Literature

ज्ञानविज्ञानसंपन्न निवृत्तिमार्ग

आतांपर्यंत झालेलें विवेचन हेंच श्रीसमर्थांच्या पुढील वचनांचे तात्पर्य आहे. मननाकरितां कांहीं वचनें देतों पदार्थ चांगले दिसती । परि ते सवेंचि नासती । ( याचा अर्थ : लगेच भोगान्तो वीट आणतात आणि दुःख देऊन नकोसे होतात.) अतो भ्रष्ट ततो भ्रष्ट होती । लोक तेणें ॥ दा. १७-३-२२). घड आत्मसुखहि नाहीं आणि विषयसुखहि नाहीं, अशी विषयसुखाच्या पाठीमागे लागलेल्यांची स्थिति होते असे याचे तात्पर्य आहे. या कारणे पदार्थज्ञान। (पदार्थापासून सुख लाभतें हे ज्ञान) नाना जिनसीचा अनुमान। (या एका पदार्थापासून नाहीं मिळाले म्हणून काय झाले, जगांत अनेक पदार्थ अनेक प्रकारचे जाहेत. त्यांच्या पासून सुख मिळेल असा तर्क. सर्व सांडून निरंजन ।धुंडित जावें।। (दा. १७-३-२३) सर्व सोडून निरंजननिरुपाधिक स्वतः २) सिद्ध आत्मसुख शोधावें. असार म्हणिजे नासिवंत। सार म्हणिजे ते शाश्वत । (दा. १४-९-५) दिसेल तें नासेल ।आणि येईल तें जाईल। जे असतचि असेल ।तेंचि सार ।। (दा. १३-२-२) देह देऊळ आत्मा देव ।कोठे धरू पाहाता भाव। देव वोळखोन जीव। तेथेच लावावा ।। (दा. १४-८-२९) वदन्ति तत्तत्त्व विदस्तत्वं यज्ज्ञानमद्वयम् ब्रह्मेति परमात्मेति भगवानिति शब्द्यते‘ (भाग. १-२-११) सोहं हंसा तत्त्वमसि ।तें ब्रह्म तू आहेसी। विचार पाहाता स्थिति। ऐसी सहजचि होते ॥ (दा. च्या १३-२-२०) खोटे सांडून खरें घ्यावें ।तरीच परीक्षवंत म्हणावें। असार सांडून सार घ्यावें ।परब्रह्म ते ।। (दा. १३-२-२७) सद्रूप चिद्रूप आणि तद्रूप । ( या नावांनी द्योतित होणारे सर्व काही सस्वरूप म्हणिजे आपले रूप ( प्राप्त करून घेतलेल्या ब्रह्मस्वरुपासहित मी आहे, असे वाटल्यास, तसे म्हटल्यास,  त्याच्यासहित असावयाला तें वेगळे नसून स्वरूपच असल्यामुळे या अनुभवांत अथवा अशा म्हणण्यांत आपलाच एक अनुभव व्यक्त होतो. सांगणे, अनुभविणेया भाषेत स्वमात्र निर्विकल्प स्थितीचे मौनच व्यक्त होते.) आपले रूप म्हणिजे अरूप तत्वनिर्शना उपरी ॥‘ (दा १३-२-३०) आपण ब्रह्मरूप आहों म्हणण्यात मागे ब्रह्म निराकार असल्यामुळे कोणत्याहि विशिष्ट रूपाचा बोध होत नसून, ‘मी ब्रह्मरूप आहेया वाक्यातल्या रूपया शब्दाला काही अर्थच रहात नाही. नामरूपात्मक सर्व कार्यजाताचा निरास करून आपण ब्रह्म आहो असे प्रत्ययाला आल्यामुळे आपले रूप अरूप म्हणजे निराकार आनंदमात्र होते. ऐक अनुभवाचे लक्षण। अनुभव म्हणिजे अनन्य जाण । ऐक अनन्याचे लक्षण । ऐसें असे ।। (दा. ९-२-२९) निर्गुणासी नाहीं जन्ममरण ।निर्गुणासी नाहीं पापपुण्य । निर्गुणी अनन्य होता आपण । मुक्त जाला || (दा. ६-३-३३) जालियां तत्त्वाचे निर्शन ।निर्गुण आत्मा तोचि आपण । कां दाखवावें मीपण तत्त्वनिर्थना उपरी ॥ (दा. ६-३-३०) आपण कल्पिलें मीपण मीपण शोधितां नुरे जाण मीपण गेलिया निर्गुण । आत्मा स्वयं ॥ (दा. ६-३-२९) मीपण जाणोनि त्यागावें । ब्रह्म होऊन अनुभवावें । समाधान ते पावावें। निःसंगपणे ।। (दा. ७-७-५२) ही ओवी एकच, साधकाला पुरे होईलशी आहे. हींत सिद्धान्त, साधन, सिद्धावस्था सर्वाचाच अन्तर्भाव झाला आहे.

