Literature

जगन्मिथ्यात्वं नाम प्रकरणं अष्टमम्‌

दृश्यं नास्तीति बोधेन मनसो दृश्यमार्जनम्‌।।
सम्पन्नं चेत्सदानन्दो योगी भवति केवलः।।1।।
अर्थ—हे दृश्य जगत्‌ खरे नाही ह्‌या ज्ञानामुळे सदानन्दयोगी जो असतो तो आपल्या दृष्टी समोरील जगताचे मार्जन करुन अर्थात्‌ त्या पासून दृष्टी काढून घेवून मनामध्ये परमतत्वाचे ध्यान करतो आणि आनंदी होतो।।1।।

चैतन्यस्यैकरुपत्वाद्‌ भेदो युक्तो न कर्हिचित्‌।।
जीवत्वचिं तथाज्ञेयं रज्ज्वां सर्पग्रहो यथा।।2।।
अर्थ—चैतन्य स्वरुपाशी आपले एकरुपत्व न ठेवता त्यांत ़द्वंद्व म्हणजे दोन भाव ठेवणे, दुजाभाव करणे हे सर्वथा उपयुक्त नाही, तसे करणे म्हणजे एकाद्या दोरीला ‘‘सर्प‘‘ समजून भ्रमित होणे आहे ।। 2।।

रज्ज्वज्ञानात्‌ क्षणेनैव यद्वद्‌ रज्जुर्हि सर्पिणी।।
भाति तद्वचितिः साक्षाद्विश्वाकारेण केवला ।। 3।।
अर्थ—— रज्जु म्हणजे दोरीच्या खर्‌या सानाशिवाय ती दोरी म्हणजे सापच आहे असा मनाचा गैर समज होतो, तसाच ह्‌या शाश्वत अश्या चिरचैतन्यावर आपण भ्रामक अश्या ह्‌या जगताचा भ्रम धरुन बसतो ।।3।।

उपादानं प्रपञचस्य ब्रम्हणोन्यन्न विद्यते ।।
तस्मात्सर्वप्रपत्रिोंयं ब्रम्हैवास्ति न चेतरत्‌ ।।4।।
अर्थ—उपादान म्हणजे (मूळ घटक द्रव्य) ह्‌या प्रपंचाचे ज्यावर आपल्याला रुप दिसते ते घटक द्रव्य , हे ब्रम्हतत्वच आहे दुसरे ब्रम्हाशिवाय काही ही नाही, म्हणून हा सर्व प्रपंच म्हणजे ब्रम्हतत्वच आहे दुसरे काही ही नाही ।।4।।

व्याप्यव्यापकता मिथ्या सर्वमात्मेति शासनात्‌ ।।
इति ज्ञाते परे तत्वे भेदस्यावसरः कुतः।। 5 ।।
अर्थ— व्याप्य म्हणजे आपल्या अस्तित्वाच्या पांघरुणाखाली घेण्यास जे योग्य आहे ते, आणि व्यापले गेलेले जे आहे ते, म्हणजे सर्वच मिथ्या भ्रामक असून सर्व त्या परब्रम्हरुपाचेच शासनाखाली नियंत्रित आहे. हे जाणल्यावर परमतत्वाच्या पलीकडे आणखी काय वेगळे राहणार ?।।5।।

ब्रम्हणः सर्वभूतानि जायन्ते परमात्मनः ।।
तस्मादेतानि ब्रम्हैव भवन्तीति विचिन्त्यताम्‌ ।।6।।
अर्थ—परमात्मा—ब्रम्हतत्वापासूनच सर्व प्राणी उत्पन्न झाले आहेत असे समजल्यावर ते सर्व प्राणी ब्रम्हभूतच आहेत असा विचार करावा ।।6।।

ब्रम्हौव सर्वनामानि रुपाणि विविधानि च ।।
कर्माण्यापि समग्राणि बिभर्तीति विभाव्यतत्‌ ।।7।।
अर्थ—सर्व नामरुपांनी ब्रम्हतत्वच व्यापलेले आहे. आणि सर्व कार्ये सुध्दा त्यानीच भरलेली आहेत, असे जाणवे. ।।7।।

