Literature

उपनिषदे

श्रीसमर्थांच्या प्रेरणेने येथे काहीतरी वाङ्मयसेवा व्हावी म्हणून आपण सर्व जमलो आहोत. ज्ञानरहित तळमळ जाणार नाही. सारखी होणारी तळमळ, असमाधान, अशांति जीवनांत आहे ती ज्ञानाने शांत होते. ज्ञानाशिवाय जीवाला शांति नाही. ज्ञानरहित मनुष्य पशुतुल्य आणावा ज्ञानानेच मोक्षाची प्राप्ती म्हणजे परमात्म्याची प्राप्ती. निरतिशय आनंदाची म्हणजे सर्वाधिक मंगल निरवधि सुखाची प्राप्ती करून घेणे म्हणजेच ‘मोक्ष’ प्राप्त करून घेणे. मोक्ष म्हणजे बंधनापासून सुटका. बंधन म्हणजे संकल्प. संकल्प बंधनकारक. वासनेने जीव बद्ध आहे. ‘मी देह मज बंधन । ‘ मी देह आहे. विषयसुखामुळेच, जगाच्या सुखामळेच मी जगत आहे वगरे ह्या सर्व वासना बंधनकार आहेत. ह्या सर्व वासनापासून सुटका करून घेणे हे ज्ञान आहे. या तत्त्वाची ओळख करून न घेता, जशी मुलें इतस्तत: फिरूं लागतात तसेंच खऱ्या सुखाची जाणीव नसल्यामुळे हे सर्व जग मृत्युभयाने व्यापलेले आहे. भये व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे। जे आपलेच शाश्वत आनंदरुप आपणांस प्राप्त होत नाही, त्या अक्षयसुखाची ओळख आपणांस पटत नाही तोवर, ते असूनहि त्याची भावनाच आपणास नसल्याने विस्मृतिमुळे एवढा घोटाळा होतो. अशा रितीनें हे सर्व जग मृत्युरुप, भयरुप आहे. कोठपर्यंत? तर आत्मज्ञान होईपर्यंत. दु:खाचे तरंग अलोट, असंख्य येत असतात. जग हे विस्तवाचे अंथरुणच । आहे. ह्यात सुखनिद्रा कसली? आपण हे सर्व मानलेले आहे. ह्या अंज्ञानाच्या निवृत्तीसाठी ज्ञानप्राप्तीची आवश्यकता! हे सर्व जग कसे झाले ? ह्याचा कर्ता कोण? ह्याची जाणीव करून घेणे म्हणजेच ज्ञान तें पूर्णरूप. ज्याने जीव मुक्त होतो तें, तेंच पूर्णरूप असें वेदांत म्हटले आहे. ज्यायोगे तें ब्रह्मरुप, ज्ञानस्वरुप, तो अनंत आनंद जाणला जातो तो वेद.

श्रुति सुद्धा म्हणते- ‘पूर्णत्वात पुरुषः। तें पूर्णरूप मी जाणतो. परमात्म्याचे जे ज्ञान वेदरूपाने सांगितले आहे तो परमात्मा अगाध, अगम्य आहे. मनाची धांव तेथे पांगुळते, खुंटते. वेदांत आत्मज्ञान सांगितले असल्याने ते परमात्म्यानेच सांगितले आहे हा सिद्धांत आहे.

उपनिषदांतहि आत्मज्ञानच, पूर्णस्वरुपाचे ज्ञान सांगितले आहे. श्रीरामाने सुद्धा ‘मुक्तिकोपनिषदात’ हेच सांगितले आहे. मी कोठे असतो? कोठे सांपडतो? कोणत्या वाङ्मयांत माझी ओळख होते? । ‘मी उपनिषदांत आहे’ असे श्रीमारुतीरायास सांगितले आहे.

