Literature

आषाढ शुद्ध पंचमी

ब्रह्मासंबंधी शेवटचे वाक्य म्हणजे मौनच व तेंच गुरूचे स्वरूप. या संबंधात ‘ यतो वाचो निवर्तन्ते ‘ असे श्रुतिवाक्य आहे. त्या स्वरूपाचे वर्णन वाणी करू शकत नाही. त्यास शब्दजल उपयोगी पडत नाही. वाणी उत्पन्न करणारे मनही त्या स्वरूपाचे आकलन करू शकत नाही व दाखवुही शकत नाही. म्हणून मौनानेच ते जाणले पाहिजे. आपल्यामध्ये तसा अधिकार आहे अशी धारणा करून घेऊन आग्रहाने श्रुतिमातेला त्रास देण्याचा प्रयत्न केल्यास श्रुति ‘ नेति, नेति ‘ असे म्हणते. जगांत उत्पन्न झालेल्या सगळ्या वस्तु आपल्या नजरेसमोर आणून ब्रह्म किंवा गुरूचे स्वरूप असे आहे काय ? असा प्रश्न केल्यास त्या ‘ हे नव्हे हे नव्हे ‘ हेंच श्रुतिमातेचे उत्तर. ह्यास ‘ अतद्व्यावृत्तिलक्षण ‘ म्हणतात. श्रेष्ठ वस्तुंचे वर्णन करीत राहिल्यास त्या वस्तुंचे श्रेष्ठत्व कमी होत जाते, कारण एखादी लहान वस्तु श्रेष्ठ वस्तुंत सामावून जाते. बुद्धीला पटणाऱ्या वस्तुंचे गुणधर्म अत्यंत अल्प आहेत अशा वस्तुंची व्याख्या करण्यात श्रेष्ठत्व कसे प्राप्त होणार ? म्हणून मौनमूलक अशी गुरूंची व्याख्या होते. मन, वाणी ही विरघळुन त्या वस्तुंत एकरूप होऊन गंभीर असे मौन उद्भवते. त्यासच ‘ गुरूत्व ‘ किंवा गुरूस्वरूप म्हणता येईल. येथे महत्व, गांभिर्य किती आहे याचा हिशोब तुम्हीच ठरवूं शकता. अशाच गुरूचा आश्रय निरंतर घेणे आवश्यक आहे.

*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img