्तिरेव च ॥ एतन्मैथुनमष्टांगं प्रवदन्ति मनीषिणः । विपरीतं ब्रह्मचर्यमनु॒ष्ठेयं मुमुक्षुभिः ॥ – हे श्लोक पुष्कळ ठिकाणी आले आहेत. श्रीशंकराचार्यांच्या स्कुट ग्रंथांतूनहि आहेत. स्त्रियांचे स्मरण करणे, स्त्रीगुण वर्णन, स्त्रियांशी खेळ खेळणें, चेष्टा करणे, स्त्रियांकडे टक लावून पाहणे, एकांतांत भाषण करणे, कोणा एका स्त्रीच्या बोलण्याची, हंसण्याची, चालण्याची कल्पना पुनः पुनः येणे, तिच्या भेटीस जाण्याचे संकल्प मनांत सारखे घोळणे, तिच्या आकृतीचा ठसा उमटून तीच ती आकृति पुनः पुनः डोळ्यां समोर येणे आणि संभोगाची प्रत्यक्ष कृति घडणे असे हे एकंदरीत आठ प्रकारचे मैथुन मानले जाते. याहून विलक्षण असलेले ब्रह्मचर्य, ज्याला म्हणून नरकाचा मार्ग बंद करून निरतिशय आत्मसुख मिळवावयाचे आहे. त्यानें अवश्य अनुष्ठले पाहिजे. न स्थिरं क्षणमप्येकमुदकं च यथोर्मिभिः । वाताहतं तथा चित्तं तस्मात्तस्य न विश्वसेत् ॥ (दक्षस्पृ. ७|१९) समुद्राच्या काठावर जशा एक क्षणभरहि लाटा थांबलेल्या दिसून येत नाहीत त्याप्रमाणे चित्ताच्या लाटा नसलेल्या एका योग्याशिवाय कुणालाच त्या अजिबात थांबलेल्या आढळून येत नाहीत. नदीच्या पाण्याप्रमाणेहि म्हणतां येईल. एका आचमनाचे पाणी दुसऱ्या आचमनाच्या वेळी नसते, त्याप्रमाणे चित्त सारखे निरनिराळ्या कल्पनाप्रवाहांनी युक्त असतें. अकस्मात कसली तरी कल्पना उठते, जसा कुठून तरी दुर्गंध यावा आणि मन निर्बुजा त्याप्रमाणे कुठलीतरी घाणेरडी कल्पना मनांत मागचा-पुढचा कांहींच संबंध नसता एकदम उद्भवते, आणि विवेकी मनाला त्रासवून सोडते; म्हणून चित्ताचा कोणी विश्वास धरू नये. या चिंतनाचा विषय सदा असा बहुतेक गलिच्छच असतो. या चित्ताच्या अखंड ओढोने जीव कंटाळून एकदा त्या विषयाच्या अनुभवाने तरी हे शांत होईल का म्हणून विषयांत पडतो. विषयांचे व स्त्रियांचे सान्निध्य म्हणजे ‘आर्चीच मर्कट तशांतचि मद्य प्याला’ असें त्या चित्ताच्या बाबतीत होते. सर्वोत्कटाः सुराः सर्वे विषयैश्च वशीकृताः प्रमादिनि क्षुद्रसत्वे मनुष्ये चात्र का कथा। (दक्ष. ७/२७ ) – सत्वबलानें व साचिकतेनें कितीतरी श्रेष्ठ असणाऱ्या सर्व देवांनाहि या कामादिकांनी व विषयांनी बश करून टाकलें, तर प्रमादशील क्षुद्रसत्त्वाच्या माणसाची कथा काय !

