Literature

चैत्र शुद्ध चतुर्दशी

‘श्रीरामाय नम: ‘ मधील ‘नमः’ त्वंपदवाच्य, ‘राम’ तत्पवाच्य, रामाय शब्दातील ‘आय’ रूप चतुर्थी असिपदवाच्य, अशारितीने ‘श्रीरामाय नम:’ हा मंत्रहि ‘ तत्वमसि ‘ महावाक्यबोधक आहे.
रघुनाथाच्या सर्वांगीक थोरपणाला व असामान्य अनंत सद्गुणांना भुलून त्याची अब्जावधी चरित्रे लिहीली गेली आहे. महापातकांचा नाश करण्यास त्यांचे एक एक अक्षरच पूरे. ज्यांच्या लिहीलेल्या चरित्राचा एक एक अक्षरोच्चारानेही महापातक नष्ट होते ते श्रीराम स्वत: किती पुण्यवान असतील व तदभिन्न तन्नामहि किती पुण्यवान असेल ?
‘राम’ ‘रामचंद्र’ ‘रामभद्र’ म्हणून जो श्रीरामाचे नामस्मरण करतो त्याच्या हातून कोणतेहि पाप होत नाही; त्याला भक्ति, भुक्ति व मुक्ती ह्यांचा लाभ होतो. मग
याहून मिळवावयाला उरतेंच काय ? श्रीरामाच्या विशुध्द चारित्र्याचा हा सत्वपरिणाम आहे. श्रीराम परात्पर मर्यादा पुरषोत्तम स्वत: परब्रम्हरूपच आहेत, तर मग त्यांच्या नामात एवढे महान सामर्थ्य येईल यात काय नवल आहे.
पातालभूतलव्योमचारिणछद्मचारिण:|
न द्रष्टुमपि शक्तास्ते रक्षितं रामनामभि:||

स्वर्ग, मृत्यु,पाताळ ह्या तिन्ही लोकांतून संचार करणारे मायावी, कपटी, राक्षस कितीही एकटवले व त्यांनी एकदम हल्ला करण्याचे मनात आणले तरी हल्ला करणे राहिलेच पण श्रीरामाकडे नुसतं कान्याडोळ्याने पहाणेहि त्यांना शक्य होणार नाही का ? तर श्रीरामाच्या नांवात श्रीरामाचेंच सामर्थ्य आहे.
समर्थचिया सेवका वक्र पाहे| असा सर्व भुमंडळी कोण आहे|
श्री समर्थोक्ति प्रसिध्दच आहे.

|| जय जय रघुवीर समर्थ ||

श्री प.प. सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी

home-last-sec-img