Literature

जितेंद्रियत्व

स्त्रीपुरुष देह प्रजोत्पादनाची साधनें असल्यामुळे ते आपापल्या स्वभावाने आपल्या साहचर्यात असणाऱ्या परस्परांत कामविकार उत्पन्न करतात. त्यांचे तसे शीलच आहे. आकर्षणस्वरूपं हि शरीरं योषितामिह । तथा विकर्षणं नृणां शरीरं स्यात्स्वरूपतः ॥ आकर्षक आणि आकृष्य स्वभावाने स्त्री पुरुषांचे देह आहेत. लोहचुंबक जसा आपल्याकडे लोखंडाला ओढतो त्याप्रमाणें स्त्री पुरुषाला आपल्याकडे ओढते. अद्वैत आत्मसाक्षात्कारावधि “ स्त्रीयांस पाहिजे पुरुष । पुरुषास पाहिजे स्त्रीवेष । ऐसा आवडीचा संतोष । परस्परें ।। १६ । ७ । ३४ || स्थूळाचे मूळ तें ‘ लिंग। लिंगामध्ये हे प्रसंग येणें प्रकारें जग प्रत्यक्ष चाले ॥ ३५ ॥

पुरुषांचा जीव स्त्रियांची जीवी । ऐसी होते उठाठेवी । परी या सूक्ष्माची गोची । समजली पाहिजे ॥ ३६ || स्त्रीसी पुरुष पुरुषास बंधु। ऐसा आहे हा संमंधु । या कारणे सूक्ष्मसंवादु । सूक्ष्मींच आहे ॥ ३९ || पुरुष इच्छेमध्ये प्रकृति । प्रकृतिमध्ये पुरुष व्यक्ति । प्रकृतिपुरुष बोलती । येणें न्यायें ॥४०॥ पिंडावरून ब्रह्मांड पाहावें। प्रचीतीनें प्रचीतीस घ्यावें । उमजेना तरी उमजावें । विवरचिवरों ॥ ११ ॥ द्वैत इच्छा होते मुळी 1 तरी ते आली भूमंडळी | भूमंडळी आणि मुळी । रुजू पाहावें ॥ ४२ ॥ ” ( श्रीदासबोध ) पशुपक्ष्यादिकांतून एका मनुष्यांतच केवळ इतर स्त्रीशी आईबहिण या

दृष्टीने चालण्याचा शुद्ध व्यवहार दिसून येतो. त्या त्या नात्यागोत्यातून त्याचे निर्विषय शुद्ध प्रेम दिसून येते. माणुसकी ती यांतच आहे हेहि खरें. हो माणुसकी सोडून मनुष्य पशुवृत्तीकडे वाहवू नये, निषिद्ध कामाविकाराला बळी पडून नीतिभ्रष्ट होऊ नये म्हणून धर्मशास्त्रानें फारच निर्बंध घातले आहेत. कामचांडाळाचे दुष्ट, निर्दयी, गोड बोलून गळा कापण्याचे मोठे खुनशी डाव साधणारें असें निंदय वर्तन असते, असे सर्व सांगतात. म्हणून यावर, कोणी विश्वास ठेवू नये. विषाची परीक्षा करूं नये म्हणून म्हणतात. त्याप्रमाणेच याची स्थिति आहे. याच्या प्रवेशाला वाव मिळेल अशी स्थळे, असे संनिवेश, देशकाल, आहारविहार, स्त्रियांचे साहचर्य हे होईल तितक टाळावें व अशा प्रसंगी धैर्य न खचू देतां, ती कल्पना न उद्भवू देतां आई बहिणांच्या प्रेमाची आठवण करून पवित्र शुद्ध वर्तन ठेवावें. स्वधर्मे स्थिरता धैर्ये धर्मश्चेंद्रियनिग्रहः