‘मी जेणेकरून ह्या बंधनातून मुक्त होईन असा उपाय मला सांगा’ असे श्रीमारुतीरायाने विचारले असतां श्रीराम सांगतात याज्ञवल्क्य म्हणतात, खरें खरें उकलून सांगणे हा गुरूचा गुण आहे. माझा जर तत्वतः ओळख करून घ्यावयाची असेल तर ‘वेद’ बघ. वेदाच्या शेवटी आत्मज्ञान झालेले आहे. माला उपनिषद’ म्हणतात. ‘उप’ म्हणजे ‘समीप’ उप हे पद उपनिषदांस का आहे ? आत्मज्ञान प्राप्त करून घ्यायचे असेल तर गालाच शरण जायला पाहिजे. हे गुरूगम्य आहे. तें आत्मतत्त्व, खरें संख, खरा आनंद जाणण्यासाठी हातांत समिधा घेऊन गुरुकडे जावें. श्रीगरुस श्रोत्रीय व ब्रह्मनिष्ठ अशी दोन पदे आहेत. श्रुतिस्मृतींचे ज्याला पूर्ण ज्ञान आहे तो नुसता शास्त्रज्ञ असून उपयोगी नाही. खिरीत पळी सारखी बुडून असते. ती खिरीत सदैव असूनहि तिला खिरीची चव माहित नसते. नुसते शास्त्रज्ञान विपुल आहे पण अनुभवाचा ओलावा त्यात नसेल तर त्यात मन रमत नाही, एखाद्या उद्यानाचे नुसते भरपूर वर्णन आणि प्रत्यक्ष पाहून अनुभव घेणे म्हणजेच अनुभवाचा आनंद त्यात ओतप्रोत भरलेला असतो.

गुरु गुरुब्रह्मा गुरुविष्णुः गुरुर्देवो महेश्वरः । गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः॥‘ हया वृत्तीचा निष्ठावंत असावयांस पाहिजे. तो आत्मानुभवी, आत्मसुखाने तृप्त पाहिजे. त्याच्याकडे पाहिले की त्यात वैराग्य डोकावते, हे समाधान मिळाले पाहिजे.

संन्याशालाच उपनिषदांचा अधिकार. हे ज्ञान शिष्यास त्याने शास्त्र विचारल्यावर, तो शरण आल्यावर, सोने बावनकशी आहे की नाही हयाप्रकारे त्याला कसाला पडताळून पाहून मग बोध करावयाचा असतो. जो त्रिविध तापे पोळला’ तोच योग्य.

या आत्मज्ञानाचा अधिकारी कोण? तर साधनचतुष्टयसंपन्नच त्याचा अधिकारी. साधन, नित्यानित्यविवेक, शाश्वत-अशाश्वताचा निवाडा करणारा. जे उत्पत्तिनाशयुक्त्त ते अनित्य. म्हणून तेथे शाश्वत सुखाची, नित्यसुखाची प्राप्ती होऊ शकत नाही. मग ते नित्यसुख प्राप्त करुन घेण्याकरीता गुरु केलाच पाहिजे. त्यासाठी गुरुकडे चला!

जे उत्पन्न झालेले ते ‘सर्व’ कार्य आहे व अनित्य आहे. म्हण ‘नित्य ‘ हे दुसरे काही तरी आहेच व जे कारणरूप तेच नित्य होय

‘ज्याने विठ्ठलमात्रा घ्यावी । त्याने पथ्य सांभाळावी।’ हे परमात्मसुख तुला पटले असेल तर दुसरीकडे जाऊ नकोस. सुख पाहिजे ना! मग तुझे मन, इंद्रिये सर्व परमात्म सुखानेच परिपूर्ण भरलेली पाहिजेत. सुख म्हणजे राजमार्ग. परमात्म्याकडे जावयाचे. दुसरीकडे जावयाचे नाही. तिकडे डोळे झांकणी करावयाची. पुन्हा तिकडे वळावयाचे नाही. सुख म्हणून तिकडे न बघता जेवण, स्नान, संध्या इत्यादि व्यवहार म्हणूनच करावयाचे. स्नानाने बाहयशुद्धी व संध्या म्हणजे परमात्मप्राप्ती. दोन्ही सुखच.