सूवर्णज्जायमानस्य सुवर्णत्वं च शाश्वतम्‌ ।।
ब्रम्हैणी जायमानस्य ब्रम्हत्वंच तथा भवेत्‌ ।।8।।
अर्थ— सोन्या पासून घडलेल्या सर्वच अलंकारात, वस्तूंमध्ये सोनेच असते हे जसे निश्चित आहे, तद्वत्‌ हे सर्वच ब्रम्हतत्वाचेच विविध रुपें अहेत हे जाणणार्‌याला हे सर्व जगत्‌ ब्रम्हच वाटते ।।8।।

स्वल्पमप्यन्तरं कृत्वा जीवोच्चेत्परमात्मन : ।।
यस्तिष्ठति विमूढात्मा भयं तस्याभिभाषितम्‌ ।।9।।
अर्थ—थोडे से जरी अंतर परमात्मापासून ह्‌या जगताचे तुम्ही मानले तर तो मूढ (अज्ञानी ) भयभीत होतो ।।9।।

यदज्ञानाद्‌भवेद्‌द्वौतमितरत्तत्प्रपश्यति ।।
आत्मत्वेन तदा सर्व नेतरत्तत्र चाण्वपि ।।10।।
अर्थ—जो अज्ञानाने परमेश्वर आणि जगत्‌ ह्‌यांत द्वैत भाव ठेवतो त्यास ते समजत नााही परंतु जो ब्रम्हात्म भावाने सर्व जगता कडे बघतो तो अणुरेणु पण त्याच तत्वाने भरलेले आहेत्‌ हे जाणतो ।।10।।

अनुभूतोयप्यं लोको व्यवहारक्षमोपिसन्‌ ।।
असद्रुपो यथा स्वप्न उत्तरक्षणबााधित : ।।11।।
अर्थ—हया्‌ जगतामध्ये अनुभव घेत असतांना सुध्दा तो ज्ञानी ब्रम्हात्मभावाने राहणारा साधुपुरुष व्यवहारांत सक्षम असून सुध्दा हे जग अगदी असत्य आहे, भ्रामक आहे हे त्या प्रमाणेच जाणतो ज्या प्रमाणे एखादे स्वप्न बघता—बघता त्यांतून एकदम जाग येते व त्याच्या अंतिम क्षणाला आपले अहं तत्व जागृत होवून आपणास कळते की अरे! खरे तर आपण ह्‌या जगात जागे होवून वावरतो आहोत. ते तर सर्व असत्यच होते. अगदी त्या प्रमाणे ज्ञानी ह्‌या जगताला मिथ्या समजतो ।।11।।

स्वप्ने जागरितं नाास्ति जागरे स्वप्नता न हि ।।
द्वयमेव लये नास्तिलयोपि ह्यनयोर्नंच ।।12।।
अर्थ— स्वप्नामध्ये जागृतावस्था नसते ती लय पावते. जागृतावस्था मध्ये स्वप्नावस्था नसते ती लय पावते. ती त्या वेळेस नसते. मात्र दोघींचा ही लय होत नाही. हं‌याचा कुणाचाच नाा होत नाही. ।।12।।

त्रयमेव भवेन्मिथ्या गुणत्रयविनिर्मितम्‌ ।।
अस्य द्रष्टा गुणातितो नित्यो ह्यैष चिदात्मकः ।।13।।
अर्थ—त्या तिघींचा ही भ्रमवश नाश होतो. त्रिगुणांमुळे निर्मित अश्या स्थितीचा मात्र ह्‌या गुणांचा जो दृष्टा आहे तो नाश पावत नाही. तो सदा ( नित्य )शाश्वत चिदानन्द असतो ।।13।।

यद्वमृदि घटभ्रान्तिः शुक्तो हि रजतस्थितिः ।।
तद्वदब्रम्हाणि जीवत्वं बीक्षमाणे विनश्यति ।।14।।
अर्थ—ज्या प्रमाणे मृत्तिका (माती) आणि घट ह्‌या मध्यें भ्रांती उत्पन्न होते किंवा श्िांपले पाहून चांदीचा भ्रम उत्पन्न होतो त्याच प्रमाणे ब्रम्हतत्वाचा जीव उत्पन्न झाल्यावर विसर पडून तो जीवभावच (चांदीच आहे हे जसे भ्रमाने वाटते) तसे वाटते.।।14।।

