Literature

तमोगुण

शरीरी क्रोध भरतां । नोळखे मातापिता बंधु वहिण कांता । ताडी तो तमोगुण ॥ २ । ६ । ३. आपला आपण शत्रपात । पराव्याचा करी घात। ऐसा समयो वर्तत । तो तमोगुण ॥ ६ ॥ अखंड भ्रांति पडे । केला निश्चय विधडे । अत्यंत निद्रा आवडे  तो तमोगुण ॥८॥ स्त्रीहत्या बाळहत्या द्रव्यालागीं ब्रह्महत्या करूं आवडे गोहत्या । तो तमोगुण ॥१२॥ अंतरी धरूनि कपट । पराचे करी तळपट । सदा मस्त सदा उद्धट  तो तमोगुण ॥ १४ ॥ कळह व्हावा ऐसें वाटे । झोंबी घ्यावी ऐसे उठे । अंतरीं द्वेष प्रगटे । तो तमोगुण ॥ १५ ॥ युद्ध देखावें ऐकावें । स्वयें युद्धाच करावें । मारावें की मरावें। तो तमोगुण ॥ १६ ॥ मत्सरें भक्ति मोडावी । देवालयें विघडावीं । फळतीं झाडें तोडावीं । तो तमोगुण १७ सत्कर्मे तीं नावडती। नाना दोष ते आवडती । पापभय नाही चित्ती । तो तमोगुण ॥ १८ ॥ भांडण लावून द्यावें । स्वयें कौतुक पाहावें । कुबुद्धि घेतली जीवें । तो तमोगुण ॥ २२ ॥ प्राप्त झालिया संपत्ति । जीवांस करी यातायाती । कळवळा नये चित्ती । तो तमोगुण ॥ २३ ॥ नावडे नावडे भाव । नावडे तीर्थ नावडे देव । वेदशास्त्र नलगे सर्व । तो तमोगुण २४स्नानसंध्या नेम नसे । स्वधर्मी भ्रष्टला दिसे। अकर्तव्य करीतसे ।तो तमोगुण ॥ २५ ॥ ज्येष्ठ बंधु बाप माये । त्यांची वचनें न साहे। शीघ्र कोपी निघोन जाये ।! तो तमोगुण ॥ २६ ॥ उगोचे खावें, उगेंचि असावें । स्तब्ध होऊन वैसावें । कांहींच स्मरेना स्वभावें । तो तमोगुण २७

जीवनांतले हे धोक्याचे टप्पे आहेत. यांना चुकवूनच दिव्य सुखाच्या मार्गानें जाऊन आम्हांला भारताचे रामराज्य सार्थ करून दाखवावयाचे आहे आपले जीवन दिव्य करावयाचे आहे; स्वपरराष्ट्राचाच काय वेदऋषिमुनि यांच्या शिकवणीच्या अनुसारें अखिल जगाचाच उद्धार करावयाचा आहे. आर्य संस्कृतीचा परिपाठ जगांत दृढमूल होईपर्यंत आपल्या आचारविचार उच्चारांचे धडे अखिल विश्वालाच द्यावयाचे आहेत. तेव्हां याकरितां आपली पूर्वतयारी किती व कशी व्हावयाला पाहिजे  तें प्रत्येकानेंच विचार करून अगत्य ठरावर्णे भाग आहे. त्याच्या मार्गदर्शनार्थ येथे हा उपक्रम आहे हें प्रत्येकानें लक्षांत ठेवावें. यासंबंधीं कदापि वीट मानूं नये । शिकवणेचा  ही समर्थ हितोक्ति ध्यानांत आणावयास पाहिजे.

home-last-sec-img