Literature

ज्येष्ठ शुद्ध द्वादशी

शैशवावस्थेंत शिशूस कोणतेंहि ज्ञान नसते. आईच्या मांसपिंडातून निर्माण होणाऱ्या दुधामुळें तें जिवंत रहाते. चालणे बोलणेंहि नसल्यानें ते कष्टमय शिशुजीवन आईच्या दयेनेच ओलांडून बाल्यावस्था प्राप्त होते. बाल्यावस्थेंतहि त्याला कोणतेही ज्ञान नसते. कोणतेहि संस्कार न होतां तें तसेच वाढलें तर पशुप्रमाणें वाढून तो मोठा पशूच होतो. तारूण्यांत अस्थिमांसमय अपवित्र शरीराकडे पाहून स्त्री- पुरुष मोहित होतात. सौंदर्याची घमेंड निर्माण होतें. निरनिराळ्या अलंकार वस्त्रांनी शृंगार करून,स्नो, पावडर, सेंट यांनी शरीरास सुगंधित केले जाते. पण त्यामुळे शरीरांतील दुर्गंध कमी होईल काय ? रोजच्या रोज कितीतरी वेळां शरीरांतील दुर्गंध बाहेर पडत असतो. असें चालूं असतांच एके दिवशी पाण्याच्या बुडबुड्याप्रमाणे ‘ फट् ‘ असा आवाज होऊन हे शरीर नाश पावते. अशा या मानवी शरीराचा मोह किती ? त्याच्यासाठी कितीतरी उपचार केले! त्याच्या ठिकाणी आनंदाभास केवढा असतो !! ते शरीर नाहीसे झाल्याबद्दल दुःख तरी किती वाटते ! हे सर्व अविद्येचे,मायेचे, दुरूपदेशाचे फळ या शरीराचा मोह टाळण्यासाठी वरील विवेचनाचे सूक्ष्म अवलोकनच उपयोगी पडणार नाहीं कां ? विवेकदृष्टी प्राप्त करून परमात्मशक्तीवर विश्वास ठेवून ,त्याची आराधना करून जन्माचे सार्थक करून, पुढे हे कष्टप्रद तापत्रय प्राप्त होणार नाहीं असें करून घेणेंच मानवजन्माचे मुख्य ध्येय होय.

श्री प.प. सद्गुरू भगवान श्री श्रीधर स्वामी

home-last-sec-img