याच समासांत अभ्यासूकरितां अजून दोन ओव्या नमूद करण्यासारख्या आहेत, त्याहि येथे देतों. मीपणत्यागाचा अभ्यास निर्विकल्पासी कल्पावें । परी कल्पिते आपण न व्हावे ।मीपणासि त्यागावें । येणें रीतीं ॥ (दा. ७-७-५६) जयासि आपण कल्पावें । तेंचि आपण स्वभावें । येथे कल्पनेच्या नावें । सून्य आलें ॥ (दा. ७-७-५८) निर्विकल्पाचा अभ्यास करणाऱ्याला ही ओवी जीव की प्राण होईल. समाधानाची गुरुकिल्ली- वृत्तिरहित जें ज्ञान । तेंचि पूर्ण समाधान । जेथें तुटे अनुसंधान । मायाब्रह्मींचें ॥ (दा. ७-५-१४) जे मनबुद्धिअगोचर। जें कल्पनेहून पर। तें अनुभवितां साचार । द्वैत कैचें ॥ ” ( दा. ७-५-१६) अद्वैत सिद्धान्त कसा ठसतो या ओवीनें ! शंकेला इथे वावच ठेवला नाहीं. कल्पनेचे थैमान आणि संशयाचा कल्लोळ या ओवीने अगदी बंद पडतो; नाही तर या कल्पनेचे लक्षण म्हणजे ‘क्षणा येकातें उमजे । क्षणा येकातें निर्बुजे । ( काय सांगावें) नाना विकार करिजे । ते कल्पना जाणावी ।। (दा. ७-५-२३) म्हणौन सर्वांचे मूळ ते हे कल्पनाच केवळ | इचें केलियां निर्मूळ । ब्रह्म प्राप्ती ।। (७-५-२६) कल्पनेसी मिथ्यत्व आलें । सहजचि तद्रुप जाले । आत्मनिश्चये नासिलें कल्पनेसी ॥‘ (दा. ७-५-४०) मी केवळ आनंदघन ब्रह्मरूप आहे, ही कल्पना विरून स्थिरावलेला निर्विकल्प आनंदच खरोखर आपण आहोत, असें ही ओवी आम्हास सांगत आहे. कुटिल कल्पनेच्या मायावी जाळ्यांत आपण सापडू नये म्हणून रात्र दिवस प्रयत्न करीत असतांना निराशेची छटा च मुद्रेवर येऊन काळवंडलेल्या कोणत्या विचाऱ्या साधकाची या ओव्या पाहून हर्षाने कळी उमलणार नाही ?

