Literature

ज्येष्ठ वद्य दशमी

परमात्म्याच्या ठायी मन स्थिर करणाऱ्या भक्तावर परमात्मा जो अनुग्रह करतो त्याच्या सामर्थ्याने तो भक्त संसारातील सर्व संकटापासून मुक्त होऊन चिरसुखी होतो. म्हणूनच ‘ मच्चित्तः सततं भव ‘ असा परमात्म्याचा दिव्य संदेश आहे. भगवद्-आराधनेचे साररूप असेच हे वाक्य आहे.

भगवद्-आराधनेनेंच भक्त भगवद्स्वरूप प्राप्त करून घेतो असा भगवंताचा संदेश आहे. त्या भगवंताचे स्वरूप कोणते ? असे विचारल्यास ‘ ते सर्वमंगलमय आहे ‘ असेच उत्तर मिळेल. परमात्म्याचे स्वरूप किती मोठे आहे असे विचारल्यावर ‘ ते सर्व जग व्यापुन उरले आहे ‘ हेंच उत्तर मिळते. त्याचे स्वरूप वाचेने सांगणे अशक्य, इतके तें विशाल आहे. वाचेने जमत नसल्यास मनाने ते शक्य होईल काय ? त्याचे ‘ मनाने सुध्दा संपुर्णपणे ग्रहण करणे अशक्य आहे ‘ असे उत्तर मिळते. मन परमात्म्याच्या प्रेरणेनेच निर्माण झाले आहे. मानवदेहही परमात्मस्फुर्तीचा एक कण मात्र होय. असे असल्याने मानव देहातील मनास परमात्म्यस्वरूपाची कल्पना कशी येणार?

मानवाने कल्पिलेला परमात्म्याचा आकार , रूप, गुण याचे विवेचन कसे करता येणार? परमात्म्याच्या अवताराचा अर्थ काय? इत्यादी प्रश्नांना ‘भक्तांच्या उद्धारासाठीच आकार,रूप,गुण आदींनी जो देह आहे त्याचे ,मुळ परमात्म्याशी भिन्नत्व आहे की अभिन्नत्वआहे ? असा प्रश्न पुढे येतो त्यास ‘मानवदेह मानवापासून भिन्न आहे की अभिन्न आहे ‘ हेंच उत्तर आहे.

श्री प.प सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी

home-last-sec-img