Literature

खरा पंडित कोण ?

यच्चित्तस्तन्मयो भवति ।‘ या उपनिषद्वाक्याप्रमाणे ‘जो जयास ध्याईल । तो तद्रूपचि ॥असे श्रीसमर्थानीहि सांगितले आहे. या तत्त्वदृष्टीने निश्चळ परब्रह्म येक ।। हे ओळखून निःस्पृहांनी वागावें. जो निश्चळास ध्याईल | तो निश्चळचि ।‘ वृत्तीचें चांचल्य येथे नाही. मी पणाचा उद्गमहि येथे नाही. उत्पन्न झालेलेच दृश्य. पिंडब्रह्मांडाच्या या सर्वप्रथम उत्पन्न होणाऱ्या मीया अनुभवापासून, याला गोचर होणारें अखिल दृश्य चित्तांतून काढून, निश्चळ आनंदच एक उरवावयाचा आहे. ही निवृत्तिरूप मोक्षमार्गाची दिशा आहे. इथपर्यंत आपली झेप पोहोंचली पाहिजे. हे ओळखून घेतलेली झेप मध्येच कोठें न पडेल असे आपल्या देहाला आवरून, निःस्पृहांनी तर मोठ्या हुरूपाने अहर्निश पुढे पुढेच जात असावें. प्रापंचिकांना सर्व सांभाळून साधावें लागतें. निःस्पृहांना कसलीच उपाधि नसल्यामुळे सुप्तेरुत्थाय सुप्त्यन्तं ब्रह्मैकं प्रविचिन्त्यताम् । दद्यान्नावसरः किंचित्कामदीना मनागपि ॥झोपून उठल्यापासून तो झोपेनें कोलमडून पडेपर्यंत अधोवृत्तीचा उद्गमच न होऊ देता, निश्चळ चिन्मात्र आनंदाशी तादात्म्याने रहाण्याचा सतत अभ्यास चालू ठेवावा. निद्राया लोकवार्तायाः कामादेरात्मविस्मृतेः । क्वचिन्नावसरं दत्वा चिंतयात्मानमात्मनि ॥  निद्रा, नसती उठाठेव, लोक-निंदा-स्तुति आत्मविस्मृतीला कारण होणारे कोणतेहि कामादि विकार यांना वावच मिळू न देता, मीपणाच्या भानांत एक ज्ञेयशून्य आनंदाची नित्यज्ञानरूपता निश्चल अशी उरवावी, अखंड ध्यानमग्न असावे ‘ अरे जं जालेंचि नाहीं । त्याची वार्ता पुससी काई ।‘ (दा ८-३-१) या वाक्याचा अर्थ हृदयाशी बाळगून, अंतःस्थितीची बैठक न ढळू देतां वागावें. नामरूपात्मक कोणत्याहि प्राणिपदार्थांवर प्रेम बाळगू नये. प्रेमाच्या तसें द्वेषाच्या वस्तूचेंहि तसेंच ध्यान जडते आणि ब्रह्मस्वरूपाचें ध्यान सुटते, म्हणून रागद्वेषशून्य व्हावें असे जिथे तिथे सांगण्यांत येतें.

