Literature

देहजुगुप्सितत्वं तथा कामनिन्दा प्रकरणं सप्तम्‌

शरीराची शिसारी (घृणा) आणि कामवासनेची निन्दा—

स्वदेहाशुचिगन्धेन न विरज्येत यःपुमान्‌।।
विरागकारणं तस्य किमन्यदुपदिश्यते।।1।।
अर्थ— स्वतःच्या शरीरामधील अशुध्दि आणि दुर्गंधी ह्‌यामुळे ज्या माणसाचे मन विटत नाहीं, त्यास आणखी काय उपदेश करणार की ज्या मुळे त्यास आपल्या शरीराचे हीनत्व पटेल. ।।1।।

त्वङमांसरुधिरस्नायुमज्जामेदोस्थिसंहतौ।।
विण्मूत्रपूये रमतां कृमीणां कियदन्तरम्‌।।2।।
अर्थ— कातडे, रक्त, मांस, पू आणि विष्टा, मूत्र, हाडे, नसा आदि मध्येच आनंदाने वळवहणार्‌या कीड्‌या मध्ये आणि ह्‌या माणसांत काय फरक आहे. ।।2।।

मांसासृक्पूयविण्मूत्रस्नानयुमज्जास्थिसंहतौ।।
देहेचेत्प्रीतिमान्‌ मूढो भविता नरकेपि सः।।3।।
अर्थ— मल मूल अस्थि मज्जा रक्त स्नायु नाडयांमध्ये ज्या मूढ व्यक्तिला अश्या अमंगळ देहामध्ये पण प्रीति उत्पन्न होते, तो नरकास पण पे्रेम करु शकतो. ।।3।।

मलांना निचयो देहो नित्यामध्यो जुगुप्सितः ।।
बिना मूढं न कोप्यत्र देहेस्मिन्‌ प्रीतिमान्‌ भवेत।।4।।
अर्थ—— मळांचा निचरा म्हणजेच हा देह नित्यच घृणास्पद आहे. त्या देहाची प्रीति मूर्ख माणसाशिवाय कुणाला उत्पन्न होणार. ।।4।।

बहुदुःखालयं घोरं मातृपितृमलात्मकम्‌‌।।
मूत्रद्वाराच्च निष्क्रान्त वपुःकिमिव शोभनम्‌ ।।5।।
अर्थ—— अत्यंत दुःखाचे घर आणि माता—पितांच्या मळापासून ज्याचा उद्‌भव आहे असा हा देह मूत्रद्वारातूनच तो उद्‌भवला आहे तो काय मोठा शोभायमान(सुन्दर)आहे. ।।5।।

त्वंङगमांसरुधिरास्थीनि मेदो मज्जा तथैव च ।।
शुक्रश्लेष्माश्रुविण्मूत्रं वपुः किमिव शोभनम्‌‌।।6।।
अर्थ—— कातडे रक्त मांस हाडे मेद मांस नसा यांनी बनलेला तथा शुक्र, कफ , अश्रु, विष्टा, मूत्रांनी भरलेला हा देह काय बरे सुन्दर आहे. ।।6।।

वातपित्तकर्फेर्युक्तं नानारोगसमन्वितम्‌‌।।
दुर्गन्धं दुर्गलोपेतं वपुः किमव शोभनम्‌।।7।।
अर्थ—— वात, कफ, पित्त युक्त नाना रोगांनी ग्रस्त ,दुर्गंध अआणि अत्यंत किळसवाण्या अश्या मलांनीयुक्त असा हा देह काय पण सुन्दर आहे. ।।7।।

अन्त्रप्लरीहायकृद्युक्तं स्नायूग्रन्थिभिरावृत्तम्‌‌।।
बहुकोशयूतञचापि वपुःकिमिव शोभनम्‌।।8।।
अर्थ—— आंतडे प्लीहा, तर्‌हे—तर्‌हे चे मासयुक्त अवयच यांनी युक्त अनेक स्नांयू आणि सांधे गाठी यांनी व्यापलेले तथा अनेक कोशांनी युक्त असे शरीर काय फार चांगले म्हणावे. ।।8।।

बहुकोशैर्विभक्तं यद्‌‌ रोमकूपै समावृतम्‌‌।।
दुष्प्रेक्ष्यं दूषिकाद्यैश्च वपुः किमिव शोभनम्‌‌।।9।।
अर्थ—— अनन्त छिद्रांनीयुक्त तथा केशमूलांनी युक्त ओंगळ कंटाळवाणे हे शरीर कायशोभा देणारे आहे. ।।9।।

