Literature

आषाढ वद्य द्वितीया

दुष्ट, आततायी, मुर्ख यांना उपदेश करण्याचा प्रयत्न केल्यास ते शांत न होतां अधिकच भडकतात. शांती
धरून त्यांच्यावर क्षमा करणारा ते दुर्बल किंवा मुर्ख समजतात व आपले अनाचारी कृत्य पुरें केल्याशिवाय
रहात नाहीत. क्षमेने ते सुधारत नाहीतच पण उलट क्षमा करणाराचेच शील भ्रष्ट करतात. त्यांना शासन
केल्यानेच दहशत बसते व आपल्या शीलाचेही रक्षण होते. तमोगुणी मनुष्यास योग्य शासन केल्याशिवाय तो
ताळ्यावर येत नसतो. आपणांस जर या आपत्तीपासून संरक्षण मिळवावयाचे असेल तर आपणांस प्रथम '
क्रोध ' च संरक्षक ठरतो. क्रोधामुळे आपले व इतरांचे ताबडतोब संरक्षण होत असते. मुर्ख आततायींवर क्रोध
व शासन यांचा जेवढा उत्तम परिणाम होतो इतका परिणाम शांतीने होत नाही. ज्यांना समजावावयाचे आहे
त्यांना समजते. त्याचप्रमाणे आपली कार्यसिध्दी करून घेण्याच्या दृष्टीने त्यांच्याचसारख्या अचूक व जोरदार
प्रतिकार केल्यासच ते वठणीवर येऊ शकतात. हातात शस्त्र घेऊन मारावयास आलेल्या मदांध आततायी
मनुष्यास उपदेश ऐकण्यास वेळच नसतो. त्याचा त्याचवेळी त्याच्याच कृतीने प्रतिकार केला न गेल्यास
क्षमाशील सज्जनास उपदेश किंवा शांतीपाठ सुरू करण्यापुर्वीच त्यांचे फळ चाखावे लागते.

*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img