Literature

आषाढ वद्य चतुर्दशी

ज्या आवरणामुळे आत्मस्मृती झांकली जाते तीच ' अविद्या ' होय. अविद्यारूपी आवरण नाहिसे करून
बाहेर पडलेली आत्मस्मृती म्हणजेच ' अहं ' चे स्फुरण होय. अशी आत्मस्मृती झालेल्यांना स्वप्नभासाप्रमाणेच
जगही मिथ्याभांस वाटते. अशावेळेस या जागृतींत होणारे सर्व व्यवहार कोणत्याही प्रकाराने होत असले तरी
ते इतस्ततः पळणाऱ्या मानवी चित्राप्रमाणे म्हणजेच सिनेमाप्रमाणेच निश्चल होत. चित्रसृष्टी व
स्वप्नसृष्टीप्रमाणे जागृत सृष्टीतील कोणताही व्यवहार आभासयुक्त असून त्याची केवळ जाणीवमात्र
सत्यस्वरूपात भासते. ज्याप्रमाणे सुर्यास अभ्र आवरण घालते त्याप्रमाणे मायेने ब्रह्म झाकले जाते आणि त्या
मायेमुळेच जगसृष्टीचा भास होतो.

*' अव्यक्तान्महत् | महतोऽहंकारः | अहंकारात् पञ्चतन्मात्राणि | पञ्चतन्मात्रेभ्यो पञ्चमहाभूतानि |
पञ्चमहाभूतेभ्योऽखिलं जगत् | '*
याप्रमाणे ही मालिका आहे. यावरून विचार केल्यास अव्यक्तापासून क्रमाने उत्पन्न होणारे विशेष
संकल्परूपी महत् नावाचे स्वप्न, त्यापासून पुर्ण विकसित अशा जागृती व तिच्यापासून ब्रह्मांड व्यक्त होते, हे
सर्व परमेश्वराशी संबंधित आहेत. ईश व जीव ह्यामध्ये हा सर्व आभासच होय. यांत आनंद व भावना व्यक्त
असून केवळ आनंदच मात्र झांकला जातो.

*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img