यदि विश्लेषणं जातं शरीरं शकटोपमम्‌‌।।
भिन्नद्रव्यैस्तथा चाङगैस्तन्नामेकं न सम्भवेत्‌।।10।।
अर्थ—— जर शरीराचे विश्लेषण केले तर ते एखाद्या गाड्‌यासारखे असून अनेक द्रव्य आणि विभागांनी भरलेले हे गाडे मोठे वाहन हयाला एक नांव पण देता येणार नाहीं. ।।10।।

किमस्मिन्नुपभोगैश्च किमालङकृतिभिस्त था।।
किमाङगरागैः किं वस्त्रैः किं गतेन स्थितेन वा।।11।।
अर्थ—— अश्या ह्या शरीराला काय उपभोग द्यावा, पंचेन्द्रियांस काय सन्तुष्ट करावे आणि काय वस्त्र अलंकारांनी नटवावे, काय तर्‌हे—तर्‌हे से विलेपन (प्रसाधने) वापरावीत, आणि ते (शरीर) रायहले काय, गेले काय सर्व व्यर्थ असून नश्वर आहे! ।।11।।

धिगेतान्विषयान्देहान्‌‌ विकारांश्च विशेषतः ।।
धिक्‌ स्त्रीपुरुषभानं च धिगज्ञानंच जीवनम्‌‌।।12।।
अर्थ—— ह्या सर्व देहविषयांचा धिःकार असो. ह्यातील स्त्री आणि पुरुष ह्या प्रकारे भान उत्पन्न होवून त्यांत भेदबुध्दि वाटणे ह्‌या सर्व अज्ञानाचा धिक्कार असो.।।12।।

जातं मृतमिदं देहं मातापितृमलात्मकम्‌‌।।
सुखदुःखालयामेध्यं स्पृष्ट्‌‌वा स्नानं विधीयते.।।13।।
अर्थ—— हे मातापित्याच्या मलांनी युक्त तथा उत्पन्न शरीर जन्मल्यावर किंवा मृत झाल्यावर जर स्पर्श केला तर स्नान करावे लागते, हे शरीर दुःखाच्या विस्ताराचेच घर आहे. ।।13।।

धातुबध्द महारोगं पापमन्दिरमध्रुवम्‌‌।।
विकाराकारविस्तीर्ण स्पृष्टवा स्नानं विधीयते।।14।।
अर्थ—— हे अनेक धातुंचे निर्मित तथा रोगांनीयुक्त सर्व पापांचे माहेर घरच. अश्या विकार आकारांनी फोफावले आहे कीं स्पर्श केल्यावर स्नानच करावे लागते. ।।14।।

नवद्वारमलस्त्रावं सदाकाले स्वभावजम्‌।।
दुर्गन्ध दुर्मलोपेतं स्पृष्ट्‌वा स्नानं विधीयते।।15।।
अर्थ—— नव द्वारांमधून मलाचा स्त्राव सततच चालूं असतो. (दोन डोळे दोन नासिका तथा कर्ण छिद्रे मुख तथा गुदा जनन द्वारे) आणि त्यास दुर्गंध असून स्पर्श केल्यास स्नान करावेच लागते. (पाण्याने स्वच्छ करावेच लागते.)।।15।।

मातृसूतकसम्बध सूतके नैव नायते।।
मातृसूतकजं देहं स्पृष्टवा स्नानं विधीयते।।16।।
अर्थ—— माते संबंधी सूतक अशैाच पाळले जात नाहीं. पण त्यापासून उत्पन्न देहाला स्पर्श केल्यास अंघोळ करावी लागते. ।।16।।

भोजनान्ते स्मशानान्ते मैथुनान्ते च या मतिः।।
यदि सा सर्वदैवस्यात्‌ को न मुच्येत बन्धनात।।17।।
अर्थ—— भोजन केल्यानंतर,श्मशानांत जाउन आल्यांतर आणि मैथून क्रियेनंतर पाण्याने शुध्दीकरण करण्याची बुध्दि असेल तर ती तशीच शुध्दीकरण ची क्रिया सर्वच कार्यात ठेवली (अर्थात्‌ मानसिक आसक्ति सोडून निर्विकार राहण्याची बुध्दि ठेवली )तर कोण मुक्त होणार नाही, अर्थात तो मुक्तच होईल. ।।17।।

देहसम्भोगतोप्सस्य शौचकूपे निमज्जनम्‌‌।।
वैराग्यजनकं शुध्द मुनीनां मतमीदृशम।।18।।
अर्थ—— देह संभोगानंतर स्नान करणे हेशौचकूपात जाऊन स्नान करण्यासारखे आहे. असे पण्डितांचे मत आहे. परंतु मनांतील आसक्ति दूर होणे, मन वैराग्यपूर्ण होणे म्हणजेच खरे निमज्जन स्नान आहे, असे ज्ञानी लोकांचे मत आहे. ।।18।।

