Literature

कार्तिक वद्य द्वादशी

आहार विहारांत जीवन संपविणे हा पशुपक्ष्यांचा धर्म किंवा हीन प्राण्यांचे लक्षण आहे. पण मानवदेहांचे वैशिष्ठ्य केवळ देव जगविणे म्हणजेच व्यवहारिक जीवन जगण्यासाठी नाही तर त्यापेक्षाही काहीतरी जास्त मिळविण्यासाठीच त्याची निर्मिती केली आहे.

शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि आहार, निद्रा, भय, मैथुनादि बाबतीत मनुष्य व मनुष्येतर प्राणी समान आहेत. पण त्यांचा उपभोग एवढीच मानवदेहाची इतिकर्तव्यता नव्हे. तसेच आपल्या आयुष्याचे एवढेच ध्येय आहे असे मानवाने समजूं नये. देहसुखासाठी योग्य अशी साधने प्राप्त करण्यासाठी आयुष्य वाया घालविणे हे मनुष्य जन्माचे साध्य नाही. इंद्रिय, विषय, देह पदार्थ यांपासून मिळणाऱ्या सुखांपेक्षाही महत्त्वाचे असे आत्मसुख प्राप्त करून घेणे हे मनुष्याचे मुख्यध्येय आहे व त्या ध्येयासाठी प्रयत्न करणे हे मानवाचे मुख्य कर्तव्य होय.

जे विवेकी लोक जितेंद्रिय होऊन ध्येयाकडे वाटचाल करीत पुढे जात असतात त्यांनाच चिरशांति मिळू शकते. बाल्यावस्थेपासूनच या श्रेष्ठ ध्येयाकडे वाटचाल सुरू करून त्यांच्या प्राप्तीसाठी अव्याहत श्रम केले पाहिजेत. असे केल्यानेच त्यांचे जीवन उन्नत होऊ शकेल.ध्येयाच्या शुद्धतेवरच यश अवलंबून असते व शुद्ध ध्येयंवादीचर आत्मोध्दारास योग्य असून तो आपल्या सभोवतालच्या जगाचाही उध्दार करू शकतो. अशा मनुष्यास वैषयिक सुख क्षुद्रसुख वाटत असते.

*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी महाराज*

home-last-sec-img