Literature

आर्य संस्कृतीचा साम्यवाद

वैदिक आर्य संस्कृतीची लक्षणे समजून घेण्याकरितां वेदोपनिषदांच्या कांहीं कांही भागाचे अजून थोडें पर्यालोचन करूं या.

ईशावास्यमिद, सर्व यत्किच जगत्यां जगत् । तेन त्यक्तेन भुंजीथा मा गृधः कस्य स्विद्धनम् ॥ ( ईश.)

–हें चराचर विश्व सारें परमात्म्याकडूनच व्यापले गेलें आहे. या सर्वांच्या अंतर्बाह्य एक परमात्माच आहे, त्यामुळे या जगांत जितके प्राणि पदार्थ आहेत त्या सर्वांनाहि तूं परमात्मस्वरूपच म्हणून बघ. तो परमात्मा सर्वांचा योगक्षम चालवितो, ज्याच्या त्याच्या कर्माप्रमाणें फल देतो. त्यामुळे तुझ्या कर्माप्रमाणे तुला त्याच्याकडून मिळणाऱ्या अनुकूलतेंत, दिल्या गेलेल्या भोगसाधनांतच तूं संतुष्ट राहा. त्याचाच अनुभव घे. दुसऱ्याच्या संपत्तीवर 

दृष्टि ठेवू नकोस. त्याची तूं अभिलाषा धरूं नकोस. ( दुसरा अर्थ ) रज्जुसर्पाच्या भावनेत रज्जु म्हणजे दोरीच एक

जशी व्यापून असते त्याप्रमाणे या अध्यस्त विश्वांत परमात्माच एक व्यापून आहे. रज्जूंत अध्यस्त असणाऱ्या सर्पाची भावना त्यागून एक सत्य रज्जूच ओळख म्हणून म्हटल्याप्रमाणे परमात्मतत्त्वांत अध्यस्त असणाऱ्या विश्वाची भावमा त्यागून एक सत्य परमात्माच ओळख. रज्जूच्या परिचयानें लाभणारें निर्भयत्व, अनुभव व या सत्यनिदर्शनानंतर सर्पभावनेच्या कोणत्याहि कल्पनेंत तू रमू नकोस, म्हणून जसे सांगावयाचे त्याप्रमाणे परमात्मतत्त्वाच्या परीद्यानाने लाभणारे निर्भयत्व, असंसारित्व, आनंदघनत्वादिकांचा अनुभव घे; या सत्य निदर्शनानंतर विश्वभावनेच्या कोणत्याहि कल्पनेंत तूं रमूं नकोस म्हणून सांगते. हा दुसरा अर्थ थोडा तात्त्विक आहे.

कुर्वन्नेवेह कर्माणि जिजीविषेच्छत समाः । एवं त्वयि नान्यथेतोस्ति न कर्म लिप्यते नरे ||२||


सर्व प्रकारची उन्नत कर्मे करीत, आपल्या धर्मकर्माप्रमाणे वागून आपल्या व्यावहारिक व पारमार्थिक, तशाच तस्मार्त पुराणोक्त निष्काम कर्मोंनी जनतेला व जनार्दनाला तसेच इंद्रादि अधिकारीवर्गाला संतुष्ट राखीत आपले कुलधर्म कुळाचार पाळीत सर्व प्रकारे कुलदीपक होऊन स्वपरउध्रात्मक सत्कायें मोक्षापर्यंत करीत शेवटी कृतार्थ झाले पाहिजे. एकदम हे साधले नाही तर पूर्णायुष्याची शंभर वर्षे राहून मोक्षापर्यंत सतत कार्य करीत मुक्त होण्याची इच्छा बाळाली पाहिजे. इहपर साथ पाहणाऱ्या अशा तुला या मार्गापेक्षां श्रेष्ट साधन दुसरे कोणतेही नाही. एका सहन अन्य कोणत्याहि साधनाने तुला दुष्कर्म घालविता येणार नाही. स्वपरउदाराकरितां केलेली निर्दष्ट निष्काम कर्मे मनुष्याला बंधकारक होत नाहीत.

