Literature

गांधीजींची रामभक्ति व सनातनित्व

राम आणि रामराज्य यांच्या ठिकाणी असणाऱ्या उन्नत गुणांनी गांधीजी आकर्षित झाले. मनामध्ये ठरविलेल्या आदर्श राज्याला ‘रामराज्य’ असें अत्युन्नत कीर्तीचें मंगलमय नांव त्यांनी चोखाळूनच ठेविलें.

त्यांनी स्वतः श्रीरामाचें दिव्य नाम मुखानें अखंड घेण्यास सुरुवात केली. भारतीय भावी रामराज्याकरितां आत्मसमर्पणहि केलें. ‘हे राम राम 36 असेच त्यांचे अंतकाळचे शब्द होते. अंतकाले च मामेव स्मरन् मुक्त्वा कलेवरम् । यः प्रयाति स मद्भावं याति नास्त्यत्र संशयः ॥ (भ.गी. ८-५) भगवंताचेंच वाक्य नव्हे का हें !

१९२० सालच्या सप्टेंबर महिन्यांतील २९ दिनांकाच्या ‘यंग इंडिया’ नामक आपल्या पत्रांतून गांधीजी आपल्या स्वतःबद्दल काय लिहितात तें बधूं. ( १ ) मी वेद, उपनिषदें, पुराणें आदि सर्व हिन्दुधर्मग्रंथांना मानतो. (२) ‘ गोरक्षण’ या धर्मावर माझा पूर्ण विश्वास आहे. (३) मी वर्णाश्रमधर्मालाहि मानतों. (४) मूर्तिपूजेवरहि माझा अविश्वास नाही. या सर्व कारणांवरून मी स्वतःला खरोखरीच ‘ सनातनी हिन्दु’ म्हणूनच उद्घोषित करतो. ही त्यांची वचनें त्यांनाच आदर्श म्हणून पुढे ठेवून, त्यांच्या मतानुसार राज्य चालविण्या करितां परोपरीनें प्रयत्न करणाऱ्या पुढाऱ्यांनी आठवावयाला पाहिजेत ना ?

” रामनामाचे महत्त्व’ या विषयावर ‘ नवजीवन’ या पत्रातून त्यांनी आपला खानुभव जो प्रगट केला आहे तो पाहूं. रामनामाच्या बलाने पाषाणसुद्धां तरले. रामनामाच्या बलानें यःकश्चित् वानरसेनेनें रावणाचा धुळीस मिळविला. रामनामाच्या आधारानें हनुमन्तानें समुद्र ओलांडिला. द्रोणागिरी उचलला. सती सीता कित्येक दिवसपर्यंत त्या राक्षसांच्या राहून देखील आपलें सतीत्वाचे संरक्षण ती केवळ रामनामामुळेच निर्धास्तपणें करून होती. रामविरहाच्या मरणप्राय परिस्थितीत देखील या श्रीरामनामाच्या मुळेच भरतानें आपले प्राण वांचविले व लक्ष्मणानें चौदा वर्षे निद्राआहारांचा त्याग केला. या रामनामाशिवाय दुसरा ध्यास त्यांना नव्हता. त्यांच्या कंठ नाळांतून एक रामनामाचेच वास्तव्य होते. या सर्व प्रमाणांवरून कलिकल्मष सारें धुवून टाकण्याकरितांच या रामनामाचा भूतलावर जन्म झाला आहे, असे श्री तुलसीदासांनी म्हटले आहे. दुसऱ्यांचे कशाला माझाच अनुभव पाहा ना ! हा मी माझाच अनुभव तुमच्यापुढे ठेवतों. व्यभिचारापासून जर मीं कशामुळे परावृत्त झालों असेन तर तें या रामनामामुळेच. दुर्दम्य मनाच्या त्या दृष्ट प्रवृत्तींना जिंकण्याचे सामर्थ्य मला या रामनामामुळेच प्राप्त झाले. ज्या ज्या वेळी माझ्यावर कठीण प्रसंग आले त्या त्या वेळी मी या रामनामानेच त्यांतून वांचलों. अनेक संकटांतून या रामनामानेच माझें संरक्षण केलें. कोट्यवधि लोकांचें नेतृत्व करण्यास व त्यांच्या त्या मनाचे अनुसंधान राखून त्यांची एक वाक्यता घडवून आणण्यास, समाजांतून सुंदर एकोपा निर्माण करण्यास या रामनामाच्या अखंड स्मरणासारखे दुसरे कोणतेंहि इतकें सबल व सुंदर साधन नाहीं. “

गांधींचा हा अनुभव श्रीरामनामाच्या महत्त्वासंबंधीं श्रीसमर्थांनी केलेल्या उपदेशाची आठवण करून देतो. महाराष्ट्रांत मनोबोधाचा आणि श्रीदासबोधाचा सर्वत्र प्रचार आहे. त्या गोड वचनांपैकीं कांहीं येथें आठवणीकरितां उद्धृत करूं.

home-last-sec-img