चित्रांत पाण्याचे दृश्य पाहिल्यावर त्याचा भास होतो पण पाणी प्यायला मिळत नाही. तसेच जगात सुख भासते, दिसते पण अनुभवास येत नाही, जे सुख अनुभविल्यानंतर विरस अनुभवावयास मिळतो हेच जर लक्षात ठेवले तर पुन्हा त्याच्या नादी लागणार नाही. हे अथवा असे पारलौकिक सुख जर दैहिक असेल, ते बाहयपदार्थापासून प्राप्त होत असेल तर ते शेवटी ऱ्हास पावत जाऊन क्षीण होत जाते. पण सुखाची व्याख्या काय? जे अक्षय्य आहे ते. आणि हया सुखाला क्षयरोग झाला तर?

‘जे शाश्वत, अक्षय तेच सुख ‘ असे संत म्हणतात. संत म्हणजे जो शाश्वत अशाश्वताचा निवाडा करतो तो संत जाणावा. ‘जो नित्य शाश्वत वस्तु कारणरूप आहे तीच हृदयाशी बाळगून, अनित्य सर्व जाणून घेऊन ते सर्व किटाळ काढून हृदयसिंहासन चांगले स्वच्छ करून, शाश्वत सुस्वरूपी परमात्म्याची त्यावर स्थापना करतो तो विवेकी ! जे भ्रांत, विषयी ते बाहयसुखालाच लोलूप असतात. कस्तुरीमृगाला कस्तुरीचा वास येतो परंतु तो मात्र तो शोधण्यात सबंध रान हिंडत असतो. ‘तुझे आहे तुझपाशी । परी जागा चुकलासी ।’ लालयेत् चित्तबालकम् । ‘लहान मुलांना आपण हे खाऊ नको, ते खाऊं नको असे सांगतो. तसेच मनाला युक्तीने गोंजारून विषयसुख काढन घेऊन खडीसाखरेच्या खड्याप्रमाणे परमात्मसुख त्याच्या हातावर ठेवावें.

यासाठी शम, दम पाहिजे. प्रथम ‘शम’ पाहिजे. मन हे चंचल आहे त्याला अभ्यासाने काबूत ठेवावें. ‘मन गया तो जाने दे । मत जाने दे शरीर। अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येण च गृह्यते।’ निग्रहानें, विवेकानें, अभ्यासाने मनाला आवरून धरावें, रोग्याला जसें कुपथ्य होऊ नये म्हणून आपण आवरून धरतो की नाही तसेंच.

जगांत पहा ! राजा असो, महाराजा असो, त्यालाहि दुःखाचे क्षण येतातच, सर्व अनुकूलता असतेच. निसर्गाकडे पहा. उन्हाळा आहे, पावसाळाहि आहे. तितिक्षा म्हणजे सहनशीलता व उपरति म्हणजे आत्मस्थितीचा अभ्यास करीत, सेवा करीत, थोडक्यात सांगावयाचे म्हणजे काम करून मनाची बाह्य धांव थांबवून ते अंतर्मुख करणे, पश्चात्ताप करणे, संतसंगतींत भक्तिप्रेमाचा अभ्यास करून आतां पावेतोंचे सर्व सोड़न ह्या पुढील काळ सार्थकी लावणे.

कित्येक वेळी ‘आमचेच गुरु पूर्ण विद्वान कशावरून ‘ वगैरे शंका येतात, त्या नकोत. श्रद्धा पाहिजे. असुया नसावी. शिष्य कसा शरण यावा तर निर्ममो निरहंकारः।’ अहो, मग काय, गेलेच कि सारें! गुरुची आज्ञा अनन्यभावाने, श्रद्धेने पाळावी. ही श्रद्धा उत्कट पाहिजे. समाधान पाहिजे. अरे ! गुरुसन्निध राहून तूं शाश्वताचे साधन करतो माहेस मग असमाधान कां? मी जर श्रद्धेने साधन करीत आहे तर बाज ना उद्या सुखप्राप्ती होणारच.

