Literature

त्रिवृत्करण

आतां पुनः प्रकृत विषयाकडे वळू, जीवनाचें ( जानव्याचे ) महत्त्व समजून घेऊं. तीन त्रिक नऊ, अशा हिशेबानें जें सूत वळले जाते हैं ‘ त्रिवृत्करण’ आहे. पंचीकरणासारखेच हें एक ‘त्रिवृत्करण.’ हे पंचीकरणाइतके प्रसिद्ध नाहीं. छांदोग्योपनिषदाचा अभ्यास न केलेल्याला हा शब्द अगदी नवीन वाटेल. छांदोग्योपनिषदाच्या सहाव्या अध्यायाच्या प्रारंभीच अरुणाचा पुत्र जो आरुणी-उद्दालक याचा व याच्या श्वेतकेतु नांवाच्या मुलाचा संवाद आला आहे. त्यांत हें ‘ त्रिवृत्करण उद्दालकानें श्वेतकेतूला सांगितले आहे. अध्ययन करून ताठ्यानें आपल्या घरी श्वेतकेतु आला होता. त्याला ब्रह्मज्ञान झालेलें नाहीं, असें मुलाच्या वर्तनावरून उद्दालकानें (ओळखलें) ताडले आणि विचारावयास सुरुवात केली. श्वेतकेतो यन्तु सोम्येदं महामना अनूचानमानी स्तब्धोऽस्युत तमादेशमप्रायः । “ वत्सा, तूं जो इतका गर्विष्ठ व उर्मट झाला आहेस तो कां ? ” येनाश्रुत श्रुतं भवत्यमतं मत मविज्ञातं विज्ञातमिति || – “ बाळ, ज्या एकाचें ज्ञान झाले असतां जितकें म्हणून न ऐकलेलें तें सर्व एकदम ऐकल्यासारखे होतें, जितके म्हणून न समजलेलें असतें तें सर्व एकदम समजल्यासारखे होतें, ज्यांचे आतांपर्यंत ज्ञान झालेले नसतें, त्या सर्वांचे एकदम ज्ञान होतें, तें तत्त्व काय म्हणून तूं आपल्या गुरूला विचारलें आहेस का?” या प्रश्नाला ‘ नाहीं’ असे मुलाकडून उत्तर आल्यानंतर मग यथा सोम्पैकेन मृत्पिडेन सर्वे मृण्मयं विज्ञात त्या द्वाचाऽऽरंम्भणं विकारो नामधेयं मृत्तिकेत्येव सत्यम् । (छां. ६।२।३ ) सदेय सोम्वेदमग्र आसीदेकमेवाद्वितीयम् । तदैक्षत बहु स्यां प्रजाये येति तत्तेजो असृजत तत्तेज ऐक्षत बहु स्यां प्रजायेयेति । ता आप ऐक्षन्त बहव्या: स्याम प्रजायेमहीति ता अन्नमसृजन्त ||६|२|| तदपो असृजत |

—एका मृत्तिकेचें, सुवर्णाचे व लोहाचें पूर्ण ज्ञान झालें असतां गाडगें, रांजण इत्यादि ते सर्व मृद्विकार, कंठाकंठी आदि सर्व सुवर्णालंकार ते सुवर्ण विकार व चाकू, कातय इत्यादि सर्व ते लोहविकार म्हणून एकदम समजून येते. विकार हा केवळ शब्दप्रयोग मात्र असतो. एरवीं त्याच्या त्याच्या विकारांत अधिकारी असे तें तेच एक केवळ भरून असतें. मृत्तिकेच्या विकारांत म्हणजे गाडगे, परळ, रांजण आदिकांत मातीच भरून असते. सुवर्णाच्या विकारांत म्हणजे बांगडी, गोट, पाटल्या आदिकांत सुव र्णच भरून असतें. लोखंडाच्या विकारांत म्हणजे विळा, खिळे, चाकू, कातऱ्या आदिकांत लोखंडच भरून असते. हे जसे त्याप्रमाणेच ज्या जगत्का रणापासून हें भेदभिन्न विविध जग निर्माण झाले आहे. तेंच नित्य निर्विकार असे एक त्याच्या या सर्व विकारांतून ओतप्रोत आहे. मृत्तिकेचे विविध विकार गोचर होऊनहि, ते तसेच असूनहि, ते तसेच ठेवूनहि, त्यांचे ज्ञान तसे होऊनहि, त्यांतून एक मृत्तिकाच जशी अनुभवाला पटत असते त्याप्रमाणेच त्या वस्तूचे विविध विकार गोचर होऊनहि, तें तसेंच असूनहि, तें तसेंच ठेऊनहि, त्यांचे तसें ज्ञान होऊनहि त्यांतून एक सहस्तूच अनुभवाला येत असते. हें दिसून येणारे सर्वहि याच्या उत्पत्तीच्या पूर्वी त्याच एक सदूपाने स्थित होते. आपले तें सत्य रूप जसेच्या तसे राखन आपल्या आपणच त्याने आपल्यावर आपल्या कल्पनेनें हें सारें जग निर्माण केलें.

