Literature

तीर्थाटन

आजपावेतो श्रीसमर्थांच्या अवतारासंबंधी विवेचन करीत करीत जन्म, बाल्य, तप या तीन भागांचे विवरण केले. आज तीर्थाटन व मातृदर्शन या विषयासंबंधी विचार करू या. तसेच त्यातून काही वेळ पाहिल्यास लोकानुग्रह ह्या विषयासंबंधी विचार करून सुरवातीस त्यांनी कोणावर अनुग्रह केला व समर्थ संप्रदाय कसा वाढीस लागला या संबंधीही विवेचन करू तसेच त्यांच्या सद्गुणांचे चितनही त्याबरोबरच करू,

नाशिक जवळील पंचवटी-टाकळी येथे वारा वर्षे पुरश्चरण केल्यानंतर तीर्थयात्रेस जाण्याचा श्रीसमर्थांनी निश्चय केला.श्री रामप्रभूंनी समर्थांना तुला आता जास्त तपशर्येची गरज नाही. इतकेच नव्हे तर तुला स्वतःला कशाचीच आवश्यकता नाही. जगदोद्धारासाठी तुझा अवतार आहे. त्याकरिता लवकर कामाला लाग. अधर्मी लोकांचे हल्ले यांचव लोकांच्या मनाची सुधारणा करून त्यांचे कर्म, उपासना, ज्ञान याकडे लक्ष वळव. तुला नवे सामध्ये मिळविण्याची आवश्यकता नाही. तुझ्यावर माझा अनुग्रह तर आहेच. शिवाय मारुतिवाय तुझ्या सोबतीला बाहे. माझी सर्व प्रकारची सेवा तू रामावतारात केली आहेस. या जन्मी त्याची आवश्यकता नाही.असे म्हणाले. श्रीसमर्थांनी कालमानानुसार आपल्या कार्यास प्रारंभ केला. आपले जीवन सामान्य जनांच्या उद्धारासाठी त्यांना योग्य मार्गदर्शनासाठी, आपले आचरण त्यांना अनुकरणीय व्हावे यासाठी मानवाचे कर्म करूनच योग्यता प्राप्त करून घ्यावी हे ठसविण्यासाठी त्यांनी आपण तपोबळाने प्राप्त केलेले सामर्थ्य उपयोगात आणण्याचे ठरविले व त्यानुरूप आचरण करण्यास सुरुवात केली आणि श्रीरामप्रभूंचा अनुग्रह मिळविण्यासाठी त्यांची प्रार्थना करून ते तीर्थाटनास निघाले. तीर्थाटनामुळे सर्व देशाची कल्पना येते. निरनिराळे अनुभवही अनुभविण्यास मिळतात, योग्य अयोग्य कोणते हे ठरवून धर्म प्रचारार्थ मदत करता येते. त्या त्या क्षेत्री मठ स्थापन करून प्रचारासाठी अनुकूलता होते व पुढील कार्यास आपोआप मदतही होते. या निरनिराळ्या दृष्टीने विचार करून तीर्थयात्रा करणेच योग्य असे ठरवून श्रीरामप्रभूंची आज्ञा घेऊन त्यांनी पंचवटी सोडली. सर्वप्रथम कशीस जाऊन त्यानंतर रामेश्वरास जावे असा सर्वसाधारणपणे यात्रेचा क्रम असल्याने प्रथम उत्तरेकडे त्यांनी प्रयाण केले. त्याकाळी रेल्वे किंवा विमानांची सोय नव्हती. पायीच जावे लागे, असे असल्याने श्रीसमर्थास काशीस पोहोचण्यास बरेच

दिवस लागले. ठिकठिकाणी कीर्तन, प्रवचन, धर्मजागृती, भक्त जनांना अनुग्रह, मठस्थापना वगैरे करीत करीतच तीर्थयात्रा चालू होती.

