Literature

तीन धर्मस्कंध – ( यज्ञ, दान, तप )

त्रयो धर्मस्कंधा यज्ञोऽध्ययनं दानमिति प्रथमस्तप एव द्वितीयो ब्रह्मचार्याचार्यकुलवासी त्रितीयोत्यन्तमात्मानमाचार्यकुलेऽवसादयम्सर्व एते पुण्यलोका भवन्ति ब्रह्मस स्योऽमृतत्वमेति ( छांदोग्य. अ.२|२३|१)

— धर्माचे तीन विभाग आहेत-यज्ञ, (वेदांचें) अध्ययन, दान हा पहिला विभाग. यांत गृहस्थाश्रमाचा अंतर्भाव होतो. तप हा दुसरा विभाग यांत वानप्रस्थांचा अंतर्भाव होतो. तिसरा ब्रह्मचर्य. यांत वेदाध्ययन करणाऱ्या ब्रह्मचाऱ्यांचा व आमरण ब्रह्मचर्य पाळून अखंड गुरुकुलवास करणाऱ्या नैतिक ब्रह्मचाऱ्यांचा अंतर्भाव होतो. हे सर्वहि सत्कीर्तीचे पुण्यशीलच होत. अशा तत्तदाश्रमोचित रीतीनें शास्त्रीय अनुष्ठान प्रथम करून नंतर संन्यास घेऊन जो ब्रह्मस्वरूपाचा साक्षात्कार करून घेतो त्याला अमृतत्वाची प्राप्ति होते म्हणजे मोक्ष मिळतो. एवंच ब्रह्मस्थितीत असणारा अविनाशी ब्रह्मरूप होतो.

home-last-sec-img