प्रथम आपण बहु व्हावे अशा संकल्पाने त्या सद्रूप परमात्म्यानें आपल्या पासून तेज निर्माण केलें. आपलें पूर्वीचे तें रूप कायम ठेऊन संकल्पानें स्वतःच तो तेज (अग्नि ) रूप झाला. त्या तेजोरूपाने पुन्हां बहु व्हावे असा संकल्प केला व आपल्यापासून त्यानें जलतत्त्व निर्माण केलें. आपलें पूर्वीचें तें अग्निरूप कायम ठेऊन आपल्या संकल्पाने स्वतःच तो जलतत्त्व झाला. पुन्हां जलतत्त्वाच्या रूपानें ‘मी बहु व्हावें’ असा संकल्प केला व आपल्या पासून अन्न निर्माण केलें म्हणजे पृथ्वी निर्माण केली. अन्न पृथ्वीपासूनच निर्माण होत असल्यामुळे पृथ्वी अर्थी इथे अन्न असा शब्द वापरला आहे. अशा रीतीनें अग्नि, जल, पृथ्वी अशा तीन भूतांची अशी उत्पत्ति झाली.

तस्माद्वा एतस्मादात्मन आकाशः सम्भूतः आकाशाद्वायुः । वायोरग्निः । अग्नेरापः । अभ्यः पृथिवी । तैत्तिरीयशाखेच्या ब्रह्मोप निषदांत असा जसा पंचभूतांच्या उत्पत्तीचा क्रम दिला आहे, तसाच इथे भूतत्रयाच्या उत्पत्तीचा क्रम दिला आहे. अर्थ दोन्हींचा एकच होतो. आकाश-वायूहून अग्निरूप या आपल्या विषयाने अधिक व्यक्त असल्यामुळे याच्यापासून जरी सृष्टि धरली तरी याच्या पूर्वीच आकाश आणि वायु ही भूतें अध्याहृत धरावीच लागतात. सघन स्थितींत अन्य कशाचीहि उत्पत्ति होत नाहीं म्हणून संकल्पानें पोकळी निर्माण करून, नंतर कार्याला

चलनात्मक वायूची निर्मिती अवश्य असतेच व मग घर्षणाने निर्माण होतो व अमीपासून जल निर्माण होती है घामाच्या दृष्टीने पावसाच्या दृष्टीनेंहि कोणासहि कळून येईल. कडूनाकडून पाणी आटले की, भांड्याच्या बुडाशी पर बसतो. यावरून जलापासूनच पृथ्वी होते हे स्पष्ट कळून येते. पाऊस पडल्या ठिकाणींच धान्य पिकतें. पावसाअभावी घातलेल्या पाण्यानेंच कोंब फुटतो. या दृष्टीनें आपापासून पृथ्वी व पृथ्वीपासून पाण्याच्या संयोगाने अन्नाची उत्पत्ति होते, हे यावरून उमगते. सच्छद्रवाच्यमविद्याशवलं ब्रह्म । ब्रह्मणोऽव्यक्तम्अव्यक्तान्महत् । महतोऽहंकारः। अहङ्कारा त्पञ्चतन्मात्राणि पञ्चतन्मात्रेभ्यः पञ्चमहाभूतानिपंचमहाभूतेभ्योऽखिलं जगत् । (त्रिशिखि ब्राह्मण उ. १) हाच क्रम इथेहि अभिप्रेत आहे. मुख्यात्पूर्वोत्तरैर्भायैर्भूते भूते चतुञ्चतुःपूर्वमाकाशमाश्रित्य पृथिव्यादिषु संस्थिताःमुख्यादृर्चे परा ज्ञेया न परानुत्तन् विदुःएवमंशो इद्दभूत स्तेभ्यश्चांशो ह्यभूतथा । तस्मादन्योन्यमाश्रित्य होतं प्रोतमनुक्रमात् । (२-३-४) सूक्ष्म पंचभूतापासून सूक्ष्मदेह व स्थूल पंचभूतापासून स्थूलदेह अशी पांचभौतिक सृष्टि झाली. एकेक भूताचे संकल्पाने दोन विभाग करून अर्धा भाग त्या भूतांतला भूतांत ठेवून दुसऱ्या अर्ध्या भागाचे चार भाग करून ते उरलेल्या चार भूतांना बांहून दिल्यानंतर स्वांशानें व परांशानें प्रत्येक भूत पांच पांच प्रकारें बांटले जाऊन पांचापांचा पंचवीस विभाग जसे होतात तसेच इथे तीन त्रिक नऊ विभाग होतात. पंचापंचीकृत भूतांपासून जशी सृष्टि झाली असे म्हणतात त्याचप्रमाणे त्रयात्रयीकृत भूतांपासून ही सृष्टि झाली, असे इथे प्रतिपादिले असले तरी दोन्हींचा अर्थ एकच. आता हे सर्व तत्त्व जानव्यांत कसें सांठविलें आहे ते पाई. जानव्याच्या उद्देशाने ब्राह्मण आपल्या हातानेच सुत कांततो. नंतर ते अखंड सूत चार बोटाला तो शहाण्णव वेळी गुंडाळतो. शहाण्णव वेळां गुंडाळून झाले की मग तें सूत काढून त्याचे बरोबर तीन पदर एकत्रित करून चातीवर वळतो. पुन्हां ते एकेरी सूत तीन पदर करून त्याची दोन्ही टोकें मिळवून ब्रह्मगांठ देतो. असे जानवें तयार होतें.