विश्वनाथ अदृश्य झाले

त्याकाळी वेळोवेळी अनेकानेक चमत्कार घडले. काशीस पोहोचल्यानंतर श्रीविश्वेश्वरदर्शनासाठी देवळात प्रवेश करण्या त्याना मनाई केली. तेथे सर्व ब्राह्मण सोवळचाने विश्वेश्ववास अभिषेक करीत होते. श्रीसमर्थ हे ब्राह्मण नसावे असे समजून त्यांनी त्यांना गाभारयात येऊ दिले नाही. काहीही न बोलता समर्थ परत फिरले व थोडे दूर जाऊन एकांत स्थळी ध्यानमग्न झाले. एवढयात एक आश्चर्यकारक घटना घडली. लिंगरूपी विश्वनाथ समर्थांच्या मागोमाग येऊन समर्थ जेये बसले होते तेथे प्रगट झाले. ह्या उदाहरणावरून परमात्म्यास महात्म्यांचा किती अभिमान असतो हे लक्षात येईल. वैदिकांना देवळातील लिंगरूपी विश्वताय दिसेना. तेव्हा त्यानी अरेरे, काय झाले बरे !! विश्वनाथ कोठं गेले वरे ? असे चिंताग्रस्त उद्गार काढून ठे घावरून गेले. ही आश्चर्याची गोष्ट कोणालाच उमजली नाही. चिता, भीती, यांचे वातावरण उत्पन्न झाले, सर्वजण घावरले व आता कसे होणार? अशा विचारात ते पडले. हा गोंधळ चालू असता तेथील एक वृद्ध गृहस्थ आत आलेल्या महात्म्याला शोधून काढा व त्यांच्यामुळेच झाले असावे अशी माझी खात्री आहे असे म्हणाला. ते ऐकून तेथील सर्वजण श्री समर्थांचा शोध करीत करीत ते जेथे होते तेथे आले. तेथे त्यांना श्रीसमर्थ लिंगास अभिषेक करीत आहेत असे दिसले. रुद्रअद्याप न संपल्यामुळे आलेले सर्व लोक तो पूर्ण होईतो तेथेच थांबले, नंतर 

समर्थांना नमस्कार करून स्वामी आमची चूक झाली. आपल्यासारख्या महात्म्यांच्या अपमानाचे आम्हास प्रायश्चित्त मिळाले आहे, आपण कृपाळूपणाने अनुग्रह करून आमच्या विनंतीस मान देऊन मंदिरात यावे, आपणावरोबर लिंग ही येईलच, लिंग नसल्यास यात्रा का चालू चाहतील ? यासाठी आमच्यावर भक्तजनावर ह्या क्षेत्र स्थानावर कृपा करावी अशी प्रार्थना केली. श्रीसमर्थ त्यांच्या विनंतीनुसार देवाळ्यात आले, तेथे नेहमीप्रमाणे लिंग दृष्टोत्पत्तीस आले ह्या घटनेमुळे समर्थांचे सामर्थ्य काय आहे ! हे तेथील जनतेच्या ध्यानी आले आणि त्यामुळे काशी क्षेत्रात त्यांचे गुण गान सुरू झाले, सर्वांचे लक्ष्य समर्थावर खिळले गेले, तेथे काही दिवस पाठ, प्रवचन, कीर्तन, भजन इत्यादि करून लोकांचा उद्धार करून त्यांना अनुग्रह देऊन धर्ममार्गात त्यांची उन्नती व्हावी म्हणून तेथे एक मठ स्थापन करून पुढील प्रवासास निघाले.

हिमालय यात्रा

गंगोत्री, जमवोत्री, उत्तर काथों बगैरे यात्रा पूर्ण करून बदरीनारायण ही स्थळे पाहून तेथून श्वेत मारुती ह्या अवघड व कठिणस्थळी जावयास निघाले व तेथे जाऊन चातुर्मास केला. हिमालयात थंडी भयंकर असते. तेथे राहणे महाकठीण. समर्थाच्या शरीरावर कपनी खेरीज दुसरे काहीही नव्हते. किती झाले तरी मनुष्य देहच. वरून बर्फ पडत असल्याने श्रीमारुतिराय तेथे गेले व त्यांनी समर्थांना वल्कले दिली. श्रीरामप्रभु रावणाचा वध करून परत अयोध्येस येऊन पुढे होणाऱ्या मंगलस्नानाच्या पूर्वी श्रीमारुतिरायांना ही वल्कले प्रसाद म्हणून त्यांची दिली तीच श्रीमारुतिरायांनी समर्थांना दिली आणि त्यांच्या सान्निध्यात समर्थांवी चातुर्मास पुरा केला.

चारधाम

कमाने मथुरा, वृंदावन अशी यात्रा करीत वरीत ते द्वारकेस निघाले. द्वारका पश्चिमेस आहे. बदरी उत्तर दिशेस, पुरी पूर्व दिशेस व रामेश्वर दक्षिण दिशेस अशी भारतातील चार घामे आहेत. या चार धामांमध्ये ज्योतिर्लिंगादि सर्व तीर्थ व क्षेत्रे येतात. सप्तपुरीही यामध्येच आहे. आपल्या या भारतवर्षात साडेतीन कोटी तीर्थे आहेत. पायी यात्रा पुरी करावयाची अस ल्यास बारा वर्षे लागतात. तीर्थयात्रेचे तप बारा वर्षाचे म्हणजे सामान्यपणे १०-१२ मैल पायी चालण्याने बारा वर्षात यात्रा पुरी होऊ शकते. अशी यात्रा म्हणजे एक तपच होय.