यथा मृदि घटो नाम कनके कुण्डलाभिधा ।।
शुक्तौे हि रजतख्यातिर्जीवशुद्धस्तथा परे ।।15।।
अर्थ—ज्या प्रमाणे मातीला घट हे नांव दिले जाते, सोन्याला कुण्डल असे म्हटले जाते तद्वतच ब्रम्हतत्वाला जीव शब्दाने म्हटले जाते (आणि शिंपल्याला चांदी म्हणून समजले जाते) ।।15।।

यथैव व्योम्नि नीलत्व यथा नीरं मरुस्थले ।।
पुरुशत्वं यथा स्थाणौ तद्वद्‌ विश्वं चिदात्मनि ।।16।।
अर्थ—ज्या प्रमाणे आकाशाला नीळेपणा भासतो.वाळवंटात पाणी वाहतांना दिसते (मृगजळ). खांबामध्ये एकाद्या कुणी माणूसच उभा आहे असा भ्रम होतो तद्वत्‌ हे सर्व जग चिरस्थाई अश्या आत्मतत्वाचे असून सुध्दा भ्रमाने भासमान्‌ होते. आत्मतत्वावर जगाचा भास होतो.।।16।।

यथैव शून्ये वेदान्तो गन्धर्वाणां पुरं यथा ।।
यथाकाशे द्विचन्द्रत्ंव तद्वत्‌ सत्ये जगत्स्थितिः ।।17।।
अर्थ—ज्या प्रमाणे भाून्यांमध्ये वेदान्त, गंधर्वनगर म्हटले जाते किंवा आकाशांत दोन चंद्र दिसतात असे म्हटले जाते (एकाद्याच्या डोळयांत फरक झाल्यावर त्याला दोन—दोन प्रतिमा दिसू लागतात किंवा बोटाने डोळा दाबल्यावर पण दोन दोन दिसते) त्या प्रमाणे हे जग खरेच आहे असे वाटते. ।।17।।

यथातरङ्‌गकल्लोलर्जलमेव स्फुरत्यलम्‌ ।।
अनेक नामरुपैश्च ब्रम्हैकंप्रविजृम्भतें ।।18।।
अर्थ—ज्या प्रमाणे तरंग आणि लाटा ह्‌या पाण्यामध्ये स्वयेस्फुर्तिनेच येतात तसेच हे ब्रम्हतत्व अनेक रुपाने प्रकट होते ।।18।।

घटनाम्ना यथा पृथ्वी पटनाम्ना हि तत्वतः।।
जगन्नाम्ना चिदाभाति सर्वं ब्रम्हैव केवलम्‌ ।।19।।
अर्थ—घट ह्‌या नावाने ज्या प्रमाणे माती (अर्थात पृथ्वी तत्वच रुप बदलवून येते) किंवा वस्त्र ह्‌या नावाने पण तत्वतः जमीनी मधूनच कापूस येतो व त्याचे वस्त्र बनते. तद्वत हे एक ब्रम्हतत्वच सर्वत्र जगत्‌ म्हणून चित्‌ स्वरुपाने शाश्वत रुपामध्यें विद्यमान असून विराजित होते।।19।।

यथा वन्ध्यासुतोनास्ति यथा नास्ति मरौजलम्‌ ।।
यथा नास्तिनभेा वृक्षस्तथा नास्ति गत्स्थितिः।।20।।
अर्थ—ज्या प्रमाणे वंध्य स्त्री चा पुत्र अस्तित्वांतच नसतो,ज्या प्रमाणे वाळवंटात पाणी नसते तो नुसता (मृगजळ) भ्रम असतो, ज्या प्रमाणे नभ नसते पण भासते त्यांत गंधर्व नगर व वृक्ष चित्ररूपाने भसतात त्याच प्रमाणे हे जगत्‌ पण खरे अस्तित्वांत नाही.।।20।।

गृह्यमाणें घटे यद्वन्मृत्तिका भाति चै बलात्‌ ।।
वीक्ष्यमाणें प्रपञ्‌चेतू ब्रम्हैवाभाति भासुरम्‌ ।।21।।
अर्थ—घट घेतल्यानन्तर ज्या प्रमाणे आम्ही मातीच (हातात) घेतली आहे असे वाटते त्या प्रमाणे ह्‌या प्रपंचाला बघीतल्यावर त्या—त्या रूपाने ब्रम्हतत्वच प्रकाशित होत असते.।।21।।