काही नको म्हणून घरदार, जमीनजुमला, आईबाप, बंधु भगिनी इष्टमित्र सोडून आलेल्या निस्पृह साधकांना कोणाशी काय करावयाचे ? कोणी निंदा कोणी वंदा । आमुचा स्वहिताचा हा धंदा ॥ असें निःस्पृहाने मानून नेटाने साधन करावे. ना आहे कोणाचा द्वेष ना कोणाचे प्रेम असे निःस्पृहाने रहावें सर्व सोडून अरण्यांत राहिलेल्या चक्रवर्ती भरतभूपाळाला एका हरिणीच्या पिलाच्या मोहाने काय झाले तें आठवावें. परमार्थ, निवृत्तिमार्ग रूपाने म्हणजे दोन्हीकडे पाताळ असलेल्या डोंगराच्या माथ्यावरून जाण्यासारखे आहे. फार तोल सांभाळावा लागतो. इकडे तिकडे बघितले तर डोके फिरून पाताळांत पडेन म्हणून रोख धरून इकडे तिकडे न बघता सरळ जावयाचे आहे. तिरसटपणा आणि लोचटपणा दोन्ही नसावेत. जनकृपानैष्ठुर्यमुत्सृज्यताम्असे श्रीशंकराचार्य उपदेशीत आहेत. जनकृपा आणि जननैष्ठुर्य दोन्ही नकोत. दोन्हींचा त्याग करावा. आपलीच कल्पना आपल्याला बाधक असते. शुकाला मोह पाडण्याकरितां रंभेनें देखील प्रयत्न – केले नसतील, तितके प्रयत्न आपलीच कल्पना आपल्याला खाली ओढण्याकरिता करीत असते. ती ती कल्पना आल्याशिवाय कसलाहि परिणाम होत नाही, हे लक्षात ठेवावे. खलाश्याचे आपल्या दिशेकडे जसे लक्ष्य असते, तसे परमार्थाकडे साधकांनी लक्ष्य ठेवावें परमार्थांची दिशा सोडून या भवसागरांत कोणी वागू नये. तोडूनि द्वैताची उपाधी । अद्वैत वस्तु साधने साधीं । लावी ऐक्यतेची समाधी या नांव साधक (दा. ५-९-१०) साधकांनी दासबोधाच्या ५ व्या दशकाचा ९ वा साधकलक्षणाचा समास पाठ करून रोज म्हणावा, म्हणजे जागृति राहील.

गृहस्थांनी जनकाचे व निःस्पृहांनी शुकाचे उदाहरण डोळयांपुढून ढळूच देऊ नये. कितीहि भोग भोगले तरी अतृप्ति वाढतच जाते आणि शेवटी त्यांचा त्याग केल्याशिवाय सुख, शांति कदा न व समाधान लाभत नाही, हे ययाति राजाच्या उदाहरणावरून गृहस्थांनी समजावें व मनाला आवरावें. निःस्पृहांचा तर तो मार्गच नव्हे, म्हणून त्या मार्गाचे कोणतेंहि दृश्य मुळी डोळ्यांपूढे येतच नाही आणि येऊ नये. श्रीसमर्थाच्या या ओव्या सर्वांनी लक्षात ठेवाव्या: देहातीत वस्तु आहे । तें तूं परब्रह्म पाहे । देहसंग हा न साहे । तुज विदेहासी ॥ (दा. ८-८-२८) सोह आत्मा स्वानंदघन | अजन्मा तो तूंचि जाण । हें चि साधूचें वचन । सदृढ धरावें ॥३३॥ महावाक्याचे अंतर । तूंचि ब्रह्म निरंतर ऐसिया वचनाचा विसर पडोचि नये ||३४|| देखता मृगजळाचे पूर। म्हणे कैसा पावों पैलपार कळता तेथीचा विचार | सांकडे कैचें ॥४५॥ तथापी माया कल्पनेसी दिसे । आपण कल्पनेतीत असे । तेथें उद्वेग काइसें । निर्विकल्पासी ॥४७॥ 

दृश्य पदार्थ वोसरतां । आवघा आत्माचि तत्त्वता । नेहटून विचारे पहातां । दृश्य मुळीच नाहीं ||५५|| 

दृश्यरूपं च दूग्रूपं सर्व शशविषाणवत् । नोत्पन्नं नो स्थितं जगत् । दृश्य आणि त्याची ती दृष्टि सशाच्या शिंगाप्रमाणे खरोखरच नाहीं. न हि दृष्टुर्दृष्टविपरिलोपो वर्तते अविनाशित्वात् । नित्य निर्लेप, नित्य अविकारी, अविनाशी, नित्य बोधरूप आत्म्याची निज स्थिति कधींच ढळू शकत नाही. जग उत्पन्न झालेंहि नाही आणि नाहीहि, असें जें श्रुतीचे सांगणे आहे, ते इथे तंतोतंत जुळते. 