तीर्थे तीर्थे निर्मलं ब्रह्मवृंदं ! वृंदे वृंदे जायते तत्वबोधः ।

प्रत्येक तीर्थाच्या ठिकाणी ज्ञानचर्चा चालत असून तत्वबोध होऊन साधनेसाठी अनुकूल वातावरण तयार होते व चित्तशुद्धी साठीही योग्य वातावरण तयार होते. साधकांना मोक्षप्राप्ती करून देण्यासाठी निरनिराळया पाठशाळा प्रत्येक ठिकाणी असतात. वाटेत दुःख, कष्ट, निंदा, स्तुती, क्षुधा, तृष्णा यांचे सहज मनोजय इत्यादि होत असल्याने ज्ञानोत्पत्ती, वैराग्यप्राप्ती इत्यादि अनेक मोक्षसाधने अंगवळणी पडतात.

तीर्थ यात्रेतील दृष्टी

साधनेसाठीही तीर्थयात्रा आवश्यक आहे. पावन होण्यासाठी तीर्थयात्रेची गरज आहे. साधक साधनेसाठी, जीवनमुक्त पावन होण्यासाठी तीर्थयात्रा करीत असतो. ज्ञानीजनांच्या संपर्कामुळे तीर्थक्षेत्रे पवित्र होत असतात. पापी लोक आपले पाप नाहीसे करण्यासाठी तीर्थक्षेत्रो येतात त्यामुळे तीर्थक्षेत्रातील गढूळ वातावरण पवित्र करण्यासाठी सज्जनांचे आगमन आवश्यक आहे. असे शास्त्रवचन आहे आणि इतिहासही तसाच आहे. श्रीसमर्थ साधनेसाठी तीर्थयात्रेनिपाले जनउद्धारासाठी आणि ती पवित्र करण्यासाठीच त्यांचा संचार होता. जगाच्या कल्याणासाठी कार्यदक्ष असणारा विरळाच. त्या त्या प्रदेशाचे आचार वेगवेगळे असतात. त्यांचे श्रीसामर्थानी आपल्या तीर्थयात्रेत पूर्णपणे अवलोकन केले व त्याकाळी श्रीसमर्थांनी निरनिराळया स्थळी अकराशे मठाची स्थापना करून तेथे व्यवस्थापक मठाधिपती नेमून धर्म प्रचाराची अकराशे केंद्र स्थापन केली. पहा ! प्रचाराची त्यांच्या कार्याचे किती मोठे क्षेत्र होते ! ठिकठिकाणी तरुणामध्ये धर्मप्रचार ते करीत. त्यांच्या वागणुकीत योग्य तो बदल घडवीत असत. धर्मप्रचारासाठीच मठांची योजना असून बुद्धीचे सहकार्य धर्मप्रचारासाठी घेत असत.

पुण्यसमर्पण

वारा वर्षात तीर्थयात्रा करून परत नाशिक पंचवटीस येऊन यात्रेचे पुण्य श्रीरामप्रभूंच्या चरणांवर अर्पण केले. त्यानंतर ते मातृदर्शनासाठी निघाले. त्यावेळी घर सोडल्यास त्यांना चोवोस वर्षे झाली होती. तो पावेतो त्यांच्या मातोश्री पुत्रशोकाने अत्यंत कृश झाल्या होत्या व रडून रडून त्यांची दृष्टीही नष्ट झाली होती. रात्रंदिवस चातकाप्रमाणे त्या नारायणाची वाट पहात होत्या श्रीरामप्रभूंची आज्ञा घेऊन ते आपल्या जांबगावाकडे निघाले.