सदैवात्मा विशुध्दौस्ति ह्यशुध्दौ भति वै सदा ।।
यथैव द्विविधा रज्जुर्ज्ञानिनोज्ञानिनोनिशम्‌ ।।22।।
अर्थ—त्याच प्रमाणे आत्मा सदैव शुध्दच असतो परन्तु भ्रमाने तो अशुध्दच वाटतो. सर्प रज्जु भ्रम हा ज्ञानी आणि अज्ञानी माणसांमध्ये वेगळाच भसतो (ज्ञान झाल्यावर ती दोरीच आहे म्हणून भय वाटत नाही.)।।22।।

यथैव मृण्मयः कुम्भस्तद्वद्‌देहोपि चिन्मयः ।।
अत्मानात्मविवेकोय वृथा क्रियते बुधै :।।23।।
अर्थ—ज्या प्रमाणे कुम्भ हा मृण्मय म्हणजे मातीचा आहे तद्वत्‌ हा देह चिन्मयस्वरूपच आहे. आत्मा आणि अनात्मा हा विवके पंडित लोक व्यर्थच करतात.।।23।।

सर्पत्वेन यथा रज्जू रजतत्वेन शुक्तिका ।।
विनिर्णीता विमूढेन देहत्वेन तथात्मता ।।24।।
अर्थ—ज्या प्रमाणे दोरी ला सर्प मानणे,शिंपल्याला चांदी मानणे, त्या प्रमाणेच आत्म्याला मूढ मनुश्य देह समजतो. ।।24।।

घटत्वेन यथा पृथ्वी जलत्वन मरीचिका ।।
गृहत्वेन हि काश्ठानि खङ्‌गत्वेनैव लोहता ।।25।।
अर्थ—जलत्व (म्हणजे पाणी असणे) ह्‌यास मृगजळ, घटत्व म्हणजे घडा असणे म्हणजे माती आणि घर म्हटले म्हणजे लाकडी सामान आणि शस्त्र म्हटले म्हणजे लोखंड.त्या प्रमाणे आत्मतत्व म्हणजे हा देहच असे अज्ञानामुळे मूढ मनुश्यास वाटते. ।।25।।

हृदात्मनि देहत्वं पश्यत्यज्ञानयोगतः।।
नष्टेज्ञाने किमप्येव ंनो जातं नैव तिष्ठति ।।26।।
अर्थ— आत्मतत्व म्हणजे हा देहच असे अज्ञानामुळे मूढ मनष्यास वाटते आणि अज्ञान नष्ट झाल्यावर कांहीच रहात नाही आणि नष्ट ही होत नाही. ।।26।।

सुखबुध्द्या जगद्‌‌भानं जगद्वस्तुसुसङग्रहः ।।
जगत्पदाथंभोगेच्छा भोगेपि किल नो सुखम्‌ ।।27।।
अर्थ—सुखप्राप्तीच्या आशेने जगाचे भान होते.जगातील वस्तूंचा संग्रह,आणि जगांतील सुखांच्या उपभोगाची इच्छा होते,पण भोगा मध्ये सुध्दा सुख प्राप्ती होत नाही.।।27।।

क्रियोद्‌भं सुखं न स्याद्यतः सो दुःखसम्भवः ।।
अर्जनं पालनं भोगः कर्मणैवहि सिध्यति ।।28।।
अर्थ—क्रिये पासून उत्पन्न होणारे जे सुख वाटते ते (खरे)े सुख मिळत नाही. म्हणून ते दुःख उत्पन्न करणारेच असते. सुख प्राप्त करणे, त्याला टिकविणे आणि त्याचा भोग होणे हे सर्व क्रिया केल्यानेच होते. ।।28।।

कर्मण भवति श्रान्तो देहतो मनसोपि च ।।
चिन्ता च व्यवधानञ्‌च भाक्तिर्‌हासोथ दुःखिता ।।29।।
अर्थ—क्रिया केल्याने अर्थात्‌ ते ते काम केल्याने शारीरिक आणि मानसिक थकवा येतो. चिन्ता, अडथळे आणि शक्तिपात होवून परिणामी दुःखच होते.।।29।।

