Literature

चैत्र शुद्ध पौर्णिमा

श्रीरामायणाचा अभ्यास करीत असतां श्रीमारूतीरायाच्या बरोबरीचा दुसरा कोणीही त्यावेळी नव्हता असे आढळून येते. श्रीमारूतीराय हे शिवाचे अवतार. श्रीमारूतीरायांनी जो पराक्रम गाजवला त्यास ते एकादश रूद्रांचे अवतार होते हेच मुळ कारण होते व त्यामुळे त्यांनी चुटकीसारखे आपले संहारकार्य पार पाडले. श्रीमारूतीराय अत्यंत तेजस्वी,आदर्श, अग्रगण्य व सर्वसामर्थ्यवान होते. बल आणि धैर्य ह्यांत त्यांची बरोबरी कोणीही करू शकत नव्हते. त्यांच्यावर शस्त्रास्त्रांचा मुळीच परिणाम होत नव्हता. ‘ बुद्धीमता वरिष्ठम् |’ ह्याप्रमाणें ते बुद्धी व शक्तीत सर्वश्रेष्ठ होते. अमोघ ब्रम्हचर्य, अतुल आत्मबल, आदर्श स्वामीभक्ती ह्यांनी युक्त असणारे श्रीमारूतिरायांचे जीवन म्हणजे स्वार्थत्यागाचें मुर्तस्वरूपच ते जनहितदक्ष आणि महाबलशाली असले तरी विनयशील व स्वामीभक्त होते. यापेक्षा त्यांचे आणखी काय वर्णन करावे? ते अनुकरणीय अशा सर्व सद्गुणांनी संपन्न होते त्यांच्या जीवनांतील एकहि चूक शोधून काढणे अशक्य आहे असे असले तरी त्यांनी आपली बुद्धी, शक्ती व सामर्थ्य यांचा कधीही दूरूपयोग केला नाही हेच तर महात्म्यांचे व अवतारी पुरुषांचे विशेष लक्षण असते. जन्मतांच ही लक्षणे त्यांच्याठायी दिसत होती. जन्मतांच सुर्याकडे पाहून हे एक फळ असावे असें समजून ते त्याला धरावयास गेले, हे त्यांच्या साहसीवृत्तीचेच उदाहरण होय.

महारूद्र हनुमान की जय

श्री प.प. सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी

home-last-sec-img