“ काम उत्पन्न होताहे ते वेळ नावरे जना कामवेड जडे ज्याला तो प्राणी आत्मघातकी ॥ (पड्रिपु. ४) कित्येक योषितेसाठी जगती मृत्यु पावले । झडाच घालती नेढें पतंगापरि भस्मती ॥ ५ ॥ कित्येक भोरपी झाले किती गेले उठोनिया । बाटले भ्रष्टले मैले बुडाले कामवेसनी ॥ ७ ॥ व्याधीनें नासती अंगें नासिकें झडती जनीं । औषधे दंतहि जाती रूप हानीहि होतसे ॥ ८ ॥ रुपहानी, शक्तिहानी, द्रव्यहानी परोपरी | कुलहानी यातिहानी सर्व हानीच होतसे ॥ ९ कित्येक मातले भोंगे लोक लाजचि सांडिलीं । शुभाशुभ नसे तेथें नीचाशी उंच भ्रती ॥ १० ॥ विधिने विषयो घ्यावा अविधि नसतां बरें । आश्रमीं न्यायनीतीनें प्रपंच करणें सुखें ॥१२॥” ( श्रीसमर्थ : षड्रिपु प्रकरण – काम ) भ्रष्टतेची वाटच बुजवून टाकावी म्हणून

..श्रीतुकारामानी” एकांती लोकांती स्त्रियांशी भाषण प्राण गेल्या जाण करूं नये ॥ ” असे अति निक्षून सांगितले आहे. “स्त्रीयांचा तो संग नको नारायणा । असा एक त्यांचा अभंगहि आहे. वेश्येला पाठवून केलेल्या परीक्षताह तुकाराम उत्तम प्रकारें उत्तीर्ण झाल्याचे पाहून तोच मंबाजी पुढे तुकारामाच्या पायीं लागल्याची गोष्ट प्रसिद्ध आहेच. श्रीसमर्थांनी इंद्राने परीक्षेकरितां पाठविलेल्या ऊर्वशीस मारुतीरायांच्या दर्शनानें भीति दाखवून विरघळून टाकल्याची दासविश्रामधामांत एक गोष्ट आली आहे. सज्जनगडच्या पायथ्याशी असणारी नदी याच्याच स्मरणार्थ वाहत आहे असे तिथे सांगितले आहे. एक गृहस्थाचा आदशे तर दुसरा ब्रह्मचाऱ्याचा. याबाबती तही श्रीसमर्थानी रघुनाथाचा गुण घ्यावा ” त्याच्या एकपत्नीव्रताचे अनुकरण करावें म्हणून सांगितले आहे. “ शुकासारिखें पूर्ण वैराग्य ज्याचें ” म्हणून श्रीसमर्थांचें वर्णन आहे. अशी बाजवून पटणारी नाणी फार कमी. हा सबदा फार महाग आहे. इतिहासाचा या बाबतींत कटु अनुभव आहे. या दृष्टीनेच साधुसंत व शास्त्रकार स्त्रीसाहचार्यापासून दूर राहण्याचाच सर्व बांस उपदेश करीत आहे. इंद्रियाणां विचरतां विषयेष्वपहारिषु । संयमे यत्नमातिष्ठेद्विद्वान् यन्तेव वाजिनाम् ॥ ( मनु. २१८८) रथनियुक्त अश्वाचा जसा सारथी संयम करतो त्याप्रमाणेच विषयाकडे ओढणाऱ्या इंद्रि यांच्या संयमाचा यत्न करावा.