घडा भरतां भरतां भरेल. तूप खाल्ल्याबरोबर रूप कसे येणार? जर अश्रद्धा निर्माण झाली तर गुरुचा, शास्त्रांचा द्वेष करतात. तसें करू नये. मुमुक्षूत्व पाहिजे. मृगजलापासून निसटून खऱ्या सुखाची ती इच्छा पाहिजे. याच क्षणी ‘याच जन्मों, येणेंची काळे संसारीं होईल निराळे । ‘ असे पाहिजे. ‘पाहीन मुक्तीचा सोहळा ।’ असें पाहिजे.

सम्यक् प्रशान्तचित्ताय –.’ तो कसा आहे? हे खावें, तें खावें, इकडे तिकडें मन धांवत आहे. असा शिष्य तो मारून मुटकन आला आहे हे पहावें, वैराग्य उत्पन्न होते पण तें टिकतें कां? कांही वेळा बायको वगैरे भांडली म्हणजे माणसें आमच्याकडे येतात. पण ती जरा गोड बोलली म्हणजे परत जातात. ज्याच्या चित्तांत विषयाचे चिंतन असत नाही तोच शांत चित्त’ म्हणवून घेतो.

मनाचा निग्रह पाहिजे. विषयांत सुख नसून तो आभास आहे. जसें फूल तोडून घेतले तर त्याचा वास क्षणिक येतो पण पुढे टिकत नाही तसेंच ह्या जगातलें सुख आहे. हे पहा, स्वप्नांत दिसणारे पद जागृतींत कधी तरी अनुभवावास मिळतें कां? कधीच नाही, तो एक आभास आहे.

‘उपनिषद ‘ गुरुजवळ जाऊन शिष्याने हे ऐकावयाचे असते. ‘उप’ म्हणजे गुरुजवळ जाऊन त्यांच्या ठिकाणी अचल श्रद्धा ठेवून त्यांची सेवा करीत रहावयाचें. सेवेने हृदय उमलतें. सेवेने आपोआपच अनुग्रह होतो. मुद्दाम होऊन तो उचलून डोक्यावर घेतात त्यात काय आहे ! सेवा चार प्रकारच्या, स्थान, भाव, अंग व आत्मा.

स्थान पवित्र ठेवणे, छाट्या वगैरे स्वच्छ ठेवणे. सद्गुरु हे आनंदरूप आहेत असा विश्वास, श्रद्धा ठेवणे ह्या निष्ठेला भाव’ म्हणतात. ‘तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया ।‘ वेळ, काळ पाहून गुरु प्रसन्न असतांना तेहि विनयाने, आपल्या निष्ठनें, सेवेनें, निश्चयाने। सद्गुरु मुखांतून निघणारे शब्द आहेत त्यांवर विश्वास ठेवला तर निश्चयाने मोक्षप्राप्ती होते. हा ‘नि’ चा अर्थ आणि ‘षट’ म्हणजे वेगळं करणे, शिथिल करणे व नष्ट करणे. संसाराच्या मोहापासून, देहात्म भावापासून मोकळे करते आनंदाचे आभास नष्ट करते. हा पडदा गेला की आनंदाची प्राप्ती आहेच.

श्रीमारुतीरायाला श्रीरामानी सांगितले की “तू अज्ञानाचा नाश करण्यासाठी वेदांचा अभ्यास कर.’

पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते।’ आपण जे बघतों की नाही, तें सारें उत्पत्तियुक्त, विनाशी व केलेले म्हणजेच कार्य. तेव्हा ह्याला कारण कांहीतरी असेलच असेल असें श्रुति सांगते. कार्यापूर्वी असणाऱ्या कारणाचा शाश्वत आनंद होतो तो मिळवलाच पाहिजे. गाय

मातीपासून तयार होणारें मडकें मातीपासून वेगळे कसे होणार? म्हणून जे कारण स्वमात्र त्यापासून झालेले पूर्णच आनंदरूप असणार. मनुष्याची संतति मनुष्यच. सिंहाचा छावा सिंहच. परमात्मतत्त्वाचे तुझ्या शरीरांत असणारे बिंब, सूर्यात असणारे व इतर कोणत्याहि विकार आकारांत असणारेंहि तेच हे कारणरूपहि पूर्णच. बियापासून निघणारा कोंब तद्रूपच असतो. हे जग ज्यामुळे पूर्ण, तें कारण रुपहि पूर्णच. दागिना सुवर्णरूप आहे. सोने आहे म्हणून दागिना आहे. हे जग ज्यामुळे सुखरूप बाटतें तें कारणहि सुखरूपच. तें तेवढे निवडून घेतले म्हणजे झाले! वर जो ‘पूर्णस्य पूर्णमापाय पूर्णमेवावशिष्यते।’ सांगितला आहे तो तेच सांगतो.

सिंह सोन्याचा केला तर त्यापासून भीति वाटेल कां? तो आपल्या घरी ठेवून ते आपलें वैभव वाटेल. तसेंच जर हे जग सुखरूपींच आहे. म्हणन अनभव आला तर तें परमात्मस्वरूप तुम्ही ओळखलें तर भीति कसली? असें सोन्याचे फूल करून ठेवले तरी तुम्ही तें हुंगणार नाही तसेंच जय हे जग तुम्ही पाहूं गेलात तर या जगातील दुःखाची कल्पनाहि तुम्हाला न देता केवळ आनंदाची निर्ममत्वाची, पूर्णानंदाची प्राप्तीच. उपनिषदे हेच सांगतात.

‘मी’ हे ज्ञानरूप आहे. मी म्हणजे आत्मस्मृति. मी सुखी आहे. म्हणताना सुख तुझ्यांतूनच निर्माण झाले की नाही? जसा पाण्याचा तरंग तद्रूपच असतो तसे मी ही स्थिति ज्ञानानंदसमच. मग ही परमानंद स्थिति. ‘तयां पाहता पाहता तेंचि झालें।’ दृश्य असलेले हे जे रूप में ओळखून त्यांतील शाश्वत आनंद जाणून तद्रूपाने राहाणे हेच कार्य.

उपासनेचे खरे स्वरूप व ज्या शाश्वत आत्मीय आनंदाची ओढ आपणाला लागलेली आहे, तें तत्त्व उपनिषदांत सांगितले आहे. उपनिषदांच्या अध्ययनाने आत्मसाक्षात्कार होतो.

गुरुजवळ जाऊन त्यांना शरण जाऊन त्यांना प्रश्न केले म्हणजे अज्ञान, भ्रांति वगैरे नष्ट होऊन गुरुकृपेनें निरतिशय आनंदाची प्राप्ती होते. वेदांताचा अधिकारी कोण? तर साधनचतुष्टय साधणाराच ह्याचा अधिकारी होतो.

आचार्यांनी ‘ ईशावास्य’ अर्थाला प्रारंभ करण्यापूर्वी उपोद्घात केला आहे त्याचा विचार प्रथम करूं या!

‘ईशावास्यमिदम् ‘ हे मंत्र कर्मप्रधान नाहीत. उपनिषदाच्या उपोद्घातांत कर्म को भक्ति आहे ? हे उपनिषद शुक्ल यजुर्वेदाचे आहे. यजुर्वेद दोन. कृष्ण व शुक्ल. सूर्यापासून याज्ञवल्क्याने मिळविलेला शुक्ल यजुर्वेद. काण्व उपनिषद संहितेत येत नाही पण हे उपनिषद संहितेंत येते. हा त्याचा चाळीसावा अध्याय आहे. संहितेत उपनिषद कर्मप्रधान आहे म्हणून याचा ज्ञानप्रधान अर्थ लावू नये म्हणून काही म्हणतात, पण आचार्य म्हणतात की उपनिषद ह्याचा अर्थच ज्ञानप्रदायक. तेव्हा कात ह्यांचा उपयोग नाही व तसा अर्थ कोणी करूं नये. ज्याची प्राप्ती कर्माने होत नाही अशा आत्मस्वरूपाची लक्षणे उपनिषद दर्शवित असल्याने आम्ही ह्यांचा अर्थ आत्मज्ञानपर केला आहे. कर्मशून्य, कर्मरहित, कर्मअनपेक्ष. कर्माची अपेक्षा ज्याला नाही, कोणत्याहि कर्माचे फळ जें होत नाही त्याची साधने उपनिषदांत आहेत.

