Literature

आषाढ वद्य त्रयोदशी

जगातील आभास किंवा भ्रम नाहिसे केल्यावर आनंदमहोदधीरूपी केवळ संपुर्ण ज्ञानरूप शिल्लक रहाते
त्यास ' जीवेश ' असे म्हणतात. तेथे फक्त जग, चित्त ही नावे शिल्लक न राहता केवळ ब्रह्मच शिल्लक रहाते
त्यालाच ' आत्मसाक्षात्कार ' असे म्हणतात. वाऱ्यामुळे परिणामस्वरूप दिसणाऱ्या लाटा समुद्रावर न
दिसल्यास जसे निव्वळ पाणीच दृग्गोचर होते त्याचप्रमाणे सर्व आभास नाहीसे झाल्यावर आपले मुळस्वरूप
म्हणजेच निर्विकल्प, निश्चल आनंदरूप अशी जी निष्ठा तिलाच ज्ञानी लोक ' दृढापरोक्ष आत्मसाक्षात्कार '
असे म्हणतात.

सर्वांना प्रकाश देऊन स्वतः चिन्मात्र आनंदघन आत्मस्वरूप असलेल्या जागृतीमध्ये सर्वांना साक्षीभूत
असलेल्या आत्मस्वरूपामुळे सर्वांना मीपणाची जाणीव होते. आपण स्वतःस पहाण्यासाठी आरशाचा

उपयोग करतो. आरशामध्ये कान, डोळा, जीभ इत्यादी पंचेज्ञानेंद्रीयेंँ दृग्गोचर होतात व त्याद्वारेंच शरीरस्थ
आत्म्याचे ज्ञान होते, इतर कशाचेही होत नाही. बाह्यत्वचा जाड आहे. त्यामुळे तिला जाणीव नाही. आकाशांत
ढग आल्याने सुर्य आच्छादला जाऊन त्याचा प्रकाश कमी वाटतो किंवा कमी दिसतो. त्याचप्रमाणे वृत्तीचे
अति घन आवरण आल्यास ती आत्मस्मृतीस झाकू शकते. हे आवरण नाहिसे झाल्यासच स्वतःचे ज्ञान होऊ
शकते. आत्मस्मृतीची स्फुर्ती पुर्णपणे विकसीत झाल्यास जागृती प्राप्त होते.

*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img