Literature

आषाढ शुद्ध सप्तमी

श्रीगुरू सर्वांपेक्षा श्रेष्ठ होत. सर्वांपेक्षा जास्त शक्तिमान, सर्व व्यक्तींत मोठे, सामर्थ्यसंपन्नामध्ये सामर्थ्यवान असणारापेक्षाही परमश्रेष्ठ असे श्रीगुरूच होत. श्रीगुरू सर्व देवतांपेक्षाही श्रेष्ठ होत असेच म्हटले जाते. सर्वसारभूत तत्वज्ञान, सत्यवान, विशेष अशा विभूती, विशेष शक्तिशाली व्यक्ती अशांनाच आपण गुरू म्हणून संबोधित असतो. सर्वापेक्षा श्रेष्ठत्व व सत्त्व असणे हेंच त्यांचे वैशिष्ट्य असते. या दृष्टीने विचार केल्यास गुरू शब्दाचा अर्थ ‘ सर्वापेक्षा श्रेष्ठ ‘ असा आहे असे म्हटले तरी चालेल. सर्वापेक्षा गुरू शब्दाचा अर्थ महत्वाचा आहे असे ठरल्यानंतर सहजच *’ गौरवत्वात् गुरूः ‘* हे डोळ्यासमोर आपोआपच येते.

सर्वसाधारणपणे ‘ गुरू ‘ हे एकमेव म्हटल्यानंतर त्यांचीच आराधना मुख्य होय अशी कल्पना करून घेऊन प्रचलित देवदेवतांची आराधना सोडून द्यावयाची की काय ? हा प्रश्न कोणीही विचारील. याकरिता त्याचे निरसन करणे अत्यंत अगत्याचे आहे.

गुरूपरंपरा ही ‘ आदिनारायणापासून ‘ सुरू झाली आहे. श्रीशंकर सांप्रदायातही *’ नारायणश्च गुरूः ‘* असे म्हटले आहे. श्रीसमर्थ सांप्रदायातही ‘ *आदिनारायणं विष्णुं ‘* अशीच गुरूपरंपरा सुरू होते. यावरून आदिनारायणापासूनच गुरूपरंपरा निर्माण झाली आहे हे सहज ध्यानी येते. देव, गुरू, आचार्य हे सर्व गुरूपासून भिन्न नाहीत. ब्रह्मा, विष्णु, महेश या त्रिमुर्ती गुरूच होत. आदिशक्ती ब्रह्मस्वरूपी असून तिलाही गुरूपद प्राप्त झाले आहे.

*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी* *महाराज*

home-last-sec-img