यस्तु सर्वाणि भूतान्यात्मन्येवानुपश्यति । 

सर्वभूतेषु चात्मानं ततो न विजुगुप्सते ॥ ६ ॥

जो सर्वांनाहि आपल्यांत आपल्याला पाहतो तो सर्वमान असतो. तो सर्वांशी समप्रीति टेवून वागतो. नीचोच भावनेने होणारा कोणा चाहि तिरस्कार त्याच्या ठिकाणी दिसून येत नाही. तो कोणाचीहि निंदा करत नाही. कोणालाहि तो तुच्छ लेखीत नाही.

यस्मिन्सर्वाणि भूतान्यात्मैवाभूद्विजानतः

तत्र को मोह का शोक एकत्वमनुपश्यतः ॥ ७ ॥

आत्मसाक्षात्काराने ज्याला सर्वत्र आत्मानुभव येतो, ज्याला अखिल प्राणिपदार्थ आत्मरूपाने अनुभवाला येतात त्याला त्या आनंदमात्र अद्वितीय स्वरूपांत शोकमोह दोन्ही राहात नाहीत. निरवधि आत्मानंदरूपाने राहून समद्रने इतरांस तो पाहातो. हा स्वपर शोकमोहनाशाचा दिव्य मार्ग आहे. नीचोच्च भावनेचा ठाव पुसून टाकणारा श्रुतीचा हा असा साम्यवाद आहे. ही आर्यांची सभ्यता! हे भारतीयांचे दिव्य जीवन ! ही अशी एक जगदादर्शभूत दिव्य संस्कृति, जगन्मीलीभूत नाही असे कोण म्हणेल या दोन आत्मद्यानाशिवाय जगाचे शोकमोह व जगांतली नीचोच्च भावना अन्य कोणत्याहि विचाराने व साधनाने निर्मूल होत नाही हे घोषित होते. नीचोच्च भावनेची आढी मनांतच असते. व ती धन-विद्या अधिकाराच्या मदाने वाढीस लागते. याला आत्मज्ञानाचा, एकात्म निश्चयाचा अभावच कारणीभूत होतो, देहाभिमानच कारण असतो. याची निवृत्ति आत्मज्ञानाशिवाय होत नाही. असे झाल्यास आत्मज्ञानाने लाभणारी समता अन्य कोणत्याहि साधनाने कशी लाभेल

या समतेबद्दलचे गीतेचे कांहीं श्लोक बघू

सर्वभूतस्थमात्मानं सर्वभूतानि चात्मनि । 

ईक्षते योगयुक्तात्मा सर्वत्र समदर्शिनः || (६/२९)