उपनिषदाचा हेतु आत्मप्राप्तीची साधनें सांगणे. त्याचे साधन कर्मत्याग आहे. तेव्हा त्याचा अर्थ कर्मप्रधान लावल्याने तें यथार्थ होणार नाही. हे उपनिषद संहितेत मोडत असले तरी तें उपनिषद असल्याने व त्याचा अर्थ आत्मप्राप्ती व साधन कर्मत्याग असल्याने त्याचा अर्थ आम्ही कर्मप्रधानयुक्त लावीत नाही.

कर्माने ज्या सुखाची प्राप्ती होते त्याला देह, इंद्रिये पाहिजेत. बाह्य पदार्थापासूनच, विषयांपासून सुख होते अशी वासना पाहिजे व ज्ञानप्राप्तीला तर हयाची आवश्यकता नाही. बाहय इंद्रिये, विषय, पदार्थ, मनोधर्म, वृत्ति या सर्व अशाश्वत आहेत. मग त्यापासून शाश्वत सुख कसे मिळणार? वाहत्या पाण्यांत एक आचमन करून दुसरे आचमन करीपर्यंत दुसरेंच पाणी असते तशाच हया वृत्ती चंचल असतात, बदलून असतात. लहान मुलास जसें आतां एक तर मग दुसरें लागते. आतां दूध प्यावेसे वाटते तर मग ताक प्यावेसे वाटते. हे सारे अशाश्वत आहे. तेव्हां नष्ट होणाऱ्या इंद्रियांपासून, विषयांपासून, वृत्तीपासून, पदार्थापासून प्राप्त होणारे सारें चंचल, अशाश्वत, क्षणभंगुर आहे.

तात्पर्य, हे आत्मसुख नित्य, निर्विकार, जन्मरहित आहे. परमानंदकारक शाश्वत आनंदाची प्राप्ती आपणास इष्ट असेल तर अशाश्वत पदार्थापासून, बाहयपदार्थापासून ती कशी होणार ? कर्म कां करावयाचें ? ब्रह्मचर्याश्रम, गहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम व संन्यासाश्रम असे हे चार आश्रम सांगितले आहेत. बाबा! असा हा धोपट मार्ग आहे. ज्यांना विषयाची इच्छा आहे त्यांनी विषयांत सुख नाही हे जाणून त्याचा त्याग करण्याकरता आहे. तुला वैराग्य हवे आहे का ? नाही तर पुराणवैराग्य असावयाचे, नाही तर श्रीधरस्वामींनी सांगितला म्हणून वाटते. पावसाळ्यांतल्या कोंबासारखे व्हावयाचे !! तुझ्यांत । त्याचे बीज आहे का? हे जग म्हणजे विषयसुखाचें प्रलोभन. तुला खरेच वैराग्य असेल तर दगडावर पडलेल्या अग्निसारखे होईल. ज्याला वैराग्य प्राप्त झालें तो सुख म्हणून जगाकडे पहाणारच नाही. तुला बासुंदी वगैरे पंचपक्वान्ने समोर असतानासुद्धा वासना नसेल तरच उपयोग; नाही तर चोरून खाण्याची इच्छा व्हायची. मग सरळ जेवावयास बैस, खरेच वैराग्य असेल तर निवृत्तिमार्ग.

