Literature

ज्येष्ठ वद्य प्रतिपदा

आपल्या नित्याच्या व्यवहारासाठींहि शास्त्रनियम आहेत. आपण खात असलेले अन्नहि देवास अर्पण करून तो त्याचा प्रसाद आहे असें समजून आपण ग्रहण केला पाहिजे असे शास्त्राने सांगितलें आहे. त्याप्रमाणे वागल्यास आपले कल्याणच होईल. ‘अन्नमयं हि साम्यमन् : |’ आहारासारखे मन होत असतें म्हणून ‘आहार शुद्धौसत्वशुध्दिः | सत्वशुद्धौ स्मृतिलभे सर्वग्रन्थीनां विप्रमोक्षः |’ असा आपला शास्त्रविधि आहे. परिशुद्ध सात्विक आहार परमेश्वरास अर्पण करून नैवेद्य,प्रसाद, प्रथम अतिथींना अर्पण करून त्यांचा सत्कार करून नंतर तो आपण ग्रहण केल्यास बुद्धीवर चांगले संस्कार घडतात. बुद्धी शुद्ध असल्यास परमात्मस्वरूपाचें ज्ञान होऊन हृदयांतली अज्ञानरूपी ग्रंथी सुटून मोकळी होते यालाच मोक्ष म्हणतात. अशाप्रकारें आहारशुद्धीयूक्त सदाचाराने परमात्म्याचा प्रकाश मनापर्यंत पोहोचतो.

स्वातंत्र्य पूर्वकालांत सनातन धर्म मानणारे आपण भारतवासी पाश्चिमात्यांच्या ताब्यात जाणार नाहीत म्हणून ते आपली संस्कृती नष्ट करण्यासाठी बुध्दिपरस्पर प्रयत्न करीत होते. शिक्षणामुळें मनावर संस्कार घडतात व भाषेमुळे शिक्षण देता येते. भाषेलाच आपण ‘वाणी’ म्हणतो. वाणी व बुद्धी एकमेकांस प्रेरक आहेत व संस्कारहि बुद्धी व भाषा यावर अवलंबून आहेत.

श्री प.प. सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी

home-last-sec-img