Literature

आषाढ शुद्ध एकादशी

आजपावेतो ज्या ज्या व्यक्ती गुरू होऊन गेल्या त्याचे मुळ कारण उपासना मार्गाने ज्ञानप्राप्ती करून घेणे हेच होय. हे मान परमात्मकृपेशिवाय प्राप्त होत नाही. गुरू या भावनेस किंवा पदास हिरण्यगर्भच मुळ कारण आहे. गुरूच्या कृपाकटाक्षाने व दिव्य सान्निध्याने शिष्यहि गुरु होऊ शकतात. परीस कधीही लोखंड होत नाही तर परिसाच्या स्पर्शाने लोखंड मात्र सोने होऊ शकते. पण लोखंड परीस होऊ शकेल काय ?कदापीही नाही. गुरु परिसापेक्षा श्रेष्ठ होत. त्याचप्रमाणे गुरूने शिष्यास बोध केल्यावर तो शिष्य गुरू होऊन ती परंपरा वाढत वाढत शिष्य, प्रशिष्य हे सर्वजण गुरूपदवीस प्राप्त होतात. अशा दृष्टीने आत्तापर्यंत झालेले सर्व ज्ञानी उपासना कृपेमुळे किंवा उपासनेमुळे प्राप्त झालेल्या ज्ञानामुळे गुरूपद प्राप्त करून घेऊन, अापल्या गुरूकडून ज्ञानोपदेश प्राप्त करून मुक्त झाले आहेत हे सर्व गुरूच होत, म्हणूनच या सर्वांची पूजा करावी. गुरू, परम गुरू, परमेष्टी गुरू, परात्प गुरू अशा अनेकरितीनें आपण गुरूंना संबोधू शकतो. अशाप्रकारे विचार केल्यास आदिनारायणापर्यंत सर्व गुरूच होत. म्हणूनच देवतांची आराधना करावयाची. श्रुतीत ज्यांचे वर्णन केले आहे त्या सर्वांची आराधना करून ज्ञानप्राप्ती करून घेतली पाहिजे.

*श्री प.प सद्गुरु भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img