सर्व हे भासणारें जग म्हणजे केवळ कल्पनेचे रान माजले आहे. काल्पनिकाला खरें अस्तित्व नसते. पुढे ब्रह्मयाने सृष्टी कल्पिली । इच्छेसरिसी सृष्टी जाली।” (दा. १०-४-३०) नाना प्रकारींचे प्राणी कल्पिले । इच्छेसरिसे निर्माण जाले । (दा. १०-४-३२) ‘ धाता यथापूर्वमकल्पयत् ।या श्रुतीचे विवरणच श्रीसमर्थानी इथे दिले आहे. कल्पना आपल्या अर्थाने इथून तिथून एकच. कल्पना म्हणजेच माया. “माया आपुली कल्पना” या आपल्या कल्पनेला अहं ब्रह्म ऐसें स्फुरलें । तें चि माया । इथून प्रारंभ होऊन त्यांच्या त्यांच्या अंतःकरणवृत्तीच्या थैमानासकट स्त्रीपुरुषांच्या देहापर्यंत ती येऊन पोहोचली आहे. सकळ सृष्टि विस्तारली । तितुकी माया ।हे जाणून हा कल्पनेचा प्रान्त ओलांडून, अहं ब्रह्मास्मिस्फुरणहि नसतांना निर्विकल्प, स्व-प्रकाश, चिन्मात्र असे एक केवळ आनंदच होऊन आपण राहिलो, तर आपण कोण हे ओळखून असल्यासारखे झाले. माया सृष्टीची रचना ।‘ इथे नुसती साखर पेरली आहे. नाना रूप नाना रंग। तितुका मायेचा प्रसंग । माया भंगे ब्रह्म अभंग । जैसे तैसें ॥ (दा. ६-५-५२). सर्व विकारजातं मायामात्रम् । सकळ माया विस्तारली । ब्रह्मस्थिती अच्छ्यादली । परी ते निवडून घेतली | साधुजनीं ।। (६-५-११) गोंडाळ सांडूनि नीर घेईजे। नीर सांडूनि क्षीर सेविजे । माया सांडूनि अनुभविजे । ब्रह्म तैसें ॥ (दा. ६-५-१२) माया जैसे मृगजळ । ऐसें बोलती सकळ । का तें कल्पनेचे आभाळ । नाथिलें चि ॥ (दा. ७-३-३६) आपुलेन अनुभवें । कल्पनेसि मोडावें । मग सुकाळी पडावें । अनुभवाचे ॥४८॥‘ ‘मायाकार्यादिकं नास्ति नास्ति माया भयं न हि । परं ब्रह्माहमस्मीति स्मरणस्य मनो न हि ॥आपण सदोदित निर्विकल्प अद्वितीय, केवलज्ञानरूप असणारा आनंद आहों, हे जाणून अखिल कल्पना नष्ट करणें हें मोक्षाचे साधन आहे. ‘या मा सा माया या कल्पनेच्या मायाबाजारांतला कोणताहि सौदा खरा नव्हे. निर्विकल्पास कल्पावें । कल्पना मोडे स्वभावें । मग नसोनि असावें कल्पकोटी ।‘ (दा. ७-३-४९).

‘शान्तं उपासीत। कसलीहि खळबळ उरू न देतां शान्त स्वरूपाची उपासना करा. आत्मसिंहासने स्थित्वा न किंचिदपि चिंतय । निर्विकल्पे स्थिरो भव।निर्विकल्प अशा आत्मसिंहासनावर स्थिर रहा. आनंदरूप असणाऱ्या आत्मसिंहासनावर आरूढ होऊन कसलीहि कल्पना, कसलेहि चिंतन करू नको, म्हणून उपनिषदांचे सांगणे आहे. जीवनमुक्ताचे लक्षण सांगतांना 

उपनिषत – 

चैत्यवर्जितचिन्मात्रे पदे परमपावने । अक्षुब्धचित्तो विश्रांतः स जीवन्मुक्त उच्यते ॥

ज्ञेयशून्य, परमपावन, ज्ञानमात्र स्थितीत कसलाहि क्षोभ नसतांना जो शान्तपणे विश्रांति घेत असतो तो जीवनमुक्त म्हणून सांगते. देहबुद्धीच्या अंती । सकळासि एकचि प्राप्ति । येक ब्रह्म द्वितीयं नास्ति । हे श्रुतिवचन || ( दा. ७-२-३०) साधु दिसती वेगळाले । परी ते स्वरूपी मिळाले । अवधे मिळोन येकचि जाले । देहातीत वस्तु ||३१||’ अशा ज्ञान्यांनी, ‘ आधी दृश्य सोडिलें । मग सून्यत्व वोलांडिलें । (अहंब्रह्मास्मि) मूळमायपरतें देखि लें | परब्रह्म ।।‘ (८-१०-७०) हे सर्व लक्षात आणून साधनाचा क्रम साधकांनी आंखावा. या अहंब्रह्मास्मिरूप मूळ मायेच्या परतें, पलीकडे पाहण्याचा, केवळ आनंदरूप ब्रह्म होऊन राहण्याचा निवृत्तिमार्ग आहे. अहं ब्रह्मास्मिरूप मायेच्या पुढचा सर्व माया बाजार – प्रवृत्ति. या प्रवृत्तीचा त्याग ही निवृत्ति. असा हा ज्ञान वैराग्यसंपन्न निवृत्तिमार्ग आहे. येक परब्रह्म संचले । कदापी नाही विकारलें । त्यावेगळे भासलें तें भ्रमरूप ।। (दा. १०-६-९) भ्रमरूप विश्व स्वभावे । तेथे काये म्हणोन सांगावे । निर्गुण ब्रह्मावेगळे आघवे । भ्रमरूप ||३६|| अभ्यासाचा मुगुटमणी वृत्ती राहावी निर्गुणी । संतसंग निरूपणी स्थिति बाणे ।। (दा. ८-९-२१)

home-last-sec-img