Literature

कार्तिक शुद्ध नवमी

मानवांना विषयसुखाचा अनुभव मिळु नये अशीच जर परमेश्वाची इच्छा असती तर जग निर्मितीचे कार्य झाले असते काय ? असा एक प्रश्न पुढे येतो. याचे उत्तर देणे कठीण नसून अगदी सोपे आहे. परमेश्वराने आपले महत्त्व दाखविण्यासाठी जगनिर्मिती केली आहे हे स्पष्ट असून त्यामुळे त्याचे अस्तित्व, प्रभाव, सामर्थ्य ही आपणास अनुभवास येतात. या जगतातील मानवाला सुखातच ठेवावयाचे असते तर त्याने दुःख निर्माण केले नसते. सर्वसुखदायी कामधेनु, कल्पवृक्ष, नंदनवन या सर्वांच्या निर्मितीचे सामर्थ्य परमेश्वराच्यातच आहे. पण आपल्याला या जगतात काय दिसून येते ? रंकापासून रावापर्यंत सर्वजण दुःखी, शोकग्रस्त व चिंतामग्नच आहेत. यातून आपली सुटका कशी होणार ? असा एकमेव प्रश्न सर्व मानवजातीपुढे ‘ आ ‘ पसरून उभा आहे व हा विचार मानवबुध्दीला कुंठीत करीत असतो. यावरून या जगात काहीतरी उणेपणा आहे हेही लक्षात येते. एकंदरीत हे जग दुःखमयच. परंतु त्या दयाघन परमेश्वराचा संकेत काही निराळात असावा असे वाटते. विषयसुखाची गरज नसलेले शाश्वत सुख व शाश्वत तृप्ती मिळवण्यासाठी त्यासुखाचा संबंध सोडविणे हा त्या दयाघन प्रभूचा संकेत असावा ! शाश्वत सुख व शाश्वत तृप्ती करून घेणे हे या मानवजन्माचे इति कर्तव्यच होय.

*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img