Literature

आध्यात्मिक सप्तभूमिका

या सप्तभूमिकांचे वर्णन योगवासिष्ठादि पुष्कळ ग्रंथांत आले आहे. बराह, अन्नपूर्णा, महोपनिषदांतूनहि या सप्तभूमिकांचे वर्णन आले आहे. वराहोपनिषद आणि महोपानपद यांतलें वर्णन एकसारखे आहे. ज्ञानभूमिः शुभेच्छाख्या प्रथमा समुदाहृता | विचारणा द्वितीया तु तृतीया तनुमानसी। सत्त्वपत्ति श्चतुर्थी स्यात्ततोऽसंसक्तिनामिका | पदार्थाभावना षष्ठी सप्तमी तुर्यगा स्मृता ॥ या श्लोकांतूनहिं सप्तभूमिकांची नांवें दिली आहेत. शास्त्रसज्जनसं पर्कवैराग्याभ्यासरूपिणी । प्रथमा भूमिकैषोक्ता मुमुक्षुत्वप्रदायिनी ॥ (अन्नपूर्णा उ.५८१) शास्त्रसज्जनसंपर्काची इच्छा वाढविणारी, बिरक्तचा अभ्यास करविणारी, मुमुक्षुत्व प्राप्त करून देणारी, खऱ्या सुखाची इच्छा

अंकुरित करणारी ही प्रथम भूमिका होय. स्थितः किं मूढ एवास्मि वीक्षेऽहं शास्त्रसज्जनैःवैराग्यपूर्णमिच्छति शुभेच्छेत्युच्यते बुधैःशास्त्रसजन संपर्कवैराग्याभ्यासपूर्वकम् । सदाचारप्रवृत्तिर्या प्रोच्यते सा विचारणाविचारणाशुभेच्छाभ्यामिंद्रियार्थेषु रक्तता। यत्र सा तनुतामेति प्रोच्यते तनुमानसी | भूमिकातृतयाभ्यासाच्चित्तेऽर्थविरतेर्वशात्सत्वात्मनि स्थिते शुद्धे सत्यापत्तिरुदाहृता || दशाचतुष्टयाभ्यासादसंसर्गफला तु या । रुढसत्त्वचमत्कारा प्रोक्तासंसक्तिनामिका भूमिकापंचकाभ्यासात्स्वात्माराम तया भृशम्आभ्यंतरराणां बाह्यानां पदार्थानामभावनात् ॥ परप्रयुक्तेन चिरं प्रयत्नेनावबोधनम्। पदार्थाभावना नाम षष्ठी भवति भूमिका।। षड्भूमिकाचि राभ्यासाद्भेदस्यानु पर्लभनात् । यत्स्वभावैकनिष्ठत्वं सा ज्ञेया तुर्यगा गतिः ॥ ( वराह उ. ४ । १-१०; महोपनिषत् ५-२७, ३४ ) – सत्संग सच्छास्त्रा भ्यासाची आवड, सत्साधनाची इच्छा, सत्संगादि साधनांनी विचार येऊन सदाचारप्रवृत्ति, सत्साधनांनी विषयवासनाराहित्य, आत्मस्थितीचा निश्चय, सिद्धि सामर्थ्यादिकांत अप्रवृत्ति, बाह्यवृत्तिराहित्य, सहजावस्था अशी ही सात भूमिकांची लक्षणे आहेत. सातव्या भूमिकेचा जीवन्मुक्त होतो, हें पुढच्या श्लोकावरून सिद्ध होते. एषा हि जीवन्मुक्तेषु तुर्यावस्थेति विद्यते । विदेहमुक्तिविषयं तुर्यातीतमतः परम् ॥ ( महोपनिषत् ) अधिक दृढतेने विदेहस्थिति लाभते, देहाची भावना, बहिर्वृत्ति असत नाही.

जीवमुक्तांची स्थिति पुढच्या श्लोकानें व्यक्त केली आहे. यत्र ना सन्न सद्रूपो नाहं नाप्यनहंकृतिः । केवलं क्षीणमनन आस्तेऽद्वैतेऽति निर्भयः ॥ ( वराह. ३४|१७) जीवन्मुक्ताला सत्याचीहि भावना नसते आणि असत्याचीहि भावना नसते. अहंकृतिहि नसते आणि आनंदकृतिहि पण नसते. कसलेंच चिंता नसतां तो स्वस्थ असतो, निर्विकल्प असतो, अद्वैतमात्र असतो, नित्य निर्भय असतो. असा या श्लोकाचा भावार्थ आहे. भूमित्रयेषु विहरन्मुमुक्षुर्भवति । पहिल्या तीन भूमिकांचा मुमुक्षु म्हणवितो. तुरीयभूभ्यां विहरन्ब्रह्मविद्भवति । पंचमभूम्यां विहरन्ब्रह्मविद्वरो भवति । षष्ठभूम्यां विहरन् ब्रह्मविद्वरेण्यो भवति । सप्तमभूम्यां विहरन्ब्रह्मविद्वरिष्ठो भवति । – चवथ्या, पांचव्या सहाव्या, सातव्या भूमिकेच्या माणसास क्रमानें ब्रह्मवित्, ब्रह्मविद्वर, ब्रह्मविद्वरेण्य, ब्रह्मविद्वरिष्ठ असे म्हणतात. वराहोपनिषदाच्या चौथ्या अध्यायाच्या प्रारंभी हा .. विषय आला आहे. पूर्वावस्थात्रयं तत्र जाग्रदित्येव संस्थितम् । चतुर्थी

स्वप्न इत्युक्ता स्वप्नाभं यत्र वै जगत् ॥ (अन्नपूर्णा उ. ५/८७) आनंदैक घनाकारा सुषुप्ताख्या तुः पंचमी । असंवेदनरूपा तुः षष्ठी तुर्यपदाभिधा ॥ ८८ ॥ तुर्यातीतपदावस्था सप्तमी भूमिकोत्तमा मनोवचोभिरमाया स्वप्रकाश सदात्मिका ॥ ८९ ॥ पहिल्या तीन जाग्रत, चवथी स्वप्न पा अबस्थेत जग स्वप्नासारखें प्रतीत होते. केवळ आनंदधन अशी सारखी पांचवी अर्धसुप्तप्रबुद्धाथः । अर्धवट झोपेतल्याप्रमाणे असलेली अवस्था. अभावरूपाची साहावी. आनंदैकघनाकारा सुषुप्तिसदशी स्थितिः 

। आनंदघन रूपानी सुभृतीसारखी ही स्थिति असतो. तुर्यावस्थौपशान्ता सा मुक्तिरेव हि केवला । सातची भूमिका स्वप्रकाशरूप स्वानंदमात्र स्वच्छ, सौम्य व समतादि युक्त असते. या सर्वांत देहरूपाने, मनोरूपाने व इतिरूपानें प्रकृतिपुरुषांचे मायाब्रह्माचे, जीवनसाचे ऐक्यच विवाहयोगासद्धि व जीवन्मुक्ति यांत तारतम्याने अभिप्रेत आहे. या तीन साधनांत चढती पायरी आहे हे जरी खरे असले तरी हे मूलतत्व ध्यानात ठेवून त्या त्या भूमिकेत अनुसंधान ठेवले म्हणजे क्रमेण तें मोक्षाचेच साधन होऊन मुक्ति मिळते.

home-last-sec-img