Literature

कार्तिक वद्य षष्ठी

आपले निश्चित असे ध्येय ठरवून ते प्राप्त करण्यासाठी मनोधैर्याने आपल्या शाश्वत सुखासाठी प्रयत्न कां करूं नये ? यादृष्टीने तिसरा विधी ‘ ज्ञानकांड ‘ हाच होय. याचा मुख्यभाग परमात्म्याचे स्वरूप व जो ते जाणतो तो ज्ञानी. अशा ज्ञात्याला स्वतःमध्ये व परमात्म्यात भिन्नता वाटत नाही. परमात्म्याने उत्पन्न केलेले जग हे परमात्मास्वरूप होय. जगत् व परमात्मा यांत भेद वाटत नाही. पाण्यावरील लाट म्हणजे पाणीच हे जसे खरे आहे, तद्वत जग म्हणजेच परमात्मा असे म्हणणे चुकीचे होणार नाही. जीवाला पूर्णत्व आल्यास पूर्णस्वरूप असलेल्या परमात्म्याशी तो एकरूप होईल. आपण ज्यांचे ध्यान करतो त्याच स्वरूपात मन तादात्म्य पावते. देहाचे ध्यान केल्यास मनही देहरूप होते. अनात्म असलेला देह ध्यानबलाने ‘ मी ‘ या शब्दास पात्र झाल्यास ‘ मीच आत्मा आहे ‘ असे कां होऊ नये ? अशातऱ्हेने ज्ञानाच्या योगाने परमात्म्याची प्राप्ती करून घेणे हे मनुष्यत्वाचे ध्येय आहे.

मी म्हणजेच आत्मा, एकमेकांचा परिचय नांवाने करणे हा जगव्यवहार आहे. कारण नांवाचा व्यक्तीशी संबंध येतो. परमात्मा चराचरसृष्टीत व्यापला आहे, असेच श्रृती सांगतात. ‘ सोऽहम् ‘ ‘ मी ‘ असाच परमेश्वराचा पहिला संकल्प आहे. त्यांचे अनेकत्व निरनिराळ्या रुपांतुन प्रकट होते. रूप नाही तर अनेकत्वहि नाही.

*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img