ब्राह्मण गर्वहरण

श्रीसमर्थ नासिकहून निघून मध्येच पैठण क्षेत्री काही दिवस थांबले. त्यावेळी धर्मशास्त्र निर्णयासाठी तेथील ब्रह्मवृंदाकडे

विचारणा केली जाई. पैठण येथील ब्राह्मण त्याकाळी विद्वान समजले जात असत. त्या ब्राह्मणांपैकी काही मंडळी गर्विष्ठ होती. ” एकनाथ महाराज हे नाव आपणास माहीत बाहेच. पैठण हे त्यांचे जन्मस्थान. एकनाथ महाराजांच्या समाधी पुढे श्रीसमर्थ दररोज कीर्तन करीत असत. करतल भिक्षा, साधकांना तत्त्वबोध, धर्म प्रवचने, धर्म जागृती हीच त्यांची नित्याची कार्य होती, प्रकारे आपले कार्यक्रम करीत असता त्यांना काही विद्वान मंडळी अत्यंत गर्विष्ठ असल्याचे आढळून आले. त्यांचा गर्वहरण करण्या साठी श्रीसमर्थांवी एक विचित्र लीला केली. एके दिवशी सकाळचा नित्य कार्यक्रम संपल्यावर कफनी घालून डोक्यावर टोपी घालून सुमारे अकरा वाजण्याच्या वेळी काही ब्राह्मण जेथे अनुष्ठान करीत होते तेथे समर्थ गेले. त्यांच्या हातात गोफण होती. हा वेष पाहून त्यांची चेष्टा करण्याचा काही ब्राह्मणांनी आपसात निश्चय करून समर्थांना हाक मारली.

पहिला ब्राह्मण- अहो साधू इकडे या. हा कोणता पोषाख आहे ??

दुसरा ब्राह्मण आपला आश्रम कोणता ?

तिसरा ब्राह्मण कलियुगातील साधु आहात काय ? चवथा ब्राह्मण- तसे नाही, तोंडात येईल ते काय बडबडता.पाचवा ब्राह्मण ( जवळ येऊन ) संन्यासाश्रम ना ?” आपला आश्रम

समर्थांनी उत्तर दिले की माझा कोणताच वेगळा आबम नाही, मी ब्रह्मवर्षावस्थेत आहे तेव्हा तो ब्राह्मण म्हणाला ठीक, आपण साधु आहात ना ! पण तसे तर दिसत नाही। जाऊ या झाले ! आणि ही गोफण कशाला ? शोभे करता काय ? हे का साधूचे लक्षण ? त्यावर समर्थ म्हणाले. ब्रह्मचर्य म्हणजे बाल्यावस्था ही गोफण सहज आणली आहे झाले ब्राह्मणाने विचारले, ‘ही सहज म्हणून आहे का सवय म्हणून आहे?” समर्थ म्हणाले, ‘होय, मला ती वापरण्याची थोडी सदय व अभ्यासही आहे. मुलाप्रमाणे हिने दगड मारण्याची मलाही सबब आहे.तेव्हा ब्राह्मण म्हणाला पाहू या मरा! आकाशातून उडणारे पक्षी तुम्ही पाडू शकाल काय ?” त्यावर दुसरा म्हणाला “अरे हे काय सांगता? तेवढा अभ्यास असणे शक्य नाही, तेव्हा तिसरा म्हणाला त्यात काय चुकले ? त्यानीच सांगितले ना की मला त्याची सवय आहे म्हणून मग समर्थ म्हणाले, ‘जशी आपली आज्ञा. ब्राह्मण त्यावर म्हणाला, हे पहा, तुमच्या गलोलोने दगड मारून ती घार उडत आहे ती खाली पाडा. पाहू तुम्हास जमते का ?’ ‘ठीक आहे. जशी आपली आज्ञा,’ असे समर्थांनी म्हणून दगड मारून घार ताबडतोब खाली पाडली व ती खाली पडताच तिने थोडीशी घडपड करून प्राण सोडला. हे पाहून गडबड उडाली व ते सर्व ब्राह्मण समर्थांना चिडविण्याच्या उद्देशाने म्हणाले, ‘अरे पहा हा कलियुगातला साधु ! हा खरा साधु नव्हे, ही हिंसा की अहिंसा ? अहिंसा परमोधर्मः। असे वचन असता याचे हे कृत्य योग्य आहे काय ? ह्यांना समजून सांगणारा कोणी दिसत नाही, एकदा पाय घसरला की तो घसरलाच, ‘ इतक्यात दुसरा म्हणाला, ‘जे झाले त्याला उपाय नाही. तेव्हा ह्यांनी आता प्रायश्चित्त घेतले पाहिजे. त्याशिवाय पापक्षालन होणार नाही. त्यावर सगळे म्हणाले की, ‘तुम्ही माता प्रायश्चित्त घेण्यास तयार झाले पाहिजे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे समयतो प्रायश्चित्त घेतले. जटा, दाढी मिशा आपण भूदेव आहात. काढून टाकल्या ब्राह्मणांनी सांगितल्याप्रमाणे सर्व काही केले. त्यानंतर हात जोडून विनयाने म्हणाले, आपल्या सांगण्याप्रमाणे आता माझे पापक्षालन झाले हे सिद्ध झाल्यानंतर मनावरील अनिष्ट परिणाम जाऊन मनाला आता अशा बुद्धी होणार नाही.ब्राह्मण म्हणाले ते काय डोळयाने दिसणारे आहे काय ? भावनेनेच ते समजून घेतले पाहिजे. तुम्ही निष्पाप झाला आहात. जाता जावयास हरकत नाही. तेव्हा समर्थ म्हणाले, ‘ तसे नव्हे. घार मारल्यामुळेच मला पाप लागले ना ? ‘ ब्राह्मण म्हणाले, ‘ असेल बुवा !मग समर्थ म्हणाले, * तसे जर असेल तर घार जिवंत केल्यानेच पाप खरोखर नाहीसे झाले असल्याचे समजावे लागेल. तेव्हा ब्राह्मण म्हणाले असेलही ! त्यावर दुसरा ब्राह्मण म्हणाला अहो एवढे सामर्थ्य कोठे आहे ? धार जिवंत करण्याचे सामर्थ्य ह्या काळात कोणा मध्ये आहे ? धर्मशास्त्राप्रमाणे विधिवत् सर्व संस्कार झाल्याने त्यावर विश्वास ठेवणे क्रमप्राप्त आहे. तेव्हा समर्थ म्हणाले, ” तसे नव्हे. खरोखरच पाप नाहीसे झाले असेल तर ती घार जिवंत झालीच पाहिजे. तसे जर असेल, तर आपणच प्रयत्न करा !असे बाकीचे ब्राह्मण म्हणाले ते ऐकून समर्थांनी ठीक आहे. जशी थापली आज्ञा.असे म्हणून मेलेल्या घारीला उद्देशून ऊठ, बराच वेळ झाला. तुला आहार मिळवायचा आहे. तुला पोरे, बाळे असतील, तू अशी झोपून राहिलीस तर त्यांचे कसे होईल ? ती सर्व सुकेने व्याकूळ झाली असतील व तुझी वाट पहात असतील. यासाठी ऊठ !असे म्हणून तिच्याकडे कृपादृष्टीने पहाताच तो घार उडून आकाशात गेली आणि समर्थांना जटा, दाढी, मिशा इत्यादि सर्व पूर्ववत आल्या. हा चमत्कार पाहताच सर्व ब्राह्मणांचा गर्व नष्ट होऊन, हे खरोखरच महात्मे आहेत, अशी खात्री पटून त्यांच्याबद्दल पूज्यबुद्धी उत्पन्न झाली. अनुष्ठानात इतके सामर्थ्य आहे ! निव्वळ अध्य यनाने फक्त गर्वच निर्माण होतो. आत्मनिष्ठा, तत्वदृष्टी, सदा चार हे सांभाळून साधन चालू ठेवले तरच मात्र योग्य पुरुष बन् शकतो. समर्थांच्या ह्या प्रभावामुळे सर्व विद्वान त्यांचे शिष्य बनले. कीर्तन प्रवचनादिद्वारे धर्मजागृती करण्याचे समर्थांचे कार्य चालूच होते.