पंचविंशतिपर्यन्तं ब्रह्मचर्य समभ्यसेत् । बलवान् शक्ति संपन्नः शतायुस्तु भविष्यति ॥ वयाच्या पंचवीस वर्षेपर्यंत मुलानें ब्रह्मचर्य पाळले की तो शारीरिक, मानसिक बळानें युक्त, दैवीशक्ति संपन्न, शंभर वर्षे आयुष्याचा होतो. पूर्णषोडशवर्षा स्त्री पंचविंशेन संगता शुद्धे गर्भाशये मार्गे रक्ते शुक्रेऽनिलो हृदि || वीर्यवन्तं सुतं सूते’ इत्यादि. ‘पंचविंशे ततो वर्षे पुमान्नारी तु पोडशे । समत्वागतवीर्यौ तौ जानीयात्कुशलो भिषक् ॥ पुरुषाला पंचवीस व मुलीला सोळा वर्षांच्या वयोमानाचा निर्बंध आहे. या चयांत दोघांच्या धातूंची योग्य पुष्टि होते. अशांपासून झालेली संतति ही बलवीर्यवान होते. तोपर्यंत त्याची दृष्टि इकडे तिकडे अजिबात जातां कामाची नाही. पंचवीस वर्षांच्या अवधीत सर्व धातु पुष्ट होतात. मुलांच्या कोवळ्या मनावर घाणेरडे संस्कार झाले म्हणजे ते लहानपणापासूनच आडमार्गाकडे वळून संबंध आयुष्यच भुंग्यानें पोखरलेल्या तुळईप्रमाणें निःसत्त्व करून टाकतात. सांप्रतकाळी ब्रह्मचर्याचें पालन तितकेसें योग्य रीतीने होत नसल्यामुळेच आधुनिक तरुण पिढी बहुतेक निस्तेज, निरुत्साही, निर्बळ, काटकुळी, डोळे खोल गेलेली, थोडक्यांत म्हणजे प्रेत कळेची व अल्पायु दिसुन येते. पूर्वी हुशार असल्यास पांचव्या वर्षी अथवा सातव्या-आठव्या वर्षी मुलांच्या मुंजी होऊन, ती ऋषींच्या त्या पवित्रं वनांतल्या सात्त्विक दृश्याच्या अति मनोरम आश्रमांत व जितेंद्रिय, सामर्थ्य संपन्न, वेदवेदांगपारंगत अशा त्या शांत ब्रह्मनिष्ठ ऋषींच्या दिव्यसान्निध्यांत देववाङ्मयाचें म्हणजे अपौरुषेय वेदांचे अध्ययन करीत असत. पवित्र पवित्र अवस्था, पवित्र वेदांचे अध्ययन व तेहि पण पवित्र : आत्मसाक्षात्कारी ऋषीकडून, ही कल्पनाच इतकी मनांत शांत व दिव्य अशा वातावरण निर्माण करते, तर ती त्या वेळची परिस्थिति कशी असेल ! ब्रह्मचारी बटु म्हणजे पावित्र्याची ओतीव मूर्ति, पवित्र हृदयाचे ते एक मूर्तिमंत दर्शनच. जात्याच सुंदर असणाऱ्या व्यक्तीस आरोग्याची व मनः समाधानाची जोड मिळाल्यास ती जशी अधिक खुलून दिसते. त्याप्रमाणेच जात्याच त्या अवस्थेत मन पवित्र असते. त्यांतून गायत्रीचे अनु ठान, सूर्याची उपासना, वेदांचे अध्ययन, दिव्य वातावरणाचा मनावर झालेला सुपरिणाम यानें तें पवित्र तेजस्वी बाल्य, पावित्र्याच्या संपूर्ण कलेनें अधिक उठावदार दिसून येई. परीक्षित राजासारख्या सत्त्वसंपन्न राजाला शमिक ऋषीचा तो कुमार शाप देतो काय, आणि तो शाप लागू नये म्हणून पाण्यांतल्या एकस्तंभाच्या मंदिरांत कुठूनहि साप न येईल अशी तयारी करून तो बला असतांनाहि बरोबर वेळ साधून तो शाप खरा होतो काय ? हा सर्व त्या वातावरणाचा व त्या अमोघ वीर्याचा प्रभाव, दुसरे काय? आतांचें सहशिक्षण, प्रौढ विवाह, स्त्रीस्वातंत्र्य, धर्मशिक्षणाचा अभाव, शहरी वातावरण, सुधारकांचा सुळ सुळाट, विजातीय विवाह, घटस्फोट, पुनर्विवाह, आदर्श व्यक्तीच्या आदर्शाचा अभाव इत्यादि या सर्व गोष्टी आजच्या समाजाच्या वाईट परिस्थितीची कारणे आहेत. नुसत्या शाळेत आणि विश्वविद्यालयांतच नाही, आतां तर सर्व खात्यां तूनच स्त्रीपुरुष एकत्र वागतात. इतके असूनहि जर समाज पवित्र राहिला असता तर तें भूषणच आहे. पण अलीकडची स्थिति पाहून श्रीदत्तात्रेयांचे वाक्य आठवते

अग्निकुंडसमा नारी घृतकुंभसमो नरः । संसर्गेण विलीयेत तस्मात्तां परिवर्जयेत || (अवधूत गीता) 

– अग्निकुंडाप्रमाणें स्त्री व घृतकुंभाप्रमाणें पुरुष असतो व तो स्त्रीसांनि ध्यानेंहि विरघळतो; म्हणून स्त्रियांचे सांनिध्य वर्जावें. श्रीदत्तात्रेयांनी सर्वसाधारण मानवाच्या हिताकरितां हा श्लोक लिहिला आहे. हा अवधूतगीतेच्या शेवटच्या अध्यायांतील श्लोक आहे. या श्लोकांत स्त्रीला अग्निकुंडाची व पुरुषाला घृत कुंभाची उपमा देऊन त्यांच्या देहधर्माची कल्पना आणून दिली आहे. अग्नि कुंडाजवळ ठेवलेल्या घृतकुंभाप्रमाणे सामान्य पुरुष स्त्रीच्या साहचर्यात पाघळतो, इंद्रियवैकल्य होतें. देहाला आवरून धरले तरी कचित रेतस्खलनादि दोषहि संभवल्याची उदाहरणें ऐकियांत आहेत. स्त्रियांच्या सान्निध्यांत पुनः पुनः जावे, बोलाव, जवळ बसावे असे एक विलक्षण आकर्षण प्रथम सुरू होते. मन चौरून तरी घाणेरड्या कल्पना करतें. ती मूर्तीच मनापुढे राहाते. पुढच्या भ्रष्ट तेला अशा गुप्त घटनेपासूनच सुरुवात होते. मनाला तोच एक विषय की पळो करून टाकतो. तत्त्वज्ञानाच्या अभ्यासानें एकात्मतेची दृष्टि दृढ होईपर्यंत, अकाय असणारी आत्मदृष्टि सर्वत्र पसरेपर्यंत, निर्विकल्प, चिन्मात्र सुखस्वरू पाच्या अखंड धारणेने कामादिकांचा समूळ नाश होईपर्यंत सर्वत्र परमात्मा आहे हे तत्त्व चांगले वठेपर्यंत, धर्मतत्वाचे बाळकडू अंगांत भिनेपर्यंत, उच्च नीति आंगी बाणेपर्यंत, परस्त्रीच्या ठिकाणी मातृदृष्टि दृढ होईपर्यंत, मनुष्य जन्माचे रहस्य चांगले कळेपर्यत, पशुधर्माच्या निषेधाकरितां आणि व्यक्ति व समाज यांच्या सर्वतोपरि उन्नतीकरितां, हिताकरितां, इहपर गतीकरितां श्री पुरुषांचे साहचर्य पथ्यकर नाहीं, असे कोणास बाटणार नाहीं ?

home-last-sec-img