Literature

कार्तिक शुद्ध पौर्णिमा

या जन्माचा अंतकाल केव्हा आहे हे कोणीही सांगु शकणार नाही. यासाठी अंतकालापूर्वीच दिव्यसुखाची प्राप्ती करून घेऊन आपल्या जीवनाचे सार्थक करून घेतले पाहिजे. असे न केल्यास संपूर्ण आयुष्यभर श्रम करून त्यामुळे दुःखप्राप्तीच होणार ! दिव्यसुखप्राप्तीसाठी साधना करण्याकरिता निराली वेळ आहे असे समजणे चुकीचे आहे. अचल निर्धाराने व विचाराने योग्य साधनांच्या योगाने नित्य, दिव्य, शाश्वत सुख मिळविणे योग्य योग्य होय. उठता बसता सहज स्थितीत अशा सुखाची प्राप्ती करून घेणे शक्य झाल्यास मृत्यूची भीती रहात नाही.

जे सुख अनुभविल्याने त्याची तृष्णा वाढत नाही किंवा अतृप्ती वाटत नाही व जे कधीही नष्ट होत नाही ते शाश्वत सुख प्राप्त करून घेणे हे आपले मुख्य ध्येय आहे. त्या सुखाच्या प्राप्तीशिवाय दुःख नाहीसे होणार नाही. यासाठी अचल, अत्यंतिक अविनाशी असे सुख प्राप्त करून घेणे हा आपला मुख्य उद्देश असला पाहिजे. तेच आपल्या जीवनाचे ध्येय होय. तीच आपली उन्नति व प्रगती असून त्यामुळे आपल्याकडून सनातन धर्माचे पालन होणार आहे. त्याला मोक्षही म्हणता येईल. जे त्रिकालबाधित आहे त्यालाच ‘सत्य’ असे म्हणतात व त्या सत्याचा प्रचार म्हणजेच सनातनधर्मपालन.

*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img