मातृदर्शन

काही दिवसांनी एक वृद्ध गृहस्थ समर्थांकडे येऊन त्याने समर्थांच्या मातोश्रीची हकीकत सांगून म्हणाला, ‘त्या फार दुःखी कष्टी असून रडून त्यांना दिसेनासे झाले आहे. नारायण मला कधी भेटेल याची खातुरतेने वाट पहात आहेत. एकदा त्यांचे दर्शन घेऊन या. आपल्या दर्शनाने त्या सर्वांचे दुःख नाहीसे होईल. ‘ त्यावर समर्थांवीमी निश्चित जाईन. थोड्याच दिवसात मी तिकडे जाऊन येईनअसे म्हणून ते तेथून निघाले. समर्थांनी आपल्या घराच्या दरवाज्यात उभे राहूनजय जय रघुवीय समर्थअशी घोषणा केली. राणूबाईनेत्यास मूठभर तांदूळ घाल म्हणून सुनेस सांगितले. आपल्या दारी कोणी तरी याचक आला आहे, असे त्यांना वाटले. त्यावेळी समर्थ म्हणालेमी मुठभर भिक्षा घेणारा धिकारी नाही. आवाज ओळखीचा वाटल्याने नारायण आलास !’ असे म्हणून राणूबाईंनी धावत जाऊन त्यांना मिठी मारली. चोदीस वर्षानंतर आपला मुलगा घरी आल्याने त्यांना आनंद होऊन त्या तुझी दिगंत कीर्ती ऐकली आहे. पण तुला पहाण्यास माझी दृष्टी मात्र काम करू शकत नाही,’ असे दुःखाने म्हणाल्या. मातोश्रींचे दु:ख जाणूनही काही मवघड गोष्ट नाहीअसे म्हणून त्यानी मातोश्रींच्या डोळ्यावरून हात फिरवताच त्यांना पूर्वीसारखी दृष्टी आली हे पाहून पातोश्रींना आश्चर्य वाटले. बाळ, तुझी कोर्ती वाढवण्यासाठी तू काही चेटुक विद्या हस्तगत केली नाहीस ना ? असे असेल तर तुझा जन्म व्यर्थच असे नाही ना ? ‘ असा प्रश्न केला. तेव्हा समर्थ म्हणालेतुझे म्हणणे बरोबर आहे. मी भुतेखेते माझ्या ताब्यात ठेवली आहेत. ते भूत कोणते ते मी तुला सांगतो जे भूत वैकुंठात होते. ज्याने दशरथाच्या पोटी जन्मूनरघुकुलतिलकअशी प्रसिद्धी मिळवली, ज्याने विश्वामित्राच्या यज्ञाचे रक्षण केले, ताटकेचा वध केला, अहिल्येचा उद्धार केला तेच ते भूत असून तेच मी प्रसन्न करून घेतले आहे. यथासांग यज्ञयागादि वरून, बाणाने मारीचास पळवून, सुबाहूचा वध करून, ऋषीमुनींना संतुष्ट करून पुढे जनकाची कन्या सीतेचे ज्याने पाणिग्रहण केले तेच हे भूत होय. एकवीस वेळा क्षत्रियांचा निःपात करण्याच्या परशुरामाचा गर्व नाहीसा केला तेच हे भूत होय. पितृवचन पालनार्थ ज्याने चौदा वर्षे वनवास भोगला ज्याने नासिक क्षेत्री चौदा हजार राक्षसांचा संहार केला. सपरिवार रावणाचा वध करून विजय मिळविला त्या जग मंगलकारक रामचंद्र नामाच्या भुताने मी पछाडला गेलो आहे, त्याच्या सामर्थ्यानेच तुला दृष्टो प्राप्त झालीहे ऐकून मातोश्रींन अत्यानंद आनंद झाला.

पुन्हा पंचवटी

घरी असताना आपल्या बंधुबरोबर तत्त्व विवेचन चालू असता मातोश्रीबरोबरही तत्त्वज्ञानावर बोलणी होत असत. काही दिवसांनी घरून निघून गोदावरी नदीस प्रदक्षिणा करून ते पुन्हा नासिक क्षेत्री बाले. त्यावेळी श्री प्रभुरामचंद्रानी त्यांना आता यापुढे कृष्णातीरी जाऊन तुला जगदोद्धार करावयाचा आहे. तेथे शिवाजी नावाच्या महापुरुषाचा जन्म झाला आहे, त्याला पुढे करून तू धर्म कार्य कर.’ अशी आज्ञा केली. ‘नाथसंप्रदायातील सिद्ध पुरुषनासिकडून हिंडतते महाबळेश्वर येथे आले. ह्या ठिकाणाचे खरे नावमहाअसे आहे. ह्या ठिकाणी ब्रह्मदेवाने यज्ञ केला होता. हे ब्रह्मारण्य अति पवित्र स्थान होय. येथे बऱ्याच मंडळींना अनुग्रह देऊन श्रीमारुतीरायाची स्थापना करून तेथून समर्थकृष्णावेण्णा संगम असलेल्या माहुली क्षेत्री आले. ‘कृष्णा विष्णुतनुः साक्षात् वेण्या देवो महेश्वरः असे म्हणतात. हे स्थळ इषिहर भेटीसाठी प्रसिद्ध आहे. तेथे ते आले. तेथून जवळचजरांडनावाचा डोंगर असून त्यावर श्रीमारुतीचे मंदिर आहे. श्रीमारुती राय द्रोणागिरी घेऊन जात असता त्याचा एक लहानसा तुकडा खाली पडला तोच हा डोंगर होय असे म्हणतात. तेथेगोपाल नाथनावाचे एक नाथ संप्रदायी सिद्ध पुरुष पहात होते. त्यांना वऱ्याचशा सिद्धी प्राप्त झाल्या होत्या ते जेवत नसत. त्यांच्याकडे दोन गायी होत्या. त्यांचेच दूध ते पीत असत. त्यांच्यामध्ये वाक् सिद्धि, शापानुग्रह याचे सामर्थ्य होते. ते सातशे वर्षाचे महत् होते असे म्हणतात. श्रीसमर्थं त्यांच्या पाश्रमापुढून जाऊन तसेच पुढे गेले. साधारणपणे वयोवृद्धांना थोडासा अभिमान असतोच. ‘माझ्या इथे येऊन माझ्याकडे पाहिले सुद्धा नाही. म्हणून कंटाळवाण्या स्वरात त्यांनी समर्थांनारामदास रामदासअशी हाक मारली. तरीही समर्थ त्यांच्याकडे आले नाहीत हे पाहून शबावून समर्थांच्या सामर्थ्याची परीक्षा घेण्याच्या उद्देशाने त्यांनी समर्थांवरनावपाशटाकला. पण श्रीमारुतीरायाचे ध्यान करीत असलेल्या समर्थांवर त्याचा काहीच परिणाम झाला नाही. इतकेच चव्हे तर तो पाश गोपाळनाथावर उलटला ते त्याने बद्ध झाले.त्यावेळी त्याना समर्थांची कल्पना आली. पश्चात्ताप होऊन आता प्राण जाण्याची वेळ आली; असे दुःख करीत हा पाश दुसरा कोणीही फाढणे शक्य नाही या भावनेने त्यानी आपल्या शिष्याकडून समर्थांना बोलावून घेतले. समर्थांनीयापुढे तरी गर्व सोडणार ना !’ असे म्हटले. म्हातारा अगदीच हताश झाला होता, त्यामुळेमो आता गवं करणार नाहीअसे त्याने कबूल केले ते पाशमुक्त झाले. अशा प्रकारे चमत्कार दाखवून ते कन्हाड, कोल्हापूर इत्यादि गावाकडे निघाले.