कर्माच्या त्यागांतून शेष उरतें तेंच खरें सुख. तेच आत्मरूप. म्हणून शाश्वत. आनंदाची प्राप्ती ना कर्मानें, ना देहानें, ना जन्माने, ना यज्ञानें. कर्माने सारे ऐहिक सांगितलेले आहे. जे जगाच्या उत्पत्तीपूर्वी होतें तें आनंदघन, आपले स्वरूप, त्यासाठी ह्याचा काय उपयोग? दुःखनिवृत्तीसाठी सुखाची इच्छा दुःखाच्या अभावांत कोणाला सुखदायीं होईल कां? मला कडबोळी खावीशी वाटतात. केव्हां? वृत्ती उठते तेव्हां पण तेथे वृत्तीच नाही मी कोण? तर वृत्तींच्या पूर्वीचा. मग तेथे काय? एक आनंदच. वृत्तीचे चांचल्य जगद्भाव, विषयवासना, पदार्थसुख निर्माण करते. मग वृत्तीच नष्ट झाल्यानंतर तेथें हैं दुःखकारक कसें असणार? म्हणजेच वृत्ती ह्याला कारण. मग ती नष्ट झाल्यावर मी एक, अखंड, निर्गुण निराकार आनंदरूपी उरतो. मी अनेक देह धरले व सोडले. कां? म्हणाल तर ह्या पदार्थसुखासाठी, जगाच्या वासनेसाठी. मग त्याला लोकोद्वार म्हणा की खिचडी खाण्याची इच्छा म्हणा! पण जेथे जग नाहींच असें माझें जें नित्य निर्विकार स्वरूप तेथें ही वासना कोठून असणार? ईशावास्य उपनिषदाचा अर्थ मी ज्ञानपर लाविलेला आहे. पूर्वपक्ष म्हणतो. येथे कांहीं आत्मस्वरूपाचे वर्णन केले आहे का ? ज्याला सर्व आत्मस्थितीच बाणली आहे त्यास या जगाचे दु:ख काय कळणार? ह्याचा अर्थ ज्ञानपर का केला? शुद्धत्व, एकत्व, नित्यत्व वगैरे आत्म्याचे चे वर्णन ह्यांत असल्याने आम्ही ह्याचा अर्थ ज्ञानपरच केला आहे. शुद्धत्व, एकत्व वगैरे ही लक्षणे कर्मपर नाहीत. त्यांचा कर्माशी विरोध आहे, ती कर्माशी विलक्षण आहेत. ही लक्षणे कर्माशी संबंधित नव्हेत म्हणून त्यांचा कर्माशी विनियोग करणे युक्त होईल.’

कर्माने काय होईल ? कर्म हे पदार्थाचे उत्पत्तिमत्व. तू विकारी आहेस, त्याची प्राप्ती करून घे. त्याचे चांगले गुण वाढव असें सांगतें व कर्तत्व भोक्तृत्व अशा ठिकाणी आहे असे सांगते. पण आत्मस्वरुपाचें ठिकाणी हे कांहींच नाही. पदार्थ हे विकारी आहेत. आपले गुण कालांतराने बदलतात हे पदार्थ दाखवितात. रूपांतरित होणे हे विकाराचे लक्षण आहे. ‘पूजाद्रव्य वगैरे प्रोक्षण करा ? आपल्यालाहि प्रोक्षण करावयास सांगतात. कां तर आपल्याला शुद्ध व्हावयाचे म्हणून.

अशा दृष्टीने कर्मात कमीत कमी आत्मत्त्व, भोक्तृत्व असें सारें दिसून येते. खरोखर कर्तुत्व, भोक्तृत्व ही आत्म्याची लक्षणे नव्हेत. तशी असती तर आत्मस्वरूपाची प्राप्ती कर्माने होते असे म्हटलें असतें. पण आत्मस्वरूपाचें सुख पदार्थाप्रमाणे चंचल, दुःखकारक, वीट आणणारे नसून अविट, शाश्वत, आनंदकारक सुख आहे. म्हणून हयाचा अर्थ आम्ही आत्मज्ञानपर लाविलेला आहे. पदार्थाचे यथार्थ व दाखविणे हैंच उपनिषदांचे कार्य. सर्व उपनिषदांची परिसमाप्ती आत्मस्वरुपाची प्राप्ती करून देण्यांतच होते.

