Literature

चैत्र वद्य चतुर्थी

अधर्माचरणाप्रमाणेंच सत्कर्माचरणासाठी जर मानव प्रवृत्त झाला तर त्याच्या मनास त्यामध्येच सुख मिळते. व्रत, उपवास, जपतपादि, पूजा, होम ह्यामध्ये आनंदी वृत्ती होणे सुरुवातीस जरा कठीण वाटत असलें तरी हळूहळू अभ्यासाने ती वृत्ती बळावून मन शक्तीसंपन्न होते. अशा सत्कर्मासाठीं अनुकुलता प्राप्त करुन घेण्यास आळस आड येत नाही कारण मनामध्ये योग्य तो मार्ग ठरविलेलाच असतो. प्रापंचिक तापत्रयांमध्ये गुरफुटून गेलेल्या मनुष्यास सत्कर्म करण्यास वेळच मिळत नाहीं असें म्हणणें चुकीचे आहे. सत्कर्माचरणानें विवेक प्राप्त होतो, विवेकाच्या योगे ज्ञानप्राप्ती होते व ज्ञानाने मोक्षप्राप्ती होते.

परस्त्रीगामी व परद्रव्यापहारी ब्रम्हराक्षस होतात. त्यांना पिशाच्च जन्म मिळतो. असे लोक जिवंत असतांना परपीडक असतातच पण मेल्यावरही दुस-यांना त्रास देतात. जिवंत असतांना वृध्दिंगत केलेली प्रवृत्ति मृत्युनंतर शिल्लक राहिल्यानेंच असे होते. जन्मजन्मांतरी शिल्लक राहणारी दुर्ववृत्ति विचारवंत मनुष्याने घालविली पाहिजे. पशुआदि प्राणिमात्रांतसुद्धां दांपत्यजीवनांतील विधीनिषेधांचे पालन करण्यांत येत असतां मनुष्यानें त्याच्यापेक्षांहि हीन अशी आपली वृत्ती ठेवावी काय ?

श्री प.प. सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी

home-last-sec-img