Literature

कन्यादान

“अमुकगोत्रोत्पन्नो अमुकशर्माहं मम कुलोत्पन्नानां सर्वेषां अतीत पितॄणां निरतिशयब्रह्मलोकावाप्त्यादिकन्यादानकल्पोक्तफलावाप्तये अ नैव वरेणास्यां कन्यायामुत्पादयिष्यमाणासंतत्या द्वाषावन्द्वादशापरान पुरुषान पबित्रीकर्तुमात्मनाश्च श्रीलक्ष्मीनारायणप्रीतयेअमुकगोत्रोत्पन्नाय अमुकप्रवरान्विताय अमुकशर्मणः प्रपौत्रायामुकशर्मणः पौत्राया मुकशर्मणः पुत्रायामुकशर्मणे वराय अमुकगोत्रोत्पन्नामुकप्रवरान्विता मुफशर्मणः प्रपौत्रीममुकशर्मणः पौत्रीममुक शर्मणः पुत्रीममुकनाम्नीमिमां कन्यां वरार्थिनीं श्रीरूपां प्रजापतिदेवत्यां प्रजासुहृत्वकर्मभ्यः प्रजोत्पाद नार्थे तुभ्यमहं संप्रददे श्रियै ” 

अशा रीतीनें ‘ संप्रददे – देतो असा संकल्प करून पिता कन्यादान करतो. हें पित्याने दिलेलें दान आणि वचन पुनर्विवाहामुळे नष्ट होते. वंशान्त्र्याच्या उच्चारालाहि यामुळे कसला आधार उरणार नाही. ‘माझी मुलगी’ म्हणून मुलीच्या पित्याला म्हणता येणार नाहीं व ‘तुझा मुलगा’ म्हणून वराच्या पित्याला म्हणता येणार नाही. त्या वधू वराच्या आईबापांनाहि आपल्या कुलाचा उच्चार करता येणार नाही. ‘निरतिशयब्रह्मलोकावाप्त्यादि कन्यादानकल्पोक्तफलावाप्तये ‘ याला अर्थच उरणार नाही. याच्या ठिकाणी पुनर्विवाहाने पुढे त्या कृत्रिम आईबापांना ‘निरतिशयनरकलोकावाप्त्यादिसंकर कन्यादानकल्पोक्त फलाषाप्तये म्हणूनच फलाकडे दृष्टि ठेवून संकल्प करावा लागणार, शास्त्रोक्त कन्यादानाचे, निरतिशय सुखाच्या, ब्रह्मलोकाच्या प्राप्तीचें फल अशानें काणालाहि न मिळतां पुनर्विवाहादि घटनांनी एथून तेथून सर्वांनाच इथे व परलोकांत नरकयातनेची प्राप्ति मात्र अनायासे होईल !

धर्मे च अर्थे च कामे च नातिचरितव्या त्वयेयम् इति दाता। नातिचरामि । इति वरः। सह धर्मश्चर्यताम् इति दाता। चरिष्यामीति वरः।” पुनर्विवाहानें नुसते आईबापच वचनभ्रष्ट होऊन नरकाला जातात असे नसून वधूबरहि बचनभंगार्ने नरकाला जातात हें खालील वचनांनी कळून येईल. कन्यादानाचे वेळी-‘ धर्मार्थकामांत तूं हिला सोडून वागूं नको. हिच्या सहधर्मादिकांचे आचरण कर. एकपत्नीवतानें राहा, असें मुलीचा पिता वराला म्हणतो. ‘ धर्मार्थकामसमयीं मी हिला सोडून बागणार नाहीं. एकपत्नी व्रतानें वागेन’ असें वर वचन देतो. ‘ दोघांनी मिळून गृहस्थधर्माचें पालन करा’ म्हणून मुलीचा पिता सांगतो. ‘ करतों’ म्हणून वर वचन देतो. वधू वरालाहि तसें वचन देते.

home-last-sec-img