-समदर्शी योगी सत्रांत आपण आहों, आपल्यांत सर्व आहे असे वधतो. यस्तु सर्वाणि भूतान्यात्मन्येवानुपश्यति । सर्वभूतेषु चात्मानं ततो न विजिगुप्स्यते । या ईशावास्य मंत्राची हा गतिचा श्लोक आठवण करून देतो. कैवल्योपनिषदांत तर थोड्या फरकाने अगदी असाच श्लोक आला आहे. यावरून गीतेच्या शेवटी असणाऱ्या ‘उपनिषत्सु ‘ या शब्दाचा अर्थ कळेल. सर्वभूतस्थमात्मानं सर्वभूतानि चात्मनि । संपश्यन्त्रह्मपरमं याति नान्येन हेतुना ॥ १० ॥ सर्वभूतांत आपल्याला व आपल्यांत सर्व भूतांना बघूनच कोणीहि सर्वरूप ब्रह्मतत्त्व होतो. एरवी हें कोणत्याहि साधनांनी शक्य नाही. खरें समत्व हे स एव सर्व यद्भूतं यच्च भव्यं सनातनम् । ज्ञात्वा तं मृत्युमत्येति नान्यः पन्था विमुक्तये ॥ ११ ॥ हा मंत्र याच्यापूर्वी आला आहे. आतापर्यंत झालेलें, पुढे होणारे व आतां असलेले हे सर्व एक सनातन परमात्माच आहे असे त्या परमात्म्याचे एकमेवाद्वितीया व म्हणूनच सर्वसम स्वरूप जाणल्यानेच केवळ जीव मृत्युपाशांन सुटतो. एरवीं त्याला जाणावयाला दुसरा असा कोणता मार्गच नाही. असा या मंत्राचा अर्थ आहे, असा या दोन मंत्रांचा पूर्वापार संबंध आहे. उत्तरार्धाच्य थोड्या फरकानें “ सर्वभूतस्थमात्मानं ” असा हा गीतेत असणारा मनुस्मृतांच्या १२ व्या अध्यायांतहि आढळतो. सर्वभूतेषु चात्मानं सर्वभूता चात्मनि । समं पश्यन्नात्मयानी स्वाराज्यमधिगच्छति ॥ सर्व भूत मीच एक आत्मरूपानें आहे व ही सर्व भूते सर्वात्मरूपी अशा माझ्यांत आ असे जो आत्मयज्ञप्रधान मनुष्य जाणतो तो “ स्वेन राजते प्रकाशत स्वराद ब्रह्म तस्य भावः स्वाराज्यं । ” स्वयंप्रकाश ब्रह्मच होऊन अ असा याचा अर्थ. अगदी या विवेचनाशी जुळणारा असा दक्षस्मृतीचा श्लोक आठवला तो देतो. यामुळे वेदशास्त्रांतून कशी एकवाक्यता असते हें आढळून येईल. सर्वानुमतानेंच हे कसे सिद्ध झाले आहे, ते उमगेल.

यस्त्वात्मव्यतिरेकेण द्वितीयं नैव पश्यति । ब्रह्मभूतः स विज्ञेयो दक्षपक्ष उदाहृतः ।।

—आपल्याहून वेगळे म्हणून जो तिळमात्रहि पाहात नाहीं तोच एक ब्रह्मनिष्ट होय. असा ब्रह्मनिष्ठाचा परिचय आम्हांला दक्षानें करून दिला आहे.

विद्याविनयसंपन्ने ब्राह्मणे गवि हस्तिनि । शुनि चैव श्वपाके च पंडिताः समदर्शिनः॥ (भ.गी. ५/८) 

—विद्या व विनयाने संपन्न असणाऱ्या ब्राह्मणाला, गाईला, गजाला, श्वानाला आणि श्वपचाला आत्मज्ञानी सदा समदृष्टीनेच बघतो. आत्मदृष्टीने वाणणाऱ्या समत्वाची साक्ष हा श्लोक कसा उजळमाथ्यानें पटवीत आहे पाहा.

इहैव तैर्जितः सर्गो येषां साम्ये स्थितं मनः । निर्दोषं हि समं ब्रह्म तस्माद्ब्रह्माण ते स्थिताः ॥

नं प्रहृष्येत्मियं प्राप्य नोद्विजेत्प्राप्य चाप्रियम् । स्थिरबुद्धिरसंमूढो ब्रह्मविद्ब्रह्माण स्थितः ॥

—खरोखर समत्व एका आत्मनिष्ठाला अथवा ब्रह्मनिष्ठालाच लाभतें, याला हे दोन श्लोकं प्रमाण आहेत. संसार जिंकलेल्याचेंच मन एक सर्व साम्यांत अवस्थित असते. सर्वव्यापी सर्वात्मरूप ब्रह्म निर्दोष आहे. त्या स्त्रमात्र अशा ब्रह्मदृष्टीनें सर्व त्यांना निर्दोषच दिसतें, म्हणजे ब्रह्ममात्र दिसतें असा अर्थ. ब्रह्मवित् ब्रह्मस्वरूपांतच राहातो व त्याला प्रियाप्रिय पदार्थाच्या प्राप्तीनें हर्षशोक होत नाहीत. तो ब्रह्माप्रमाणेच ब्रह्मनिष्ठ असतो.

