Literature

आषाढ वद्य दशमी

आपण अद्वितीय अशा आत्मानंदामध्ये सुखी होणे हेच योग्य नाही का ? याशिवाय जलद कार्यकर असे
दुसरे कोणतेच साधन आत्मसाक्षात्कारप्राप्तीसाठी नाही. आत्मसाक्षात्कार म्हणजेच स्वतःची ओळख किंवा
साक्षात्कार. स्वतःची ओळख किंवा साक्षात्कार स्वतःस होण्यास दुसरे कोणते साधन असणार ? स्वतःचे
स्वतःला समजून घेऊन आनंदरूपांत लीन होण्यासाठी दुसरे कोणतेच साधन नाही. शुन्यरूप असलेले
आकाश कोणत्या जाणिवेने दृग्गोचर होते ? इंद्रिये आणि मन यांच्या आकलनशक्तीपलिकडे असलेली वृत्ती.
आनंद हा दृग्गोचर होत नाही. त्याला नाम-रूपही नाही. त्याचे वर्णन करणेही असंभवच. गाढ निद्रेत जशी
फक्त आनंदाची जाणीव असते त्याचप्रमाणे आपल्याच प्रकाशाने आपली जाणीव करून देणारा जो आनंद
तोच ' मी ' होय. एक कल्पना संपून दुसरी कल्पना सुचण्याच्या मध्यंतरामध्ये कोणतीच कल्पना नसून फक्त
आनंदच असणारी जी स्थिती तीच ' मी ' आहे. ही जाणीव सतत असणे व ती वारंवार लक्षात ठेवून ' मी
केवळ आनंदस्वरूपच आहे ' हे जाणून घेऊन निर्विकल्पतेने एकांतात सातत्याने अभ्यास करणे हीच
आत्मसाक्षात्काराची जवळची पायरी होय. यापेक्षा उत्तम मार्ग कोणत्याही ग्रंथातून सांगितला नसावा.

*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img