Literature

चैत्र वद्य नवमी

आमचा आमच्यावर विश्वास नाही. आपण ‘ मी आजच्या काळातील विद्वान आहे ‘ असा दुराभिमान धरून आपल्या
पूर्वजांच्या ठिकाणी श्रध्दा व विश्वास ठेवीत नाही. त्यामुळे आपल्या धर्माच्या अवनतीस आपणच कारणीभूत झाल्याने परकियांनी आमची धर्मबुध्दी व धर्म बिघडविला असे म्हणण्यात काय अर्थ आहे ? आपली धर्मबुध्दी आपण जागृत ठेवली असती तर पाश्चात्य कांहीच करू शकले नसते. पाश्चात्य मद्यपान, मांसभक्षण करतात म्हणून त्याचेच आम्ही अनुकरण केले. त्यांत त्यांचा काय दोष ? आपण आपले सोडून त्यांच्यासारखे वागलो त्यासाठी त्यांना दोष देता येत नाही. आतां तर पाश्चात्य लोक निघून गेले आहेत. अशा परिस्थितीत आपण गोवधबंदी का करूं नये ? आपले राज्य म्हटल्यावर गोवधबंदी कायदा केल्यास त्यांत पाश्चात्यांची आडकाठी येण्याचें आतां काहीच कारण नाही. अर्थशास्त्रदृष्ट्या ज्या जनावरांचा उपयोग नाही त्यांची हत्या करण्यास काय हरकत आहे ? असा प्रश्न केला जातो. अशा प्रश्नकर्त्यांना आई, वडील, आजी, आजोबा आहेत की नाहीत ? असल्यास त्यांची हत्या करून आर्थिकदृष्ट्या उन्नती करून घेण्याचा विचार त्यांना येतो काय ?माकडे सुध्दा आपल्या युथाधिपतीच्या आज्ञेप्रमाणे वागतात. आपण त्यांच्यापेक्षाहि हीन आहोत काय ? कारण आपणास गुरू नको, वडील मनुष्यें नकोत व धर्माचरणहि नको आहे !!

श्री प.प.सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी

home-last-sec-img