इंद्रियाणां विचरतां यन्मनोऽनुविधीयतेतदस्य हरति प्रज्ञां वायुर्नावमिवांभासि || २|६७ || त्रिविधं नरकस्येदं द्वारं नाशनमात्मनः । कामः क्रोधस्तथा लोभस्तस्मादेतत्त्रयं त्यजेत् शक्नोतीहैव यः सोढुं प्राक् शरीरविमोक्षणात्कामक्रोधोद्भवं वेगं स युक्तः स सुखी नरःआवृतं ज्ञानमेतेन ज्ञानिनो नित्यवैरिणा। कामरूपेण कौन्तेय दुष्पूरेणानलेन च ।। ३।३९ ।। इंद्रियाणि मनो बुद्धिरस्याधिष्ठानमुच्यते । एतैर्विमोहत्येष ज्ञानमानृत्य देहिनम् ॥ ४० ॥ तस्मात्त्वद्रियाण्यादौ नियम्य भरतर्षभपाप्मानं प्रजाहिह्येनं ज्ञानविज्ञाननाशनम् ।। इंद्रियाणि पराण्याहुरिंद्रियेभ्यः परं मनः । मनसस्तु परा बुद्धियों बुद्धेः परतस्तु सः ॥ ४२ ॥ एवं बुद्धेः परं बुद्धा संस्तभ्यात्मानमात्मनाजहि शत्रुं महाबाहो कामरूपं दुरासदम् ॥ ४३ || अव्यक्तोऽयमचिंत्योयमविकार्योऽयमुच्यतेतस्मादेवं विदित्वैनं नानुशोचितुमर्हसि || २ | २५ || प्रजहाति यदा कामान्सर्वान्पार्थ मनोगतान् । आत्मन्येवात्मना तुष्टः स्थितप्रज्ञस्तदोच्यते ।। २।५५ ।। ( म. गीता ) हे गीतेचे लोक मननीय आहेत. विषयांना जिंकावे. एक विषय असलातरी पुरे, आत्मबुद्धि नष्ट करतो. कामक्रोधलोभ हें त्रिविध नरकाचे द्वार आहे. या तिन्हींचा त्याग करावा. या कामक्रोधाचा वेग जो सहन करतो तोच युक्त आणि सुखी होतो. या कामशत्रूनेच केवळ आत्मज्ञान झाकले जाते. या कामामांची भोगानें शांति न होता उलट वृद्धीचच होते. इंद्रिये, मन, बुद्धि ही कामाची वसतिस्थले आहेत. यामुळेच तो आत्मज्ञान झांकून जीवाला मोहून टाकतो. प्रथम इंद्रियांना जिंकूनच या ज्ञान विज्ञाननाशक कामाचा नाश करावा लागतो. इंद्रियांचे चालक मन. मनाची बुद्धि व बुद्धीचाहि चालक ‘मी’ आहे. असे स्वतःच्या श्रेष्ठ भावनेनें, चालकत्वाच्या अधिकाराने ब सुखाच्या परमावधित्वाने कामास जिंकावें. बुद्धीच्याहूनहि पलीकडचे आपण आहों, बुद्धीच्या खाली मन, मनाच्या खाली इंद्रिये व इंद्रियांतून वावरणारा हा काम कितीतरी खाली आहे, याचा वारासुद्धा माझ्यापर्यंत वस्तुतः येऊन पोहोचत नाही, म्हणून आपली यथार्थ जाणीव ठेऊन आपल्या पवित्र आनंदमात्र स्वरूपाच्या भावनेने घाणेरड्या इंद्रियांच्या किळसवाण्या कामाचा मागमूसच नाहीसा करून टाकावा. अव्यक्त, अचित्य आणि नित्य अधिकारी असें केवळ जाणीव रूपसुखच आपले रूप आहे असे जाणले म्हणजे कसल्याहि शोकाचे कारणच उरत नाही. केवळ मनोवृत्तींतच उत्पन्न होणाऱ्या अखिल विषयकामनांना टाकून निरतिशय अशा पवित्र आत्मानंदानेंच जो तृप्त असतो, त्यालाच एक खरा आत्मनिश्चय झाला म्हणून समजावें. थोडक्यांत आपण या गीतेच्या श्लोकांचा सारांश- अर्थ पाहिला. किती अमोल उपदेश आहे हा !