अर्थानामर्जने क्लेशस्तथैव परिपालने ।।
नाशं दुःख व्यये दुःखं भोगे दुःख तथैव च ।।30।।
अर्थ—धन मिळवताना पण श्रम, त्रास होतो, सांभाळतांना पण त्रास होतो आणि नाश झाला ,खर्च झाला तरी पण ते धन दुःखदच ठरते. उपभोग घेतला तरी ते परिणमी दुःखदायकच ठरते.।।30।।

समूहोदृश्यवस्तूनां जगन्नाम्ना विबुध्यते ।।
भोग्यं भोगश्च भोक्तेति त्रिपुट्‌या व्यवहार्‌यते ।।31।।
अर्थ— दिसणार्‌या वस्तूंचा समूह ह्‌यालाच जग म्हटले जाते. भोग घेण्यास लायक वस्तू , त्याचा आनन्द आणि तो आनन्द घेणारा हे मिळूनच त्या त्रिपुटीला (भोग्य,भोग, भोक्ता) जग असे म्हटले जाते.।।31।।

सुखाभासं विनिर्भांय दुःखदं यः सदैव हि ।।
इतोपि दुःखदं किं स्यान्मिथ्याचापि च वञ्‌चकम्‌।।32।।
अर्थ—ह्‌या वस्तूंपासून मिळणारा आनन्द नेहमीच सुखाचा आभासमात्र असतो, सदैव परिणामी दुःखदच (अर्थात्‌ पंचेन्द्रीयांपासून मिळणारा आनन्द हा परिणामी दुःखदायकच असतो) त्याचापासून मिळणारे दुःख सुध्दा कसे असते तर ते सुध्दा मिथ्या आणि भ्रामकच असते.।।32।।

त्रिकालाबाधितं सत्यं जगद्‌वक्तुं न शक्यते।।
तथैव भोग्य भोक्त्रादि ज्ञातृज्ञेयादिकं च यत्‌।।33।।
अर्थ—हे जग त्रिकालाबाधित (वर्तमान, भूत आणि भविष्य ह्‌या तिन्ही काळांत जे टिकून राहते ते त्रिकाल अबाधित) सत्य आहे असे म्हणता येत नाही म्हणून भाग्य आणि भोक्ता ह्‌यांना नित्यत्व आणि अविनाशित्व नाही,जसे की ‘ज्ञान‘ आणि ‘ज्ञाता‘ ह्‌यांना अविनाशित्व आहे.।।33।।

आत्मेन्द्रियमनोयुक्तं भोक्तेत्याहुर्मनीषिणः।।
उपाधिना विहीनश्चेन्नो भोक्तात्मा स्वभावतः।।34।।
अर्थ—आत्मा इंद्रियें आणि मनाने घेरलेला असतो. तो भोक्ता असा संबोधिला जातो. जो अनादि अनंत असतो तो उपाधिरहित अक्षररुप असतो. तो ‘जाणणारा‘ ‘ज्ञाता‘ हाच खरा ‘आत्मा‘ असतो असे जाणकार ज्ञानी लोक सांगतात.।।34।।

असङ्‌गो ह्ययमात्मेति श्रुतिबोधो यतस्ततः।।
रक्तस्फटिकवज्ज्ञेयं भोक्तात्मैति च यद्वचः।।35।।
अर्थ—हा आत्मा असंग म्हणजे निर्मल अविकारी असतो, ज्या प्रमाणे स्फटिक हे स्वच्छ असते परन्तु त्यास एकाद्या रक्त म्हणजे लाल वस्तूवर ठेवले तर त्यावर लाल प्रभा पडते, आपल्या नेत्रेंद्रियाला तो लाल दिसतो. परन्तु वास्तविक तो तसाच वर्णहीन आणि स्वच्छ आसतो. ह्‌या प्रमाणे ‘आत्मा हा भोक्ता आहे‘ हे वचन समजून घ्यावे.।।35।।

भोक्ता सत्वगुणः शुध्दो भोगानां साधनं रजः।।
भोग्यं तमोगुणं प्नाहुरात्मा चैषां प्रकाशकः।।36।।
अर्थ—सत्वगुणंचा आत्मा हा भोक्ता ‘शुध्द आत्मा‘ असतो आणि (विविध गुणंचा) विविध भोगांचा साधक आत्मा हा रजोगुणी म्हटला जातो, आणि जो तमोगुणांचा ग्राहक आत्मा असतो त्यांस तमोगुणी आत्मा म्हटला जातो. ह्‌या प्रमाणे हा आत्मा विद्यमान असतो.।।36।।

