Literature

ज्ञान्यांचा व्यवहार

अबाधकं साधकं च द्वैतमीश्वरनिर्मितम् । अपनेतुमशक्यं चेत्यास्तां तद्विष्यते कुतः ॥ ( पंचदशी है. ४२)

—ईश्वरनिर्मित द्वैत आणि बहुत्व हे अबाधक आहे. आत्मतत्त्व जाणण्याकरितां कांही अंशी ते साधकच आहे, तर ईशसृष्टीचे निवारण अशक्य झाल्यास ते असल्याने बाधक काय? खुशाल असो. ब्रह्मज्ञानानंतर ब्रह्मविश्वमिदं जगत् । ब्रह्मैवेदं सर्वम् आत्मैवेदं सर्वम् । हें समग्र विश्व ब्रह्मरूपच आहे. हें सर्व ब्रह्मरूपच आहे, आत्मरूपच आहे, असाच त्यावेळी अनुभव येतो. अहमेवेदं सर्वम् । मीच हा, हे सर्व आहे असे अनुभवाला येतें. “हें विश्वचि माझें घर। ऐसी मति जयाची स्थिर किंबहुना चराचर आपण जाहला ॥ ” ( श्रीज्ञानेश्वर ) — भेद घालविण्याचा व समय बाणविण्याचा असा हा मार्ग आहे. याला आत्मज्ञान हे साधन आहे. त्या आत्मज्ञानाची प्राप्ति समाजास झाल्यास आपोआपच भेद जातो, एक बाणतें व समत्व येतें. “ तेथें उच्च नीच नाहीं परी । राया रंका एकाचे सरी झाला पुरुष अथवा नारी । एकाच पद || ” ( श्रीसमर्थ दासबोध ) इथे मजूरशाहीहि पण उरत नाही आणि भांडवलशाहीहि पण राहात नाही स्त्रियांच्या स्वातंत्र्याचा झगडाहि पण मिटतो. स्त्रीपुरुष हा विचारच मुळी इथे स्फुरत नाही. “ ब्राह्मणाचे ब्रह्म तें सोंवळें । शूद्राचे ब्रह्म तें ओबळें । ऐसे वेगळे आगळें । तेथें असेचिना ॥ ” या आत्म ज्ञानानें केवळ “ सकळांचे मिळोनी ब्रह्म एक ” हा अनुभव येऊन जातीजातींतलें वैषम्य राहात नाही. सर्व एते यत्र एकीभवन्ति । हे सर्वच जिथे एकरूप होतात तिथे जातीचा प्रश्न कसा उरेल ! आत्म अथवा ब्रह्म स्वरूपाच्या परिज्ञानानें मात्र तिथे जातीचा प्रश्न आपोआपच मावळतो, जातीयतेचा अंत होतो. “ सकळ धर्मामध्ये धर्म । स्त्ररूपीं राहणे हा स्वधर्म।” (श्रीसमर्थ) हें का एकदां कळून चुकले म्हणजे धर्मवैषम्यहि उरत नाही. अशा या आत्मज्ञानानेच केवळ पूर्वी भारतीय जातीयता विसरून, धर्मीयता विसरून सर्वहिं एकोप्याने राहून व्यवहारोपयोगी भेद व धर्म जगाच्या व्यावहारिक जीवनाकरितां हवा म्हणून तो तात्पुरता वरवर पाळून सुखशांतीचे दिव्य जीवन ब्राह्मणापासून तें हरिजनापर्यंत आनंदानें अनुभवीत असतात; व्यवहार व परमार्थ दोन्ही साधीत असत. या अंतर्बाह्य साधनानेंच भारतांत आजपर्यंत ब्राह्मणादि जाति टिकून राहिल्या व मुसलमान, ईसाई आदि धर्म टिकून राहिले. मजूर आणि जमीनदारहि मिळून मिसळून होते. राजा प्रजाजनांतूनहि कलह नव्हता. मंत्री प्रजेचें असत व प्रजाजन मंत्र्यांच्या स्वाधीन असत. नियर्ति न विसु॑ वन्ति महान्तो भास्करा इव । – भारतांत सूर्यादिकाप्रमाणे ज्ञानी जन नियति न सोडतां आपआपले कर्तव्य व्यवस्थितपणे पार पाडीत आले. भावा सदा कुर्यात् क्रियाद्वैतं न कर्हिचित् । ( श्रीशंकराचार्य ) हें भावाद्वैत सदैव मनांत असावें व त्याचा अतिक्रम होऊन क्रियाद्वैतांत मात्र कुणीहि पाय घालू नये. हा दंडक घालून वैदिक आर्य संस्कृतीनें प्रपंच-परमार्थाची सांगड घातली आहे. यंत्रांतील चक्राप्रमाणे सर्व माणसांची एकवाक्यता त्या वेळी होती.

