Literature

आर्य संस्कृतीचा आदर्श पुरुष

आर्य अथवा हिन्दु संस्कृतीची आदर्श व्यक्ति, आदर्श पुरुष म्हणजे श्रीराम. रामो विग्रहवान् धर्मः । श्रीराम म्हणजे धर्माची केवळ साक्षात् मूर्तीच होय. श्रीरामवद्वर्तितव्यं स धर्मः रावणवद्वर्तितव्यं सोऽधर्मः । श्रीरामाप्रमाणे वागणे म्हणजेच धर्म व रावणाप्रमाणें वागणे म्हणजेच अधर्म, अशा धर्म आणि अधर्माच्या व्याख्या विश्वमार्गदर्शनार्थ विद्वानांनी करून ठेवल्या आहेत. श्रीराम हा मर्यादा पुरुषोत्तम होय. धर्म सोडून एक तसूभरहि इकडे तिकडे त्याचें पाऊल वांकडें पडत नसे. श्रीरामाच्या धर्माचरणाची ख्याति विश्वविख्यात आहे. जज्ञे विष्णुः सनातनः या बाल्मीकि रामायणाच्या प्रमाणावरून साक्षात् सनातन महाविष्णूच श्रीरामरूपानें ‘ लीलामानव तनुधारी’ होऊन भूतलावर अवतरला होता हूँ स्पष्ट आहे. सर्वतंत्रस्वतंत्र सर्व आयुष्यभर असूनहि देखील एवढ्या कांटेकोर  रीतीनें धर्माचे पालन जें श्रीरामाच्या चरित्रांत आढळून येतें तें धर्माचे महत्त्व दर्शविण्याकरितां, अखिल मानवांना जीवनाचा एक धडा घालून देण्याकरितां, सन्मार्गदर्शन करून देण्याकरितां व प्रत्येक मनुष्याचें 

म्हणजे नावेप्रमाणे खपर – तारक आचरण असावें, हें तत्त्व उलगडून दाखविण्या करितां हें कोणाच्या लक्षांत येणार नाहीं श्रीरामाच्या चरित्रांतील गर्भहेतु समजून आपण वागलों तर आम्हां सर्वांवर त्याचा अनुग्रह होऊन हिन्दुस्थानाचें आजचे राज्य अगदी खरेखुरे रामराज्य होईल यांत तिळमात्र संदेह नाही. ज्याची म्हणून आपल्याला कृपा हवी त्याचें इंगित ओळखून त्या धोरणानें आपल्याला वागावयास पाहिजे. श्रीरामरायाशी सख्य संपादावयाचे ही कल्पना आल्याबरोबर श्रीसमर्थांनी केलेलें सख्यभक्तीचे वर्णन चटकन डोळ्यापुढे उभे राहिले. त्यांतील दोन तरी ओव्या उधृत केल्याशिवाय पुढे जाववत नसल्यानें अपरिहार्य होऊन येथे त्या उद्धृत करतोच.

देवास जयाची अत्यंत प्रीती । आपण वर्तावें तेणें रीती ।

येणें करितां भगवंतीं । सख्य घडे नेमस्त ॥ (दास. द. ४ स. ८ ओ. ३ ) 

आपण तैसोंच वर्तावें । आपणास तेंच आवडावें । मनासारिखें होतां खभावें । सख्य घडे नेमस्त ॥ (दास. द. ४ स. ८ ओ. ५)

श्रीरामाच्या धर्माचरणाचा आदर्श पुढें ठेऊन वागण्याचा निश्चय केला तर आपोआप त्याच्याशी सख्य घडेल.

home-last-sec-img