Literature

आषाढ वद्य अष्टमी

आपण स्वतः आनंदघनरूपी वृक्ष असतांना, केव्हाही नाश पावणारा घाणयुक्त देहच मी आहे असे
समजून घृणा उत्पन्न करणारे घाणेरडे विषयजनित सुख हेच आत्मसुख समजून, निरनिराळ्या प्रकाराने त्याचा
अनुभव घेऊन त्यामुळे शाश्वत सुखसमाधान प्राप्त होत नाही म्हणून त्यापासून परावृत्त होऊन खरे सुख प्राप्त
करून घेण्यासाठी प्रयत्नशील रहावे व उपासना आणि गुरूसेवा संपुर्णपणे करून श्रीगुरू व देवता यांचा

अनुग्रह मिळवून, आपण म्हणजे हा घाणेरडा देह नव्हे, हे सर्व आहे त्याच स्थितीत राहणारा व शेवटी एकमेव
शिल्लक रहाणारा आत्माच होय. हे पुर्णपणे जाणून, झालेल्या चुका दुरुस्त करून पुन्हा अशा चुका होणार
नाहीत अशी दक्षता बाळगुन स्वतःचे रक्षण स्वतःच करणे हे आपले इतिकर्तव्य होय. आपण एका डोंगराच्या
पलीकडे अडकून पडलो होतो. अनेक वर्षे काबाडकष्ट करून तो डोंगर भुईसपाट करून आपण आता
कोणत्याही डोंगराच्या आड नसून पुर्वीप्रमाणे होतो तसेच आहोत असे ज्ञान होतांच आपणास आपल्या
पुर्वीच्या अज्ञानाबद्दल हसू येईल. रज्जूमध्ये जसा सर्प त्रिकालीही असू शकत नाही. त्याचप्रमाणे अहंकारादीनी
देह धारण करणाऱ्या जगतातील सर्व वस्तू खऱ्या आहेत हा भास खरे पाहिले तर पुर्णपणे भासच होय.

*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img