Literature

‘तरीच श्लाघ्यवाणें रामदास्य’

धर्ममार्ग चरित्रेण ज्ञानमार्ग च नामतः तथा ध्यानेन वैराग्यमैश्वर्यं स्वस्य पूजनात् ॥ (श्रीराम पू. ता. उ. १-४-५) श्रीराम हे आपल्या चरित्रानें धर्ममार्गाची नामस्मरणानें ज्ञान मार्गाची, ध्यानानें वैराग्याची आणि पूजनानें ऐश्वर्याची प्राप्ती करून देतात, असा या मंत्राचा अर्थ आहे. निःस्पृहांना सर्वाऐवजी ज्ञान, वैराग्य आणि एक मोक्ष मिळाला म्हणजे झाले, बाकी कांहीं नको, हे उघड आहे. श्रीरामाच्या उपासनेची ओळख पटवून देण्याकरितांच जणू रचलेला एक समर्थांचा अभंग येथे देतो; रामदास्य आणि हें वाया जाईल। ऐसें न घडेल कदाकाळी |||| कदाकाळी राम दासा उपेक्षीना । राम उपासना ऐसी आहे |||| ऐसी आहे सार राघवाची भक्ति । विभक्तिची भक्ति जेथे नाहीं |||| जेथे नाही काहीं वाउगे माईक । रामउपासक दास म्हणे ॥४॥ श्रीरामउपासनेत विभक्तीची भक्ति, भेदभक्ति नाही. विभक्तीची शक्ति म्हणजेहि तोच अर्थ. या ठिकाणी वाउगें ,व्यर्थ दिसून येणारे मायिक असे काही नाही. भरगच्च ब्रह्मरसच या उपासनेत एक भरला आहे, असे शेवटी श्रीसमर्थ आपले नांव देऊन ग्वाही पटवितात. रामदास्य केव्हा व आपण कसे वागले असतां श्लाघ्यवाणें होतें तें कोठे बघावयाचे झाल्यास खालील पद्य बघा; ‘कायावाचामने यथार्थ रामी मिळणें । तरी श्लाघ्यवाणें रामदास्य |||| कामक्रोध खंडणें मदमत्सर दंडणें । तरीच श्लाघ्यवाणें रामदास्य |||| परस्त्रीनपुंसक होणे परद्रव्यें न पोसणें । तरीच श्लाघ्यवाणें रामदास्य ॥३॥ जैसें मुखें बोलणे तैसीच क्रिया चालणें । तरीच श्लाघ्यवाणें रामदास्य |||| माया निवर्तक ज्ञानें ज्ञेयचि पै होणें । तरीच श्लाघ्यवाणें रामदास्य |||| रामदास म्हणे निर्गुणसुख लाधणें । तरीच श्लाघ्यवाणें रामदास्य ||||

रामदास हें नांव कोणाला केव्हा प्राप्त होतें तें या पुढच्या पद्यानें स्पष्ट होते : भव्यरूप अतिसुंदर, दीक्षा | रामनामस्मरणें करि भिक्षा । वृत्ति होईल उदासीन जेव्हां । रामदास म्हणणें मग तेव्हा |||| नाठवे धनसुतालय जाया। मुगजळापरिभावित काया । परवधू जननीसम जेव्हा । रामदास म्हणणें मग तेव्हां |||| शुद्ध भक्त हरिची करी पूजा। विश्व पाहे आपणासम वोजा । शांति पूर्ण बरवी धरि जेव्हा । रामदास म्हणणें मग तेव्हा |||| करि कथा परि न वांछित कांहीं । चित्तवृत्ति अवघी हरिपायीं । कल्पना समुळ तोडिल जेव्हां । रामदास म्हणणें मग तेव्हा ॥४॥ नित्य नेम बरवा जगि ज्याचा । प्रतिदिनीं हरिचे भजनाचा । गुरुपदी रचना असे जेव्हा । रामदास म्हणणें मग तेव्हां |||| सर्व लोक भजनाप्रति लावी । लालुची धनि कदापि नसावी । बोलणे सम क्रिया घडे जेव्हां । रामदास म्हणणें मग तेव्हा |||| विमल ज्ञान बोले जगि स्पष्ट । ब्रह्म निर्गुण कळे जगि श्रेष्ठ । सर्व माईक असे कळे जेव्हां । रामदास म्हणणें मग तेव्हां |||| बोलणें प्रचितिचें जगि मान्ये । निवउं जो सकळांप्रति जाणें । वांछिती जन सज्जन जेव्हा । रामदास म्हणणें मग तेव्हा |||| निश्चयें करि रामउपासना। रामनौमि रघोत्तम पूजना । तृप्त होती द्विज याचक जेव्हा । रामदास म्हणणें मग तेव्हा |||| यत्न साधुन करी पुढे पाठ । अर्थ जाणुनि वदे जगि स्पष्ट । मागिलें उजळणी करी जेव्हां । रामदास म्हणणें मग तेव्हां ॥१०॥

रामदासी संप्रदायाची लक्षणे कोणती अशी जिज्ञासा असेल तर निःस्पृहांनी खालील पद्य वाचून निश्चय करावा आणि निवृत्तिमार्गाने कृतार्थ व्हावें- जाणावा रामदासांचा हाचि संप्रदाय ॥ ध्रु.॥ व्रत ज्याचे ब्रह्मचारी । वस्त्रे ज्याची हुर्मुजी बरी । विवेक वैराग्य तें भारी । तारी जडजीवातें ॥ १॥ नित्य वाची दासबोध। शोधी सारासार शोध । सांगे भाविकांसी बोध । करी रोध इंद्रियां |||| सदा वृत्ति नित्य नेम । रामी ज्याचें अखंड प्रेम | ऐसा देखोनि योगक्षेम । कांपे यम चळचळा ॥ २ ॥ झोळी निरापशकर भिक्षा मागे घरोघर। देखोनिया चमत्कार। नारी नर धावती |||| ऐसो निस्पृहाची रीत । सांगितली यथास्थित । हरिरंगी अति प्रीत। तेणें कीर्ति विस्तारे ||||

home-last-sec-img