Literature

चैत्र शुद्ध दशमी

श्रीरामपूर्वतापिनीच्या प्रारंभापासूनच ‘ श्रीराम ‘ या शब्दावरचे व्याख्यान सुरू झाले आहे.

‘ चिन्मयेSस्मिन् महाविष्णौ जाते दशरथे हरो |
रघो: कुलेSखिलं राति राजतें यो महिस्थित: ||
स राम इति लोकेषु विद्वभ्दि: प्रकटीकृत:|
राक्षसा येन मरणं यान्ति स्वोद्रेकतोSथवा ||
रामनाम भुवि ख्यातमभिरामेण वा पुन: |

सच्चिदानंद महाविष्णु श्रीहरि जेव्हां रघुकुलांत श्रीदशरथ राजाच्या पोटी अवतरले तेव्हा अकिल रघुकुलांतच ते सर्वश्रेष्ठ म्हणून शोभू लागले व यास्तवच त्यांना ‘ राम ‘ या नांवाने संबोधु लागले. ‘ राजते महीस्थित: सन् इति राम: | ‘ अकिल महामंडलावर आपला अधिकार गाजवीत, शरणागतांचे रक्षण करीत व भक्तांच्या मन:कामना पूर्ण करीत, विराजमान असणारा असा ‘ राम ‘ शब्दाचा अर्थ विद्वानांनी प्रकट केला आहे. ‘ राजते महीस्थित: ‘ या दोन शब्दांतील प्रथमाक्षरे मिळविली म्हणजे ‘ राम ‘ हा शब्द होतो. ज्या योगे राक्षस मरण पावतात तो राम. येते सुध्दा राक्षसातील ‘ रा ‘ व मरण यातील ‘ म ‘ ही दोन अक्षरे मिळविली म्हणजे ‘ राम ‘ शब्द बनतो. हीच गंमत पुढेहि आहे.

‘ स्वोद्रेकतो राजते महीमण्डले इति राम: | ‘ आपल्या स्वत: सिध्द सर्वातिशय उत्कर्षाने जो अखिल महीमंडळावर अतीव शोभायमान होतो तो ‘ राम ‘ अभिरामेण वा पुन: | ‘ ‘ अभिपरित: स्वरूपानंदेन रमण इति राम: | ‘ सर्व बाजूंनी सर्वत्र जो स्वरूपानंदानेच रममाण होतो तो ‘ राम ‘ होय.

श्री.प.प.सद्गुरू भगवान श्रीधर स्वामी

home-last-sec-img