” भेद ईश्वर करून गेला ” । सकळ सृष्टि भेदें चाले ” ॥ “ जो जो जयाचा व्यापार । तेथें असावे खबरदार ॥ ” ( श्रीसमर्थ ) संत-महंतांचा उपदेश हा असा आहे. हेंच युक्त असे आम्हांला व्यावहारिक क्षेत्रांत दिसून पण येतें. समर्थ म्हणतात, “ज्या इंद्रियास जो भोग । तो तो करी यथासांग | ईश्वराचें केलें जग। मोडितां उरेना || ” इंद्रियांचा भेद नाहीसा करणें शक्य नाहीं. शरीरदृष्ट्या स्त्रीपुरुषात्मक भेद घालविणे शक्य नाही. शरीराच्या उंचखुजेपणाचा भेद वालविणें शक्य नाहीं. देहाचे बाल्यतारुण्यादि अवस्थाभेद घालविणें शक्य नाही. झाड, झुडपें, वेली यांचा भेद घालविणें शक्य नाहीं. धान्यांचे, फळांचे भेद घालविणें शक्य नाहीं. पंचभूतांचे भेद घालविणें शक्य नाही. समत्याकरितां भरविलेल्या ‘भेदविना शिनी’ नांवाच्या सभेत देखील अध्यक्ष, उपाध्यक्ष, मुख्य वक्ता, उपवक्ता, सदस्य इतर श्रोते यांत भेद असतोच; अधिकारहि पण कमी जास्त असतात. इयत्ता व योग्यता ठरवूनच कार्याची विभागणी होते. या व्यावहारिक नियमा नुसार भेद घालवितां येणें शक्य नाहीं. न्यायालय, कार्यालय, विधिमंडळ आणि राज्यसभा यांतून अधिकार-तारतम्य असतेंच. या दृष्टीनें आनुवंशिक व्यावहा रिक पात्रतेचा विचार करून, भिन्न भिन्न भूमिकेत भिन्न भिन्न वस्तूंना महत्त्व देऊन जीवन आंखणे अपरिहार्य होतें. नेते, अनुयायी आज्ञाकारी, आज्ञा-धारी असे भेद कोठल्याहि समतावादाच्या पुरस्कर्त्या राष्ट्रांत, समाजांत आणि व्यक्ति व्यक्तींत, अखिल कार्यक्षेत्रांत असतातच. आणि ते राहावयालाहि पण पाहि जेत. हे सर्व भेद अपरिहार्य मानून ठेवल्याप्रमाणेच पूर्वापार चालत असलेल् ब्रह्मचार्यादि आश्रम कां ठेऊं नयेत ? त्यालाच कां फाटा द्यावा ? मानवसमाजाचा भेद नाहीसा करणे शक्य नाही असे व्यावहारिक दृष्टीने पाहातांहि स्वाभाविकच दिसत नाही का? या नीचोच्च भावना हे द्वैत आणि हे बहुत्य सुद्धा एकांतच विरवून जिरवून ईशसृष्टीचा व्यवहार रागद्वेपरति होऊन व्यवस्थित चालवावा. न चर्मणो न रक्तस्य न मांसस्य न चास्थिनःन जातिरात्मनो जाति व्यवहारप्रकल्पिता ॥ जाति ही एरवी सर्वसामान्य धात्मक शरीराचीहि नव्हे आणि चिन्मय अद्वितीय अशा आत्म्याचीहि नव्हे. व्यवहाराच्या निर्वाहाकरितां प्रपंचासारिखें चालावें अंतरी शाश्वत ओळखायें । ” यासारख्या दंडकानुसार केवळ भिन्नत्य व विविध यांचा अंगिकार करून विधेकविचारसंपन्न आर्य संस्कृति अखंड समाधानानें, निर्विकारतेनें पूर्वीपासून तो आतापर्यंत अल्पाहत वागत आली आहे. आजपर्यंतच्या सर्व जातीतल्या सर्व ज्ञान्यांनी अव्यभिचरित आत्मसमाधान अंतरी बाळगून आप आपली वर्णाश्रमोक्त कर्मे करीत, व्यावहारिक नीचोच्च भावना बाळगून सर्वतोपरी सुखशांतीने आपापली जीवनयात्रा चालविली, आपले जीवन दिव्य व सुखमय केलें. वाल्मीकि रामायणांतील रामराज्याचे हे वर्णन पाहा.