अविचार आणि विचार। जैसा प्रकाश अंधार ।विकार आणि निर्विकार । येक नव्हे कीं ॥ (दा. १३-६-२८) 

जेथें नाहीं विवंचना । तेथें कांहींच चालेना । खरें तेंचि अनुमाना । ते कदा न ये ||२१|| प्रत्ययास बोलिजे न्याये । अप्रत्यये तो अन्याये । जात्यांधास परीक्षा कार्य । नाना रत्नांची ॥३०॥ म्हणोन ज्ञाता धन्य धन्य । जो निर्गुणेंसी अनन्य । आत्मनिवेदनें मान्य । परम हे पुरुष ॥४१॥ जेथें ध्यान धारणा सरे । कल्पना निर्विकल्पी मुरें । केवळ ज्ञेप्तिमात्र उरें। सूक्ष्म ब्रह्म ।। (दा. ८-८-५९)

निर्विकल्पा च चिन्मात्रा वृत्तिः प्रज्ञेति कथ्यते । 

सा सर्वदा भवेद्यस्य स जीवन्मुक्त उच्यते ॥

नाभीच्या बाजूने कोणतीहि कल्पना न उठतां ज्ञेयशून्य केवळ एक ज्ञान शिल्लक राहिलेली फक्त एक जाणीव जी, ती प्रज्ञा म्हणवून घेते. अशी ज्ञप्ति अथवा प्रज्ञा ज्याच्या ठिकाणी अखंड तेवते तो जीवनमुक्त, असा याचा अर्थ. श्रीसमर्थांच्या अनुभवात आणि श्रुतीच्या सांगण्यांत कसा तंतोतंत मेळ बसतो पहा. आधी केलें मग सांगितलेंअसा श्रीसमर्थांचा बाणा आहे. सदा स्वरूपानुसंधान । हें मुख्य साधूचें (निःस्पृहाचें) लक्षण । जनीं असोन आपण । जनावेगळा ।। (दा. ८-९-९) सकळ धर्मामधे धर्म-स्वरूपीं रहाणें हा स्वधर्म । हेंचि जाणिजे मुख्य वर्म। साधु लक्षणाचें । ||५४|| बाह्य साधकाचे परी । आणि स्वरूपाकार अंतरीं। सिद्धलक्षण हे चतुरी। जाणिजे ऐसें ॥१२॥ साधु आपणचि येक । तेथें कैचा दुःखशोक । दुजेविण अविवेक । येणार नाहीं ॥४५॥ पाहा या ओवीशीं, ‘द्वितीयाद्वै भयं भवति । यस्मिन् सर्वाणि भूतान्यात्मैवाभूद्विजानतः । तत्र को मोहः कः शोक एकत्वमनुपश्यतः ॥ ” ह्रीं श्रुतिवाक्य कशी तंतोतंत जुळतात. आपण वस्तु मुळीं येक। ऐसा ज्ञानाचा विवेक ।असे सांगून श्रीसमर्थानी ८ वा ज्ञानदशक पूर्ण केला आहे. ” येथून हा ज्ञानदशक । संपूर्ण जाला ॥ (दा. ८-१०-८१) नुसता । दशक पूर्ण झाला नाही, तर सबंध ज्ञानशास्त्रच इथे पूर्ण झाले. उंच नीच नाहीं परी । राया रंका येकचि सरी । जाला पुरुष अथवा नारी । येकचि पद ॥‘ (दा. ७-२-२४) तत्त्वज्ञानानंतर मी कोण ?’ या अक्षरांची पाटी सारखी डोळ्यांपुढे बाळगावी आणि तोल सांभाळीत जावा. मी कोण ऐसा हेत। धरूनि पाहता देहातीत । अवलोकिता नेमस्त स्वरूपचि होये ।। (दा. ५-६-२१) न याचि जन्में येणेंचि काळे । संसारीं होईजे निराळें । मोक्ष पाविजे निश्चळे | स्वरूपाकारें ॥ (दा. ६-९-२९) असे श्रीसमर्थानी अनुभवून दिलेले आश्वासन आहे. आत्मबुद्धि निश्चयाची । तेचि दशा मोक्षश्रीची | अहमात्मा हे कधीचि विसरों नये ||’ (दा वि ५-१०-३८).

