Literature

आषाढ शुद्ध चतुर्थी

*’ अक्षरं ब्रह्मपरम् ‘* हेंच गुरूचे स्वरूप. शब्द व्युत्पत्तीच्या दृष्टीनेही दोन्ही एकच होत. ‘ ब्रह्मत्वात् ब्रह्म ‘ गौरवात् गुरू : ‘ विशेषणरहित व मोजमापरहित महान अ-वस्तु यासच ‘ ब्रह्म ‘ ‘ गुरू ‘ अशा एकाच अर्थाचे दोन शब्द रूढ आहेत ते अत्यंत महत्वाचे असल्याने त्या वस्तुचे यथार्थ ज्ञान अल्पज्ञ मानवाच्या अल्प बुध्दीस समजणे कठीण आहे. मन व वाणी मात्र अनंत, विशाल नसलेल्या सोपाधिक रूपास ओळखू शकतात. मनास गुरूच्या यथार्थ स्वरूपाची कल्पना अगम्य असल्याने थोडीबहुत कल्पना येण्यासाठी म्हणून ‘ गुरू र्ब्रह्मा गुरूर्विष्णु : ‘ असे त्रिमुर्तीच्या साम्याचे वर्णन करून शेवटी *’ गुरू: साक्षात् परब्रह्म ‘* गुरूच ब्रह्मचैतन्य होय असे ह्या श्लोकांत सांगितले आहे. अर्थात परब्रह्मस्वरूपच गुरू असे असल्याने गुरूची आराधना श्रेष्ठतर होय. यामुळे त्रिमुर्तीचीही आराधना आपोआप होऊ शकते. हे तत्व उलगडून सांगण्यासाठीच श्रीदत्तात्रयेचा अवतार आहे. इतकेच नव्हे तर उपाधीरहित विशिष्ट असे जे रूप तें गुरूच होय, गुरूतत्व अत्यंत गहन आहे.

*’ नेति नेति श्रुतिर्ब्रूते तस्य नेति नेतीत्यादेशः प्रवचनेन प्रोवाच | ‘* दृष्टीसमोर किंवा मनोबुध्दीच्या समोर कोणतेही स्वरूप आल्यास ‘ नेति नेति ‘ हे नव्हे हाच गुरूस्वरूप निर्णयासाठी सल्ला आहे. सद्गुरूचे खरे स्वरूप पुर्णपणे लक्षात आल्यास त्याचे वर्णन वाचा करू शकत नाही, ती बंदच होत.

*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img