सुहन्मित्राण्युदासीनमध्यस्थद्वेष्यबंधुषु । साधुष्वपि च पापेषु समबुद्धिर्विशिष्यते ॥ (भ.गी. ६९)

–आप्तेष्ट, बंधुबांधव, शत्रुमित्र, मध्यस्थ, उदासीन, रागद्वेषी, सज्जन दुर्जन, पापी-पुण्यवान या सर्वांच्याहि ठिकाणी सर्वसमबुद्धि ठेवणारा विशेष असतो. आत्मज्ञानाचे त्याचे वैशिष्ट्य असतें. आत्मज्ञानाशिवाय समतावाद जीव धरूनच राहात नाहीं. म्हणून समतावादाचें हें पराकाष्ठेचें स्वरूप गीतेनें उकलून दाखविलें आहे; आर्य संस्कृतीच्या अंतरंगाचा परिचय करून देणारे द्वारोद्घाटन आहे.

समं सर्वेषु भूतेषु तिष्ठन्तं परमेश्वरम् । विनश्यत्स्व विनश्यन्तं यः पश्यति स पश्यति ॥ (१३।२० )

नाशिवंत अशा सर्व पदार्थांच्या ठिकाणी असलेल्या एका अविनाशी परमात्म्याशिवाय इतर कांहींच पाहात नाही, तोच एक सर्वसम, तोच एक खरें बघतो. त्याला ज्ञानदृष्टि प्राप्त होते. ज्याला ज्ञानदृष्टि प्राप्त झाली आहे तोच खरा डोळस. बाकीचे कोण हे ओघानेंच समजून येण्यासारखे आहे. त्यांना ही दृष्टींच नसतांना ते सर्वसमत्वानें व शकतीलच कसे ?

समं पश्यन्दि सर्वत्र समवस्थितमीश्वरम् । न हिनस्त्यात्मनामानं ततो याति परां गतिम् ॥ २८ ॥ 

सर्वांच्या ठिकाणी एकरूपानें व्यापून राहिलेल्या परमात्म्याला जो सर्वत्र समान पाहातो त्याला आपल्या ठिकाणीहि सर्वत्रहि एक परमात्माच दिसतो; किंबहुना आपलेच स्वरूप दिसतें. त्याला दुसऱ्याची हिंसा करणे म्हणजे स्वतःचीच हिंसा करण्यासारखे होत असल्यामुळे तो कोणाचीहि हिंसा करीत नाही. अशा तऱ्हेची आत्मभूमिका निर्माण झाली, अशा तऱ्हेच्या आत्मभावनेनें उत्पन्न झालेली अहिंसा ज्याच्या ठिकाणी वाणली आहे तोच एक मुक्त होतो. मुक्त होण्याची इच्छा करणारेहि पण अशा तऱ्हेच्या आत्मीय भावनेनें उत्पन्न झालेली अहिंसा अंगी बाणवूनच मुक्त होतात.

