Literature

क्षणभंगुर जीवन

(पितृविरहानें दुःखित झालेल्या भरताला पाहून)

भरता ! शाश्वत अर्से इथे काय आहे  गेलेल्या वस्तूचा शोक का करावा एके दिवशीं नष्ट होऊन जाण्याचाच क्षणिकताच या सर्व पदार्थांचा स्वाभाविक धर्म अथवा स्वभावच असे कळून आल्यानंतर या क्षणभंगुर पदार्थांच्या लाभानें हर्ष मानणें व नाशानें शोक करणे यांत काय अर्थ आहे : यांत कोणता शहाणपणा आहे  याने होणारें प्रयोजन तरी कोणते हे असले आणि नसलें तरी दोन्ही सारखेच. तत्त्वनिष्ठ माणसें नसलेल्याची अपेक्षा व असलेल्याची उपेक्षा दोन्ही करूं पाहात नाहीत. नष्ट झाल्याची खंतीहि पण त्यांना नसते. अति पिकलेले फळ देठापासून वेगळे होऊन खाली पडते. अति जीर्ण झालेले घर आपोआप खाली कोसळते. दिवस सरून रात्र होते. नदीचा प्रवाह नेहमी बदलतो. सूर्यचंद्रहि उदय पावून अस्ताला जातात. जातस्य मरणं ध्रुवं । यज्जन्यं तनित्यम् । उत्पत्ति म्हणून ज्याला आहे त्याला नाश ठेवले लाच. दुःख केल्याने का मेलेला मनुष्य परत येतो दुःख करण्यांत व्यर्थ वेळ कां घालवावा  ते गेले आणि आम्ही का शाश्वत राहाणार आहों जन्मलेल्या क्षणापासूनच आयुष्य घटत जातें. क्षणक्षणां क्षीण होत जाऊन शेवटी नाश पावणाऱ्या देहादि अखिल दृश्य पदार्थांच्या ठिकाणी शाश्वततेचा आरोप करून त्याची आशा राखल्यानेंच मनुष्याला दुःख होतें. एरवी दुःखाला कांहीं कारणच नाहीं. देहाला षड्भाव-विकार आहेत. जन्मतो वाढीस लागतो मोठा होतो क्षीण होऊं लागतो व असा काही दिवस राहून शेवटी नष्ट होऊन जातो. नवयौवनाचे सौंदर्य वृद्धाप्पी नसतें. केंस पांढरे होतात. शरीराला सुरकुत्या पडतात. कातडी लोंबू लागते. डोळ्यांत चिपडे दाटतात. नाकांत मेकडें भरतात. लाळ गळूं लागते बघवत नाही. इतकें होतें कीं स्मरणशक्तिहि नसते.या म्हातारपणाच्या आंतच मुक्तीचें कांहीं साधन झालें तर झालें ! या म्हातार पण काय होणें शक्य आहे  म्हणून तारुण्यांतच कांही प्रयत्न करावा. तारुण्य दशेत शाहाण्यानें ऐहिक अशा या कसल्या भोगसुखांतहि मन न गुंतवितां राहावें. आपल्याबरोबर येणारें यांत कोणतेंहि नाहीं. जन्मल्यानंतर मरण चुकत नाहीं. असें झाल्यास जन्मच येणार नाही असें कांहीं करावें भरता ! पित्या करितां शोक करूं नकोस व आपले जीवनहि शाश्वत मानूं नकोस. ऐहिक वैभवांत मन गुंतवूं नकोस. जन्ममरण पुन्हां प्राप्त होणार नाहीत असें कांहीं कर. मुक्तिकरिता झट.

नन्दंत्युदित आदित्ये नन्दंत्यस्तमिते रवौ । आत्मनो नावबुध्यन्ते मनुष्या जीवितक्षयम् ॥ २४ ॥( वा. रा. अ. कां. स. १०५)

home-last-sec-img