Literature

जीवितक्षयाच्या कल्पनेचा अभाव

सूर्योदयकालीन व सूर्यास्तकालचें तें अवर्णनीय चमत्कृतीचे सुंदर दृश्य पाहून लोक आनंदित होतात हर्ष पावतात. पण ही जीवितक्षयाची एक सूचना आहे असें मानीत नाहींत आयुष्याचा एक दिवस गेला म्हणून आपल्या जीवितक्षयाचा मात्र विचार करीत नाहींत. मोठ्या हर्षानें जीवनाच्या उद्योगाला लागतात. सूर्योदय झाल्याबरोबर चैतन्ययुक्त डोळे बांधलेल्या घाण्याच्या बैलाप्रमाणें विवेकदृष्टी नसलेले हे दिवसभर राबतात. सूर्यास्त झाल्याबरोबर त्या मुग्धांच्या मुखावर कामोपभोगाच्या कल्पनेचें हास्य बिलसूं लागते. पण सछिद्र घटांतून पाणी झिरपून गेल्याप्रमाणें हें जीवित नाश पावत आहे ही जाणीव मात्र त्यांच्या ठिकाणी निर्माण होत नाहीं. ऋतूंच्या परि वर्तनांनी नवीन नवीन परिवर्तित झालेल्या दृश्यांना पाहूनहि ते रमतात आनंद मानतात पण जीवितक्षयाचा विचार करीत नाहींत.

home-last-sec-img