Literature

कार्तिक शुद्ध सप्तमी

सर्व प्राणीमात्रांचे जीव निरनिराळे दिसत असले, तरी ते सर्व सुखाकडेच धाव घेत असतात. सुख मिळविण्याच्या उद्देशानेच सर्व प्रवृत्ती, प्रयत्न यांची पराकाष्ठा होत असते. सुखासाठी निरंतर प्रयत्न व खटपटी चालू असतात. परंतु ते सुख कोठे आहे व कोणते ?

बाह्यदृष्टीने दिसणारे पदार्थ सुख असे समजून ते मिळविण्याकरता खटपट करणारा जीव सर्वत्र सारखाच. कारण अशी प्रवृत्ती पशुपक्ष्यांत, स्वर्ग नरकांत सुध्दा सारखीच दिसते. म्हणून विषसुखाचा अनुभव सर्वांना सारखाच ! म्हणून त्या सुखासाठीच मानवजन्माचा उपयोग करणे योग्य नव्हे. विषयसुख हेच खरे सुख आहे कां ? त्यापेक्षा दुसरे कोणतेच शाश्वत सुख नाही काय ? विषयाशी संबंधित नसलेले व विषयसुखापासून मिळणाऱ्या सुखापेक्षा श्रेष्ठ असे शाश्वत सुख दुसरे नाहीं काय ? असल्यास ते कसे मिळवावयाचे, असा सुक्ष्म विचार करून शाश्वत परमसुख मिळविण्यासाठी व बुद्धी शक्ती यांचा उपयोग करण्यासाठीच आपणांस नरदेह प्राप्ती झाली आहे हे विसरू नये. परमसुखरूपी आत्म्याचे ज्ञान म्हणजेच परमात्मपद हे समजून घेऊन, परमात्म्याचे ध्यान करून त्यातच जीवनसाफल्य प्राप्त करून घेणे हे मानवाचे मुख्य कर्तव्य होय.

*श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी*

home-last-sec-img