आकाशो वायुरग्निश्च जलं भूमिस्तथैव च।।
सत्वं रजस्तम इति प्रोक्ता प्रकृतिरष्टधा।।37।।
अर्थ—पृथ्वी, आप, तेज,वायु, आणि आकाश ही पंचमहाभूते आणि सत्व,रज आणि तम हे मिळून अष्टधा प्रकृति होते.।।37।।

स्वर्गो मर्त्यश्च पातालश्चोतः प्रोतोनयैव हि।।
अस्या यत्सूक्ष्मरुपं तन्मायेति समुदीर्यते ।।38।।
अर्थ—स्वर्ग मृत्यु आणि पाताळ यांतील तिन्ही लोक ह्‌या अष्टधा प्रकृतिनी काठोकाठ भरलेले आहेत. आणि ह्‌यांचे जे सूक्ष्मरुप आते ते माया म्हणून म्हटले गेले आहेत.।।38।।

आसीद्‌ब्रम्हैकमेवाग्रं नासीद्‌भिन्नं ततः क्वचित्‌।।
अहं ब्रम्हेति स्वात्मानं तदवेत्तत एव हि।।39।।
अर्थ—ब्रम्ह हे तत्वच त्याच्या सुरवातीस असते आणि त्या शिवाय दुसरे कांही ही नाही. आणि ‘अहं ब्रम्ह‘ ह्‌या शिवाय दुसरे तत्व तेथे नाही.।।39।।

सर्वमासीज्जगच्चति श्रुत्या निर्दिश्यते यतः।।
इयमेव हि मायास्यां ब्रम्हतेजो महेश्वरा।।40।।
अर्थ—श्रुति म्हणजे वेदांनी असा निर्देश दिला आहे की हे सर्वच जगत्‌ असे आहे आणि ही सर्व माया (भ्रम) म्हणजे भगवान महेश्वराचीच अगाध भाक्ति आहे.।।40।।

मायामात्रमिदं द्वैतं माया नाम स्वकल्पना।।
‘अहंब्रम्हास्मि‘ चैव या तया सर्वमिदं जगत्‌।।41।।
अर्थ—माया ही परमेश्वरापासून द्वैत म्हणजे दूसरी ही एक कल्पना आहे. जिच्या मुळे हे सर्व जग आभासित होते, परंतु ते ‘अहं ब्रम्हास्मिच‘ आहे. अर्थात्‌ सर्वत्र परमेश्वराचीच शक्ति आहे,जी एकमात्र विद्यमान्‌ आहे. अर्थात्‌ माये मध्ये ब्रम्हतेजच आहे़।।41।।

आभासरुप जगतः मूलाभासोयमीदृशः।।
अस्मिन्‌ ब्रम्हप्रकाशो यो बिम्बितः स महेश्वरः।।42।।
अर्थ—ह्‌या भ्रामक (आभास रूप)जगताच्या मूळाशी हा मुख्य प्रकाशक अश्यारीतीने विद्यमान आहे.आणि ह्‌या मूळ ब्रम्हप्रकाशकाचे तेज प्रतिबिंब (आरश्यांत मुख दिसावे तसे) ह्‌या रूपाने दिसते.(ते स्वतः अगदी अविकारी आणि दूर आहे.)।।42।।

माया सा त्रिविधा प्रोक्ता सत्वराजसतामसी।।
‘अहंब्रम्हास्मि‘ चेत्यत्र त्रिपुट्‌योद्‌गम ईदृशः।।43।।
अर्थ—माया जी आहे ती मात्र त्रिविधा ह्‌या तीन गुणांनी म्हणजे सत्व, रज, तम ह्‌यांनी नटलेली असून त्याचा उद्‌गम मात्र ‘अहं ब्रम्हास्मि‘ ह्‌या एकच तत्वामध्ये आहे।।43।।