इंद्रियाणां निरोधेन रागद्वेषक्षयेण च । अहिंसया च भूतानाममृतत्वाय कल्पते ॥

—इंद्रियनिरोधानें, रागद्वेषाच्या क्षयाने व अहिंसेच्या पालनानें अमृतत्वाची म्हणजे मोक्षाची प्राप्ति होते. परवस्तुहरणानें, परहिंसा न करतां सर्वांनाहि सर्व प्रकारांनीं सत्यसुखाच्या दिव्य जीवनाची प्राप्ति होईल असें झटणें, मुख्यतः सर्वांना आत्मज्ञानाची प्राप्ति करून देणे व त्यायोगें समाजांत निर्भय समता निर्माण करणे असा हा आर्य अथवा वैदिक समतावाद आहे हिंसेला रागद्वेष व मुख्यतः स्वदेहसुखाची कल्पनाच कारण होते. जोपर्यंत विनाशी दृश्य पदार्थांच्या ठिकाणींच, सुखाची भावना असते तोपर्यंत, पदार्थ मात्राविषयीं अनिवार्य प्रीति निर्माण होते. “मज नाहीं तुज साजेना ” अशी ईर्षा निर्माण होते. परस्त्र बेलात्कारान आपल्यासाठी हरण करण्याची दुष्टबुद्धि होते व त्यामुळे परहिंसा घडते. परहिंसेला बाह्यसुखाची भावनाच मुख्य कारण आहे. ती असे तोपर्यंत रागद्वेषद्वारा हिंसा ही होणारच. निर्विषय मन होईपर्यंत, सर्व ( या निर्विषय मनाला कारण होणारे) आत्मज्ञान होईपर्यंत अहिंसा अंगी बाणणार नाही. ही अहिंसा बाणेतोपर्यंत सर्वसमत्व उत्पन्न होणार नाही. अशा रीतीने सर्व ठिकाणी आत्मदर्शन होऊन सर्वसमत्व दृढ समत्ववाद केवळ शाब्दिकच दिसून येईल. क्रियेत मात्र विधमवाद-अपस्वार्थानी पुरेपूर हिंसाच आढळेल. सर्व प्राणिपदार्थांच्या ठिकाणी निःसीम समता दिसून येऊ लागली की, समतचे तत्त्व ठसले म्हणून म्हणता येईल. एरवीं अहिंसारूपी समतावादाच्या मतप्रचाराकरितां हल्ली दिसून येणारी अमानुष हिंसा व अस विषमता हीच भरपूर दिसून येत राहील. अनात्मदृष्टींच सर्व तऱ्हेच्या हिंसेला आणि विषमतेला कारण होते. ती जशी जशी कमी कमी होत जाईल तशी तशी विषमता आणि हिंसाहिं कमी कमी होत जाते. संपूर्ण निविषय आत्म स्थितीच खरा अहिंसा व सर्वसमता होय. स्वपरअनुभव व स्वपरविचार यांनी बाह्य पदार्थांत थोडेंहि सुख नाहीं असा कोणालाहि निश्चय होतो, हे सर्वहि दुःखरूपच आहे याची शाहनिशा होते, सर्वव्यापी परमात्मस्वरूपच एक खरें सुख आहे याचा प्रत्यय येतो व निर्विषय आत्मस्थिति क्रमेण प्राप्त होते.

नह्यधुवैः प्राप्यते हि ध्रुवं तत् ।। (कठ. १-२-१०) –अशाश्वतांनी कधींहि शाश्वताची प्राप्ति होऊं शकत नाही. अनित्य पदार्थांच्या साधनानें त्या अनंत सुखसागर परमात्मस्वरूपाची प्राप्ति होणार नाही म्हणूनच परीक्ष्य लोकान्कर्मचितान्ब्राह्मणो निर्वेदमायान्नास्त्यकृतः कृतेन ॥ (मुंडक. १-२-१२) —अनित्य कर्मसाधनानें अनित्य लोकांचे क्षणभंगुर विषयसुखच प्राप्त होतें असें जाणून त्या निर्विषय परमात्मस्वरूपाचा शाश्वतानंद इच्छिणाऱ्यांनी साधनांसह विषयसुखाचा व तशा भोगप्रधान लोकांच्या इच्छेचा त्याग केला पाहिजे. त्यांच्या त्यागाकरितां पराकाष्ठेचा प्रयत्न अहर्निश चालविला पाहिजे. कोण त्याहि ‘कृतक’ म्हणजे ऐहिक, पारलौकिक जड पदार्थोंनी ‘अकृत’ म्हणजे परमात्मरूप नित्यसुख लाभत नाहीं. नित्यसुख पदार्थांच्या अनित्य साधनांनी व अनित्य पदार्थोंनी प्राप्त होत नाही असे एकदां ठरल्यावर, बाह्य पदार्थांच्या • ठिकाण रागद्वेष ठेवून विषयसुखाची इच्छा कां बरें धरावी ? परहिंसात्मक कमें कां बरें करावीत ! खऱ्या अहिंसेचा व सत्यसमतेचा श्रुतिस्मृतींनी घालून दिलेला धडा स्वपरहितार्थ कां बरें आत्मसात् करूं नये 