मागच्या विवेचनावरून चार बोटांनी पिंडब्रह्मांडाच्या चारांनी भरणाऱ्या सर्व उपाधि लक्षित होतात. शहाण्णव वेष्टणांनी शहाण्णव तत्त्वांचे त्यांना वेष्टन आहे असे जाणले जाते. शहाण्णव तत्त्वांचे हे जग अग्नि-जल-पृथ्वीचे ( त्रिगुणांचे ) त्रिवृत्करणरूप आहे, हे पुढच्या नऊ पदरांनी सिद्ध होते.

* पृथ्वी ‘ जडत्वानें तमोगुणरूप मानली जाते; कर्मप्रधान जीवनरूपार्ने ‘जल’ रजोगुणात्मक मानले जातें व प्रकाश म्हणजे ज्ञानरूपानें ‘अग्नि’ सत्त्वगुणा त्मक मानला जातो. शेवटी या अशा चराचर विश्वाचा जो यांच्यांतून व्यापून असणाऱ्या अस्तिभातिप्रियत्वानें अनुभव येतो, तो ब्रह्मरूपाच्या सच्चिदानंद त्वाचा अनुभव आहे म्हणून सच्चिदानंद या तीन लक्षणांत सर्वांचा उपसंहार करून जीवेशाची तत्त्वपदाची दोन टोके, असिपद लक्ष्यन्ब्रह्माच्या ठिकाणी मिळवून सर्वमिदमहं च ब्रह्मैव । सर्व है व मी चिन्मात्र आनंदघन अर्से अद्वि तीय ब्रह्म आहों अशा अर्थाची ब्रह्मगांठ दिली जाते.

अद्वैत तत्त्वाचाच इथे आविष्कार आहे. पाषाणाच्या मूर्तीत त्या त्या विशिष्ट आकाराच्या रूपाने जगत्कारण सगुणब्रह्माचें उक्त विधीनें व वेदोक्त मंत्रानें त्या मूर्तीत जसे आवाहन करावयाचे त्याप्रमाणे जानव्यांत करावयाचे असते. गाय त्रीनें जो ब्रह्मैक्याचा बोध केलेला असतो त्याची स्मृति या जानव्याच्या धार णानें, डोळ्यापुढच्या चित्रानें त्या व्यक्तीची स्मृति आल्याप्रमाणे, पिंडब्रह्मां डाच्या व जीवेश्वराच्या ऐक्याची स्मृति राहण्याकरितां ब्राह्मणांना अशा विधा नाची एक उपासना सांगितली आहे. वेदवाक्यांत, त्या परमात्म्याच्या आज्ञेत अथवा ईशकृपाप्रेरित महात्म्यांच्या उपदेशांत, विधानांत एक विलक्षण दिव्य सामर्थ्य असतें व ते त्याप्रमाणे निष्ठेनें वागणाऱ्याच्या अनुभवासहि येते. हे सर्व असे जाणल्यानंतर कोण आपल्या हिताच्या दृष्टीनें जानवें गळ्यांतून काढून टाकॉल ? मनुष्यापेक्षां देवाला आणि ऋषिमुनींना अधिक महत्व देणारा असा कोण विवेकी कोणातरी नास्तिक माणसांचे ऐकून जानव्याचा त्याग करील ?

home-last-sec-img