अहं भौक्ता ब्रम्ह चान्यद्‌ भोग्यं भोगोस्मि वेदनम्‌।।
अहं ज्ञाता ब्रम्ह ज्ञेय ज्ञानमस्मीति वेदनम्‌।।44।।
अर्थ—मी भोगणारा असून जे भोग्य आहे भोगण्यास योग्य आहे ते दुसरे आहे असे समजणे म्हणजे ‘अहं अस्मि‘ मी ज्ञाता म्हणजे ब्रम्ह आणि जाणण्यालायक ज्ञेय ते दुसरे असा द्वैतभाव होईल.।।44।।

स्मरणं विस्मरणापेक्षं विस्मृतिस्तु नि जावृतिः।।
अतोह स्मरणात्पूर्वं स्वावृतिश्चानुमीयतें।।45।।
अर्थ—स्मरण आणि विस्मरण ह्‌यांत विस्मरण म्हणजे स्मरणाची निवृत्ति म्हणजे (त्याचा विसर पडणे,मतिभ्रम) हा प्रकार आहे. म्हणून मी माझे स्मरण करीत असतांना (दूर कोठे तरी काळा आड)आपल्या स्व—पुनरावृत्तिला अनुमान करून जाणले पाहिजे.।।45।।

इदमावरणं प्रोक्तमसच्चापि तमस्तथा।।
तम आसीदसद्वेति चेदमग्नवदत्‌ श्रुतिः।।46।।
अर्थ—हे आच्छादन असत्‌ आणि तमस्‌ म्हटले गेले आहे. श्रुति,वेदशास्त्रांनी सांगीतले आहे की हे असत्‌ होतेच पण कसे? तर ते अस्तित्वांत नसलेलेच पण सुरवातीला भ्रमांने वाटले।।46।।

आकाशवत्तमो ज्ञानमथवावरण तथा।।
तस्मिन्नहं ब्रम्ह चेति विक्षेंपश्चञ्‌चलोनिलः।।47।।
अर्थ—आकाशाप्रमाणेच तम आणि अज्ञान आवरण (की जे भ्रामक रीत्या असून खरे अस्तित्वांत नाहीच असे)हे पण भासले. ज्या प्रमाणे वायु चंचल असतो तो स्थिर नाही तद्वत्‌ हे वाटणे की ‘मी ब्रम्ह नाही‘ हे उलटरूपानेच वाटते.।।47।।

आभासोनल इत्युक्तो रसास्वादो स्य त ज्जलम।।
इतःस्थूलानुभूतिर्या भूमिःसा सूक्ष्मरुपतः।।48।।
अर्थ—आभास हा अग्निरुप आणि रसास्वाद हा जलरूप असून भूमि ही स्थूल स्वरूपाची अनुभूति आहे.ह्‌या सर्व अनुभूति पंचमहाभूतांचे सूक्ष्मरूपच आहेत.।।48।।

अष्टधा प्रकृतेः सुक्ष्मं रूप मायेति यत्‌ स्थितम्‌।।
माया साप्यष्टधा चैवं सूक्ष्मरूपेण बीजवत्‌।।49।।
अर्थ—अष्टधा प्रकृतिच्या स्वरूपांत मायाहीच उभी राहते. मायेचे सूक्ष्मरूप म्हणजे त्याच्या बुडाशी मायाच बीज रूपाने आहे.।।49।।

गुणसाम्या च मायेयं मूला प्रकृतिरूच्यते।।
ब्रम्हणोजानतो भाति ब्रम्हज्ञानाद्वि न भयति।।50।।
अर्थ—गुणांचा (सत्व,रज,तम)साम्यरूपाने उदय झाल्यावर माया उत्पन्न होते हीच मूळ प्रकृति होय. ब्रम्हतत्वाला विस्मृत केल्यामुळे ती जाणवते, आणि त्याचे ज्ञान झाल्यावर ती नाश पावते.।।50।।

मूलप्रकृतिरेवेयं मूलमायेत्यपीर्यते।।
मूलाविद्येति च प्रोक्ता जगद्‌वृक्षस्य मूलतः।।51।।
अर्थ—मूल प्रकृति हीच मूलमाया म्हणून म्हटली जाते. जगत्‌वृक्षाची मूलतः जी विद्या तीच मूल विद्या होय.।।51।।