लोक नाना देह देखती । विवेकी देहांत पाहाती । पंडित समदर्शनें घेती । येणे प्रकारें ।। (दा. ११-१-२४) इथें पण्डिता: समदर्शिन: या गीतवाक्याची आठवण होऊन श्रीसमर्थांच्या शब्दांत याचा अर्थ कळल्याचा आनंद होतो. ‘पण्डा आत्मबुद्धि: सा यस्यास्तीत्यसौ पण्डितः ।‘ पण्डा म्हणजे आत्मबुद्धि (पहा वरील ओवी-दा. ५-१०-३८) अशा निश्चयाची आत्मबुद्धि ज्याची झालेली असते, जो मोक्षश्रिया अलंकृत असतो तो पंडित. मी त्याला आत्मा म्हणजे तो अद्वैत ।” असा निश्चय असल्या मी सहजच दुसरे काहीच दिसत नाही हे उघड झाले. या संदर्भाला अनुसरून असणारे एक वचन कठवल्लीत आहे : नित्योऽनित्याम चेतनश्चेतनानामेको बहूनां यो विदधाति कामान् । तमात्मस्थं 

येऽनुपश्यन्ति धीरास्तेषां शान्तिः शाश्वती नेतरेषाम् ॥ ‘ ( कठ (उ. २-२-१३) विनाश पावणाऱ्या अखिल नामरूपांतून अधिष्ठान रूपाने जो अविनाशी आनंद व्यापून आहे, जो ब्रह्मादिकीटकांच्या इंद्रियांना चेतना आणणाऱ्या मनःप्राणादिकांनाहि चेतना देणाऱ्या त्या त्या देहांतल्या चैतन्यालाहि तदधिष्ठानरूपानें जो एक सत्य आनंद आहे, जो आपण एक असूनहि तत्तदुपाधि विशिष्ट चैतन्याला ऐच्छिक तो तो विविध आनंद देतो, त्या त्या नित्य शुद्ध, अनंता नंत सत्य आनंदाचा साक्षात्कार, जे आपल्या मीम्हणून स्फुरत असलेल्या आत्मभानांत अपरोक्षपणे करून घेतात, त्यांना मात्र खरी शांति प्राप्त होते, इतरांना नाहीं. (वैषयिक आनंद त्या सत्य आनंदाचे केवळ एक खोटें प्रतिबिंब असल्यामुळे तो सत्य आनंदच विविध आनंद देतो, म्हणून इथे औपचारिक रीतीने म्हटले आहे)

अपरोक्ष ज्ञान्यांनाच पण्डित म्हणतात. यांना आपल्या अद्वितीय स्वरूपाचेंच अखंड भान होत असल्यामुळे यांची सर्वत्र आत्मदृष्टि असणे, यांचे समदर्शी होणे स्वाभाविक आहे, हे आपण पाहिले. अविवेकी प्रथम विवेकी होतो म्हणजे आत्मदृष्टीनें बघणारा होतो. श्रीगुरुशरण होऊन देहांत जे आनंदरूप चैतन्य आहे तेंच, ‘मी आम्ही, तूं तुम्ही, तो ते अथवा ती त्या ‘अशा व्यावहारिक भाषेत प्रकट होत असतें प्रत्येकजण आपल्याला मीम्हणत असतो, त्यामुळे मीची व्याप्ति अखंड सर्वत्र आहे.. मीया आत्मभानाने आनंदघन परमात्माच सर्व देहांतून चैतन्य रुपाने आहे. त्या अद्वितीय आनंदवन परमात्म्याला उद्देशून मी-आम्हीं, तू-तुम्ही, तो ते ती-त्याम्हटले जाते व त्या देहातील आनंदरूप चैतन्यावरच प्रेम केले जाते. देह कोणालाहि प्रिय होऊ शकत नाही, ना याला मी-तूम्हणून जाणण्याचे ज्ञान आहे. नाना देही देव एक विराजे नाना नाटकलीक सुंदर रूप साजे । नाना तीर्थी क्षेत्री अभिनव गति माजे । अगाध महिमा पिडब्रह्मांडी गाजे ॥असें गुरुमुखांतून श्रवण करून स्वपर देह न बघता, कंदिलांत ज्योत, कांचेच्या फुग्यांत विद्युत् प्रकाश बघितल्याप्रमाणे देहांत देहांतले चैतन्य म्हणजे देहांती आनंदघन परमात्मा बघणारा विवेकी बनतो आणि अशा अभ्यासाने पुढे तो आत्मव्यतिरिक्त न पहाणारा खरा पंडित होतो.

home-last-sec-img