Literature

आषाढ शुद्ध त्रयोदशी

परमात्मा भक्तांच्या बाबतीत अतिशय दर्याद्र आहे. ‘कृपाळूपणे अल्प धारिष्ट्य पाहे |’ या श्रीसमर्थोक्तीप्रमाणे परमेश्वर भक्ताबाबत कृपादृष्टी ठेवूनच अल्प स्वल्प परिक्षा घेत असतो. अशा ह्या लहानशा परिक्षेतही भक्त उत्तीर्ण न झाल्यास त्याला जबाबदार कोण? एखाद्या फळाची परिक्षा करताना ते पिकले आहेत का नाही हे पहावे लागतेच की नाही? परमात्म्याचा अनुग्रह हा सर्वश्रेष्ठ अनुग्रह होय. परमात्मा म्हणजे परम+आत्मा, परमात्मा असे असल्याने त्याचा अनुग्रह सुद्धा श्रेष्ठ प्रतीचाच असतो. मोठ्याकडून देण्यात येणारे दान सुद्धा मोठेच असणार. एखाद्या राजास कोठेही दानधर्म करावयाचा झाल्यास तो भोपळा किंवा चार पैसे देईल काय? असे करणे हा राज्यपदाचा अपमानच नाही का? यासाठी मोठे लोक आपापल्या स्थानास अनुसरुन योग्य असे दान देत असतात. सद्गुरू हे सर्वश्रेष्ठ होत. त्यांना त्यांच्या पदाचा अभिमान आहेच. तसा अभिमान नसल्यास ही सृष्टीच नाश पावेल.

परमेश्वराच्या ठायी चित्त एकरूप करून आराधना करणाऱ्या भक्ताला कोणत्याही बंधनाची वा विघ्नांची बाधा न होता तो दिव्यपद प्राप्त करून घेऊन आनंदीत होतो. पण आपण सर्वजण अशी भक्ती करू शकतो काय? भुक लागल्यावर आपल्या तोंडात परमेश्वराचे नाव येते काय ? राग आल्यावर त्याची आठवण होत नाही. असे असल्याने मग त्याची कृपा कोठून होणार?

*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img