असङ्‌गं ब्रम्हनित्यं हि सच्चिदानन्दमद्वयम्‌।।
तस्मिन्न माया जीवेशौ ना विद्यां न जगत्तथा।।52।।
अर्थ—ब्रम्हरुप —तत्व हे निर्विकार नित्य चिदानन्दमय आणि चिन्मय आहे. त्यांत म्हणजे जगदीश्वरांत विद्या,माया आणि हे विनाशी तत्वपण नाहीं.।।52।।

मायाया पूर्वरुपं तु स्वात्माज्ञानं तमोपि वा।।
ततो ह्युपनिशद्‌ब्रुते माया सा तु महत्तमः।।53।।
अर्थ—आपल्या स्वआत्मस्वरूपाविषयी अज्ञान आणि तम म्हणजे अंधकार हेच माया ह्‌या रूपाचे पुर्वरूप म्हणजे आदि रूप आहे. आणि म्हणूनच आमचे उपनिशद्‌ सांगते की ‘माया‘ ही महत्तम म्हणजे मोठ्‌यात मोठ्‌या स्वरूपाची आहे।।53।।

जगत्सर्जनसङ्‌कल्पादतिसूक्ष्मतयात्र हि।।
अस्ति प्रवृत्तिप्रारम्भः निवृत्तिब्रम्हमात्रता।।54।।
अर्थ—जगताची उत्पत्ति होण्यास ईश्वराचा जो संकल्प कारण झाला त्याचा अतिसूक्ष्मरूपाने प्रारंभ ‘प्रवृत्ति प्रारंभ‘ हा ब्रम्हतत्वाची निवृत्तिच आहे।।54।।

यथाकाशस्थितो वायु तथैवावरणे स्थिता।।
अहंब्रम्हास्मिरूपेयं वेदना बहुसूक्ष्मतः।।55।।
अर्थ—ज्या प्रमाणे आकाशांत स्थित वायु हा आवरणांत स्थित आहे,‘अहं ब्रम्हास्मि‘ ही ज्ञेयता अत्यंत सूक्ष्म रूपांत तशीच आहे।।55।।

आवरणेद्‌भवविक्षेपो ह्यतिसूक्ष्मोयमोदशः।।
स्थूलस्थूलतया पश्चाद्‌भवत सृष्टिकारणम्‌।।56।।
अर्थ—आवरणांतून उत्पन्न झालेला वायु विक्षेपमात्राने अत्यंत सूक्ष्मरूप झाला़. तदनन्तर स्थूल हे सृष्टिरूपास स्थूलतेने कारण झाले।।56।।

यथातिशुभ्रो विरलो मेघो हि भवति क्रमात्‌।।
स्थूलस्थूलो घनः कृष्णः वृष्टेः साक्षाध्दिकारणम्‌।।57।।
अर्थ—ज्या प्रमाणे अतिशुभ्र असा मेघ विरळ होता होता कष्णमेघ आणि क्रमाने घनदाट होतो आणि वृष्टिला साक्षात्‌ कारण बनतो।।57।।

तथैवेयं ब्रम्हस्फूर्तिर्विरला भाुभ्रा हि सा क्रमात्‌।।
स्थूलस्थूला घनीभूय जगः कारजं भवेत्‌।।58।।
अर्थ—त्या प्रमाणेच ही ब्रम्हतत्वाची स्फूर्ति सुरवातीला (संकल्प रूपईश्वराचे स्फुरण आदि क्रिया)अत्यंत विरल शुभ्ररूप होतो नंतर ती हळू—हळू स्थूल आणि स्थूल होताहोता जगत्‌ कारण बनली।।58।।

यथैव नावमाश्रित्य तीर्त्वाब्ध्तामपि त्यजेत्‌।।
ब्रम्हास्मि भावमाश्रित्य तीर्त्वा तमपि विसृजेत्‌।।59।।
अर्थ—ज्या प्रमाणे नांवेत बसून समुद्रावर तरंगात जाऊन शेवटी तो पार केल्यावर त्या नावेला सुध्दा सोडून देतात, त्या प्रमाणे ‘अहं ब्रम्हास्मि‘ ह्‌याचा आश्रय घेवून भवसागराला तरून जाऊन त्यास पण अर्थात्‌, आपल्या ‘अहं तत्वाला‘ विसर्जित करावे।।59।।

।। इति अष्टमो अध्यायः समाप्त ।।

home-last-sec-img