Literature

उत्तम गुण

क्षणक्षणां रुसों नये । लटिका पुरुषार्थ बोलों नये । केल्याचीण सांगों नये । आपुला पराक्रम ।। २।२।११. कोणाचा उपकार घेऊं नये । घेतला तरी राखों नये । परपीडा करूं नये । विश्वासघात  १७ व्यापकपण सांडूं नये । पराधेन होऊं नये । आपले ओझें घालूं नये । कोणीएकासी ॥ १९ ॥ धूम्रपान घेऊं नये । उन्मत्त द्रव्य सेऊं नये । बहुचकासीं करूं नये । मैत्री कदा ॥ २५ ॥ कामेवणि राहों नये । नांच उत्तर साहों नये । आसुदें अन्न सेवूं नये । वडिलांचेंहि २६तोंडी शिवी असों नये । दुसऱ्यास देखोन हांसों नये । उणें अंगी संचारों नये । कुळवंताचे ॥ २७ ॥ ( कोणी ) एकाचा घात करूं नये । लटकी ग्वाही देऊं नये । अप्रमाण वतों नये । कदाकाळीं ॥ २९ ॥ स्नान संध्या सांडूं नये । कुळाचार खंडूं नये । अनाचार मांडूं नये । चुकुरपणें ॥३४॥ देवाचा नवस बुडऊं नये । आपला धर्म उडऊं नये । भलते भरीं भरों नये । विचारेंवीण ॥ ३६  गुरु विरहित असूं नये । नीच यातीचा गुरु करूं नये । जिणें शाश्वत मानूं नये । वैभवेंसी ॥ ३९ ॥ सत्यमार्ग सांडूं नये । असत्य पंथें जाऊं नये । कदा अभिमान घेऊं नये । असत्याचा ॥४०॥

home-last-sec-img