संकल्पप्रभवान्कामांस्त्यक्त्वा सर्वानशेषतः । मनसैवेद्रियगामं विनियम्य सम॑ततः ॥ ( ६।२४) 

शनैः शनैरुपरमेद्बुद्ध्या धृतिगृहीतया । आत्मसंस्थं मनः कृत्वा न किंचिदपि चिंतयेत् ।। २५ ।। 

यतो यतो निश्चरति मनश्चंचलमस्थिरम् । ततस्ततो नियम्यैतदात्मन्येव वशं नयेत् ॥ २६ ॥ 

प्रशान्तमनसं ह्येनं योगिनं सुखमुत्तमम् । उपैति शान्तरजसं ब्रह्मभूतमकल्मषम् ॥ २७ ॥ 

युंजन्नेवं सदात्मानं योगी विगतकल्मषः । सुखेन ब्रह्मसंस्पर्शमत्यन्तं सुखमश्रुते ॥ २८ ॥

– मनोवृत्तीपासून अथवा मनाच्या संकल्पापासून उत्पन्न होणाऱ्या विषयवासना त्यागून कोणत्याहि इंद्रियांच्या व्यापाराला अवकाश न देतां,कसलीहि वृत्ति उठू न देतां, कसलीहि कल्पना अशी येऊं न देतां, केवल जाणीवच एक शिल्लक ठेवावी. मनोवृत्तीपासून अथवा संकल्पापासून उद्भवणाऱ्या वासनांचा मनासकट त्याग करून स्वस्थ व्हावें. दोरीवर भासणाऱ्या सर्पादि कल्पनांचा त्याग करून एक दोरीच शिल्लक उरविल्याप्रमाणे कसल्याही कल्पनेशिवाय फक्त जाणीवच एक शिल्लक ठेवावी. केवल जाणीवेंत हे कांहींहि नाहीं. म्हणून धैर्यानें सर्व कल्पनांचा, वासनांचा व मनाचा हळुहळु त्याग करीत, मन जाईल तिथे कल्पना त्यागून फक्त जाणीवच उरवीत निर्विकल्प जाणीवमात्रच शिल्लक राहावें. नित्य असा कांहीं वेळ अभ्यास करीत जावा. अभ्यास वाढल्याप्रमाणें हें सुलभ साध्य होतें. अशी स्थिति ध्यानावस्थेत बाणूं लागली म्हणजे त्या वेळीं कसली कल्पना, कसली वासन स्फुरेनाशी होऊन स्वतःच मन शांत होतें. मन शांत झाल्यानंतर केवळ जाणीवेच्याच रूपानें असणारें परमशुद्ध व अतिपवित्र असें ब्रह्मसुख आपल्य रूपानेंच प्रगट होऊन त्यांत साधक समरसून जातो. ठराविक वेळी नि आसनावर बसून अभ्यास करीत असतां, झालेल्या या निरवधि आनंदा स्मरण मनांत शिल्लक राहातें. जगत्कारण हें असें आहे याची जाणीव उर अमार्गी पाऊल पडत नाहीं. श्रवणमनननिदिध्यासानें असे हें सर्वात्मरू एक आनंदरूप आहे ही जाणीव ठसून आडमार्गी पाऊल पडत नाही. रागद्वेष राहात नाहीत, तात्त्विक विचारानें यथोक्त कर्मे व्यवस्थित पार पडतात | आणि व्यवहारांत सर्वसमत्व बाणतें.

यतो यतो निवर्तेत विमुच्येत ततस्ततः । एष धर्मो नृणां क्षेमः शोकमोहभयापहः ।। (भागवत ११-२१-१८)

—विवेकविचाराने ज्या ज्या पासून मनुष्य परावृत्त होतो त्या त्या पदार्थांच्या वासनेपासून तो मुक्त होतो. निर्विषय असे सुखधन परमात्मस्वरूप हळुहळु प्राप्त करूं पाहातो. शोक, मोह, भय यांचा नाश करणारा हा धर्म | मानवांना अतिशय क्षेमकर व सुखावह आहे.

home-last-sec-img