गुणातीताची, भक्ताची, स्थितप्रज्ञांची लक्षणे हि विषयसुख भोगण्याची नव्हेत. म्हणून आम्ही याचा अर्थ कर्माला अनुकूल होईल असा न लावतां, दुःखकारक कर्माचा त्याग सांगणारी असल्यामुळे जी लक्षणे जन्ममरणशून्य अशी आहेत, आत्मज्ञानपरच आहेत. म्हणून त्याचा अर्थ आत्मज्ञानपर लाविला आहे. आत्मा अनेक आहे. तूं ‘मी’ म्हणतोस. जितक्या व्यक्ति तितक्या प्रकृति. तूं जेवलास तर ह्याचे पोट भरेल कां ? एकाला हाक मारली तर दुसरा येणार नाही. हा पूर्वपक्ष आहे. जीव हा कर्तृत्वप्रधान व भोक्तृत्वप्रधान आहे. ‘पापोऽहं पापकर्माऽहं पापात्मा पापसंभवः।’ मी पापी आहे असे आपण म्हणतो की नाही. लहान मुलाला श्रुतीची गोष्ट सांगावयाची तर अगदी सुलभ सांगावी लागते. पहा! तूं अकर्म केलेस मग प्रायश्चित्त घे. म्हणजे आत्मा हा विकारी आहे वगैरे त्याची योग्यता आत्मा हा अविकारी आहे हे सांगून पटण्याइतकी नसल्याने त्यांच्या शब्दात सामान्य लोकाकरितां कर्माचे विधान श्रुतीने केलें. देहाचा अभिमान न धरतां कर्म केले तर काय होईल? तर ते म्हणतात, ‘देहाच्या अभिमानाशिवाय कर्म कसे करणार?’ ब्राह्मणजातीची कर्मे करावयाची म्हणजे ब्राह्मणत्वाचा अभिमान पाहिजे. तो नसल्याने म्हणूनच शेंडी काढतात, ‘तुमचे काम नाही. तुम्ही आपला जप करा’ असे म्हणतात की नाही! अर्थात हा संपत्तिमान विद्वान व बलिष्ट पाहिजे. धुरांत कुंडाजवळ दोन दोन तास बसावे लागते. तो बलिष्ट असला पाहिजे. त्याचे ठिकाणी अंगकैवल्य असतां कामाचे नाही. जन्म कर्मशून्य आहे. तेथे कोण ब्राह्मण व कोण शूद्र ? त्या त्या वर्णाला व त्या त्या आश्रमाला तो तो अधिकार पाहून ती ती कामें सांगितली आहेत. आत्मसुखाची प्राप्ती करून देणारे हे मंत्र आहेत. देहसुखाचें व अज्ञानाचे निवर्तन करणारे हे मंत्र आहेत. शोक-मोहाची, कर्माची व विषयाची निवृत्ति करणारे आहेत. आत्मरूप हे नित्य, शाश्वत, निश्चल, निर्विकारी आहे. विषयाची वृत्तीच तेथें नाहीं.

ह्या ठिकाणी अनुबंध चतुष्टय सांगितली. आहेत. जो मोक्षाची इच्छा करतो, जो विरक्त तोच केवळ हयाचा अधिकारी आहे. केवळ चिन्मात्र आनंदघन स्वरूप प्राप्त करून घेण्याची इच्छा करतात तेच याचे अधिकारी. जे शाश्वत ब्रह्म तेच हयाचा विषय. गुरु-शिष्य हा संबंध आहे हे प्रतिपादन करण्यासाठी हा ग्रंथ आहे. आत्मानंदाची प्राप्ती हेच हयाचे प्रयोजन आहे. जो शाश्वत परमानंद आहे, त्याची प्राप्ती हाच ह्याचा विषय आहे.

home-last-sec-img