विषयत्यागाच्या बाबतीत मनुस्मृतीचे हे श्लोकहि मननीय आहेत. इंद्रियाणां प्रसङ्गेन दोषमृच्छत्यसंशयम् । संनियम्य तु तान्येव ततः सिार्द्धं नियच्छति || (अ. २।९३ ) न जातु कामः कामानामुपभोगेन शाम्यतिहविषा कृष्णवत्मैव भूय एवाभिवर्धते ॥ ९४ ॥ यश्चैतान्प्रा प्नुयात्सर्वान यश्चैतान्केवलां रस्त्यजेत् । प्रापणात्सर्वकामानां परित्यागो विशिष्यते ||९५|| श्रुत्वा स्पृष्ट्वा च दृष्ट्वाच भुक्त्वा प्रात्वा च यो नरःन हृप्यति ग्लायति वा सविज्ञेयो जितेंद्रियः ॥ ९८॥ इंद्रियाणां हि सर्वेषां यद्येकं क्षरतीन्द्रियम् । तेनास्य क्षरति प्रज्ञा दृतेः पादादिवोदकम् ।। ९९।।

वशे त्कृत्वेन्द्रियग्रामं संयस्य च मनस्तथा । सर्वान्संसाधयेदर्थानक्षिण्यन योगतस्तनुम् ॥ १०० ॥ , 

स्पर्श, रूप, रस, गंध या पंचविषयांच्या ठिकाणी कर्ण, त्वचा, चक्षु, जिव्हा आणि प्राण ही इंद्रिये आसक्त झाली, यांना या विषयांचे वेड लागले म्हणजे दोष तितके संभवतात. तेच या विषयांपासून या इंद्रियांचा निग्रह केला, तर मोक्षासकट सर्व सिद्धि प्राप्त होते. विषय भोगून कधी त्यांच्या वासना नष्ट झाल्या आहेत, असे कुठे आढळत नाही. उलट तुपाने अग्नीची ज्वाला भडकल्याप्रमाणे भोगानें विषयांच्या इच्छा अधिकाधिक वाढू लागतात. अखिल विषयांच्या प्राप्तीपेक्षांहि अखिल विपर्याचा त्यागच सर्व सुखकारी होतो. सर्व विषय भोगणाऱ्या चक्रवर्तपेक्षा सर्वस्वाचा त्याग केलेला योगीचच अनंत पटीने सुखी असतो. मंजुळ ध्वनीश्रवणानें, मृदु स्पर्शाने सुंदर दृशाने पंचपकान्नांनी, मधुर सुवासाने ज्याच्या मनावर इष्टानिष्टतेचा असा कांहींच परिणाम होत नाहीं तो जितेंद्रिय. अनुकूल-प्रतिकूलतेच्या भावना ज्याच्या नष्ट झाल्या आहेत तो जितेंद्रिय. चांगल्यावाईट अशा कसल्याहि पदार्थाच्या लाभानें ज्याला हर्षखेद होत नाहीत त्यालाच विषयांत सुख नाहीं वा निरवधि सुखरूप आपणच आहों हे पटलें असे समजावें. खरा जितेंद्रिय हाच. बाकी सर्व इंद्रियें ज्ञानाच्या प्रभावानें जिंकून कोणतें एक इंद्रिय जिंकता आले नाही तरी पुरे ! मोकळ्या ठेवलेल्या तोंडावाटे पखालींतले सर्व पाणी वाहून गेल्याप्रमाणे त्या इंद्रियावाटेच त्याचें तें ज्ञान, सर्व वाहून जाते. वाहावयाला तेवढेच पुरे होते. सर्वेद्रिये समूळ स्वाधीन ठेवून मनाचा निग्रह ज्याने केला त्याला दुष्कर असें कांही उरत नाही. अप्राप्य कांही राहात नाही. सर्व सुखे त्याच्या पाय लागतात. सर्व सिध्या त्याची सेवा करतात. जीवनाचे हे रहस्य नव्हे का ! इकडे तरुण मुलें मुली लक्ष देतील काय ? बलेन परराष्ट्राणि गृण शूरस्तु नोच्यते । जितो येनेंद्रियग्रामः स शूर इति कथ्यते ॥ (दक्ष स्मृ. ७/१८ ) बाहुबलानें परराष्ट्र जिंकणारा शूर म्हणवून घेतो पण तो खरा शूर नव्हे, ज्यानें इंद्रियसमुदाय जिंकला तोच खरा शूर. 

home-last-sec-img