क्षत्रं ब्रह्मसुखं चासीद्वैश्याः क्षत्रमनुताः । शुद्राः स्वकर्मनिरतास्त्रीन्वर्णानुपचारिणः ॥

रामराज्यांत क्षत्रियवर्ण ब्राह्मणांच्या आज्ञा पाळी. वैश्य क्षत्रियांची आज्ञा पाळीत. शुद्र स्वकर्मनिरत राहून या तीन उच्चवर्णियांची मनोभावानें जिवापाड सेवा करीत. कुठेच बैमनस्य नव्हते. परस्परस्नेहाने आपापले आचारधर्म आणि अधिकार आपल्या जीवनक्रमानें सुरक्षित ठेवून सर्व सुख शांतीनें नांदत, असे या लोकावरून स्पष्ट होत नाही का ? आजच्या कालांतील वर्णद्वेष, जातिमत्सर, उच्चनीच भावना, वर्णसंकर ही आर्य संस्कृतीहि नव्हे आणि स्वपरउद्धाराचें हें साधनहि पण नव्हे !

अन्तः संत्यक्तसर्वाशो वीतरागो विवासनः । बहिः सर्वसमाचारो लोके विहर राघव ॥ (योगवा. ५-१८-१८) 

— आंतील सर्व आशांचा संपूर्ण त्याग करून, विरक्त होऊन कोणतीहि वासना न ठेवतां, अंतरांतील एकत्वाचा निश्चय न सोडतां बाहेर मात्र यथोक्त रीतीनें वाग. वर्णआश्रमाप्रमाणे चाल. श्रुतिशास्त्रांच्या आज्ञांचें परिपालन कर. आदर्श जीवन ठेव. ईशसृष्टीतील व्यावहारिक भेद आणि विविधत्व पुसून टाकणें शक्य नसल्यामुळे व ती दृष्टि वाढवूनहि प्रयोजन नसल्यामुळे आंतल्या प्रकाशणाऱ्या ज्ञानमात्र असणाऱ्या आपल्या आनंद निष्प्रपंच स्वरुपाचें अखंड अनुसंधान ठेऊन आत्मानंदानें, एकात्मदर्शनानें जीवन निर्वाहक अवश्य कर्मे कर तुझी जबाबदारी पार पाड. स्वपरहिताचीं जास्तीत जास्त अशी सर्वथा योग्य ठरणारी उत्कृष्ट सत्कार्ये मोठ्या उत्साहाने कर. त्याकरितां पुरेपूर तकवा ठेव. बाह्यसृष्टीचा उपयोग करून नित्य नव्या जोमाने स्वपरउद्वारक व सर्व कार्य क्षेत्रांतहि जीवननिर्वाहक ठरतील अशीं निदुष्ट कर्मे निष्काम होऊन कर. या करितां सर्वत्र दक्षता ठेव व लागेल तें सर्व कांहीं कर. वरील श्लोकाचा मतितार्थ आहे. हें आर्यांचे जीवनरहस्य होय. ही आर्यांची संस्कृति होय. हाच वैदिक संप्रदाय होय. हेंच रामराज्याचे हृद्भत होय. हाच आदर्श जीव नाचा उपदेश होय. यामुळे व्यावहारिक जीवनाचा व व्यवहाराचाहि निर्वाह होऊन आंतरस्थिति वृद्धिंगत होते.

आम्ही वैकुंठवासी आलों याचि कारणासी । सांगितलें जें ऋषि साचभावें वर्ताया ॥ “

श्रीतुकारामांचें हें वाक्य आहे. ऋषिमुनींनी जें सांगितलें आहे त्याप्रमाणें स्वतः वागून, सर्वांनाहि वागविण्याकरितां वैकुंठवासी आम्हीं वैकुंठाहून इथे आलो आहोत. खरा मार्ग दाखवून जगाचा उद्धार करण्याकरितांच आम्हांला देवानें धाडलें आहे असा याचा अर्थ. ‘यातिशूद्र’ असून देखील तुकारामांनीं शास्त्राची मर्यादा उल्लंघन केली नाहीं. पुढें शूद्र जात ‘ पर प्रत्ययनेयबुद्धिः होऊन शास्त्र सोडून अतिक्रम करून वागूं लागेल हे समजूनच यांनी शूद्र जातींत जन्म धारण केला हे उघड आहे.

home-last-sec-img