शिष्यमंडळी

कराडात अवकाबाई त्यांच्या शिष्या वनल्या. मी मागील एका प्रवचनातत्रिजटाम्हणजेच अक्का होत असे सांगितले. ते आपणास आठवत असेलच. अंबाजीचाही तेथेच परिचय झाला. तोच जोकल्याणया नावाने प्रसिद्ध आहे. तो भरताचा अवतार होता, असेही काहींचे मत आहे. समर्थांनी त्याला अनुग्रह दिला. कोल्हापुरात वेणाताईंचा परिचय झाला हीचस्वयंप्रभाहोय. ही बालविधवा होती. तिने फारच कष्ट केले. एके दिवशी ती भागवतावरील टीका वाचीत होती त्यावेळी श्रीसमर्थ तेथे आले त्यांना उद्देशून त्या म्हणाल्यास्वामी, हा फार गहन विषय आहे. आपल्या मुखाने तो समजून घ्यावा असे वाटते. समर्थांनी आत्ताचे विवेचन करून तिचेवर अनुग्रह केला. लोक आपापल्या स्वाभानुसार आपल्या मनाप्रमाणे शंका घेऊन कुजबुजू लागूनही बाई कोणत्यातरी साधूबरोबर बोलत बसते हे योग्य आहे काय ?’ असे म्हणू लागले. बोलणान्यांच्या तोंडावर कोण हात ठेवणार ? एके दिवशी तिचे आईवडील आपल्याला मुलगी असण्यापेक्षा ती मेलेलीच बरी असे म्हणून त्यांनी तिला विष देऊन एका खोलीत बंद करून ठेवले. आपला अंतःकाळ जवळ आला असे वाटून वैणाताईने दीनवाणीने श्रीसमर्थांची प्रार्थना केलो. त्यावेळी खोलीच्या दारास कुलूप असले तरी सूक्ष्मरूपाने समर्थावी खोलीत प्रवेश केला त्यावेळी ‘स्वामी’ अंतःकाळी श्रीगुरूचे दर्शन होऊन मय प्राण जावा, या हेतूनेच मी आपले ध्यान केले होते, असे त्या म्हणाल्या. तसेच ‘ मला विष दिलेले आहे. त्यामुळे मला फार त्रास होत आहे यातून मुक्त होण्यासाठी आपण अनुग्रह करावा, अशोही प्रार्थना केली. विष नाहीसे करून समर्थांनी तिला उपदेश केला की, ‘देह नश्वर असून तो वाचण्याची आशा नसते. एक आत्माच आपल्या अपार महिन्याने सर्वत्र प्रकाशतो. तेथे इतर विकल्प नाही.’ एवढे सांगत असताच तिच्या आई वडिलानी ते ऐकून, खोलीत कोण कुजबुजते ? हे पाहण्यासाठी खोलीचे दार उबडले. त्यावेळी समर्थांचे दिव्य तेज व अतुल सामर्थ्य पाहून ‘हा सामान्य साधू नव्हे’ अशी खात्री होवून ते त्यांचे शिष्य बनले.

