Literature

चैत्र शुक्ल द्वितीया

महात्मा गांधीजींची राष्ट्रभक्ति प्रसिद्ध आहे. त्यांनी सर्वांच्या तोंडी ‘ रघुपतिराघव राजाराम| पतितपावन सीताराम| ‘ हे भजनामृत आपल्या स्मारकरुपाने ठेविले आहे. भारतवर्षाच्या स्वराज्याला ठेवलेले ‘रामराज्य’ हे नाव ऐकताच कोणाचे मन त्या दिव्य वातावरणाच्या उन्नत विचारात देहभान विसरून आनंदपरवश होणार नाही? कठोर न्यायपद्धतीपेक्षा, अमानुष देहदंडापेक्षा, नीतीच्या व धर्माच्या शिक्षणपद्धतीने ह्रदयाचे परिवर्तन करणे ही शाश्वत टिकणारी धार्मिक राज्यपद्धती होय. भारत वर्षाची आधुनिक राज्य पद्धती रामराज्य म्हणुन आपल्या विश्वोध्दारक अशा मंगलमय नावाने प्रकाशत आहे. पण त्या नावाप्रमाणेच प्रभाव, कृतिसुद्धा झाली पाहिजे अशीच आम्हा भारतीयांची अपेक्षा आहे. ‘ हे धर्मपालका श्रीरामा !’ लीलामानुषरूप धारण करून तुं ज्या भारतवर्षाचे राज्य केलेस त्या भारतवर्षाचे राज्य विधर्मीयांपासुन तुझ्या कृपेने आम्हांस मिळाले. तुझ्याच अनुग्रहाने प्राप्त झालेल्या स्वराज्यास तुझेच नांव ठेविले आहे.ह्याचा अभिमान ठेवून तुझ्या राज्याच्या वर्तनाप्रमाणे भारतवर्षाचे स्वराज्य होवो. हे दिनबंधो ! आम्ही सर्वजण तुझ्या दिव्यपदारविंदी ही प्रार्थना करीत आहोत. आम्हाला तुझा आशिर्वाद असावा.

श्री प प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी

home-last-sec-img