अंबाजीचा ‘कल्याण

मसूर भागात असता शिष्यांची परीक्षा घेण्याचे काम चालू होते. कोणत्याही शिष्याची परीक्षा घेतल्याशिवाय त्याला शिष्यत्व मिळत नसे. शिष्यांना विशिष्ट शिकवण, उच्चस्तरात वागण्याच्या काही गोष्टी यासाठी मधून मधून परीक्षा घेतल्या जात. उत्सवाच्या वेळी उंच उंच काठयांची मिरवणूक आवश्यक असे. हनुमान जयंतीच्या वेळी एका काठीस एका झाडाची फांदी आडवी बाली. तो फांदी काढून टाकण्यास विदरच्या बादशहाची परवा नगी आवश्यक होती तेथून ८०० मैल दूर असलेल्या बादशहाची परवानगी मिळवूनच मगच मिरवणूक पुढे जाणे शक्य होते. स्थानिक सुभेदार आडवा आला. तेव्हा समर्थ उत्सवाच्या मिरवणुकीतून अदृश्य होऊन बादशहापुढे प्रगट झाले व स्वसामर्थ्याने

पूज्यता मिळवल्याने बादशहाने त्यांची पाद्यपूजा केली. समर्थांची त्याला सर्व वस्तुस्थिती सांगितली व ऐन उत्सवाच्यावेळी सुभे दार नेहमी त्रास देतो यासाठी आज्ञापत्र मिळावे’ असे म्हणाले त्यावर इतक्या दूर आपण कसे जाणार ? असा बादशहाने प्रश्न केला. त्यावर ‘जसा आलो तसा जातो. तुम्हास पाहावयाचे तर या!’ असे म्हणून एक पाय बिदबात तर एक पाय मसूपास असा ठेवून एका क्षणात सुभेदारास आज्ञापत्र दाखविले व फांदी तोड ण्यास अंबाजीस आज्ञा केली. त्यानंतर विदरचा बादशाह व मसूरचा सुभेदार या दोघांना समयांचा अनुग्रह झाल्याने ते समर्थांचे भक्त बनले.

फांदी तोडताना बुंध्याकडे उभे राहून ती तोडली जाते पण समर्थ अंबाजीला म्हणाले, ‘ बाळ नेहमीप्रमाणे फांदी तोडण्यात काय महत्त्व आहे ? फांदीच्या टोकावर बसून ती तोडणे यात वैशिष्ट्य आहे. त्यावर अंबाजीने ‘ जशी आपली आज्ञा’ असे म्हणून फांदीच्या शेंड्याकडे बसून फांदी तोडू लागला. वंतर समर्थ तिकडे लक्ष न देता पुढे निघून गेले. फांदी तोडणारा अंबाजी फांदी तुटताच त्या झाडाखाली असलेल्या विहिरीत पडला. थोड्या वेळानंतर जेवणाची वेळ आली. अंबाजी विहिरीत पडून मेळा बसेल असेच सर्वांना वाटले. शव जवळ ठेवून कसे जेवावयाचे ? ही येथील ब्रह्मवृंदांना काळजी पडली. ही गोष्ट समर्थांना विचारण्याचे कोणातही धारिष्ट्य नव्हते. नंतर अक्काबाईंनी पुढे होऊन ती गोष्ट समर्थांच्या कानावर घातली ते समजताच श्रीसमर्थ विहिरीजवळ जाऊन त्यांनी ‘ अंबाजी’ अशी हाक मारली. तत्क्षणीच विहिरीतून ‘ ओ’ असे उत्तर झाले. समर्थांनी कसे काय आहे ? ‘ असे विचारताच ‘ आत कल्याण आहे’ असे त्याचे उत्तर दिले. सर्व पहाणे झाले काय ? ‘ असे समर्थांनी विचारताच सर्व काही पाहिले असे तो म्हणाला. समर्थांनी प्रार्थना करून अंबाजीस श्रीरामप्रभूंचा साक्षात्कार करून दिला. नंतर त्यास ‘वर ये’ अशी आज्ञा करताच तो वर त्याने श्रीसमर्थांना अत्यानंदाने नमस्कार केला. देहसुखाची इच्छा न बाळगणारा, प्राणाची पर्वा न करणारा असा हा शिष्य होता. पुढ चाफळ येथे मठ स्थापन करून संप्रदाय वाढविला.

home-last-sec-img