पिशाचावेशवज्ज्ञेयावावेशौ कामक्रोधयोः ।।
विस्मारयति चात्मानं हेय देय गुणास्तथा ।।19।।
अर्थ—— काम आणि क्रोध यांचा झटका येतो तेंव्हा अंगांत पिशाच्च संचार झााल्यासारखाच असतो. त्यावेळेस ते विकार आपणास आपल्या आत्मबुध्दिचा विसर पाडून अत्यंत निंदनीय आणि हीन गुणांचे प्रदर्शन करतात. ।।19।।

अपकारिणि कोपश्चेत्कोपे कोपो हि सत्कृतः ।।
जयेत्कोपेन कोपं हि श्रृत्या समुपदिश्यते ।।20।।
अर्थ—— श्रुति म्हणजे आमचे वैदिक ज्ञान असा उपदेश करते की कांट्‌यानेच कांटा काढावा. त्या प्रमाणे क्रोधाचा क्रोध करुनच (अर्थात त्यास दूर करुनच पराजय करावा). अर्थात दुष्टभावनेचा त्याग सद्‌भावनेनेच करावा. ।।।20।।

कोपः कामेपि कृत्वैवं जये त्कामं सुबुंध्दिमान्‌‌।।
कामो दग्धो शिवेनायं कोपेनैव यथा तथा ।।21।।
अर्थ—— कामवासनेवर पण क्र्रोध करुनच त्यास जिंकावे. भगवान शंकराने सुध्दा कामदेवाचा नाश क्र्रोधानेच केला होता. तद्वत आपण ही ह्या कामवासनेचा त्याग (नायनाट) करावा. ।।21।।

कामात्‌ कोपी वरो ज्ञेयो दुर्गुणांश्च देहद्यदि।।
कोपेन स्वान्विकारांश सन्दह्यैवं सुखी भवेत।।22।।
अर्थ—— कामवासनेपेक्षा क्र्रोध हा बरा. क्रोधाने जर आपल्यामधील दुर्गुण जाळले जातील तर ते स्वतः मधील दुर्गुण विकार दग्ध करुन सुखी व्हावे. ।।22।।

क्रोधेन कामं चोत्पाट्‌य कंटकेनैव कण्टकम्‌‌।।
पश्चात्‌‌ क्रोधोपि त्यक्तव्यः सोप्येवं कण्ट कायते।।23।।
अर्थ—— क्रोधाने कामाला उचकटून टाकून कांटयानेच कांटा काढावा. त्यानंतर क्रो्रण ही काढून फेकावा. कारण तो सुध्दा काट्‌‌या सारखाच रुतुन बसणारा दुःखदायक आहे. ।।23।।

त्यक्वा कामश्च क्रोधश्च विश्वामित्रो महातपाः।।
ब्रह्मर्षिरभवच्चैवं सर्वेषां ज्ञातमेव हि।।24।।
अर्थ—— महान्‌ तपस्वी विश्वामित्र सुध्दा काम आणि क्रोध ह्यांचा त्याग करुनच महान्‌ झाले. ते ब्रह्मर्षि झाले. आणि ब्रह्मर्षि पदाला प्राप्त होते झाले. हे सर्व विदितच आहे. ।।24।।

वपुषःस्यात्सुखं मत्वा कामस्यायं बलिर्भवेत्‌‌।।
वपुषो न सुखं किञिचन्मत्वा कामं जयेद्वि सः।।25।।
अर्थ—— शरीरापासून सुख प्राप्त होईल असे जाणून काम हा वरचढ झाला. पण शरीरापासून सुख नाहीं. (खरे सुख नाही) हे समजल्यावर कामावर विजय मिळविता येतो. ।।25।।

वपुरसज्जडं दुःखं स्वात्मा सच्चित्सुखाद्वयः।।
सुखं स्यादात्मनो रुपं देहस्य न कदाचन।।26।।
अर्थ—— शरीर हे असत्‌‌ दुःखदायक आणि जड असे आहे. आत्मा हा अक्षय सुखदायक आणि अद्वितीय आहे. सुख हे आत्मस्वरुपातच आहे. देहस्वरुपांत सुख हे टिकणारे नाहीं. ।।26।।

वपुरनेक युक्तं हि स्वात्मा नित्योद्वयः सदा।।
तयोरैक्यं प्रपश्चन्ति किम ज्ञानमतः परम्‌।। 27।।
अर्थ—— शरीर हे अनेक तत्वांनी भरलेले असून आत्मा अद्वय आणि एकच एक आहे. त्याचे शरीराशी एकरुपत्व बघणे हे काय मोठे ज्ञान झाले. ।।27।।

वपुर्जुगुप्सितं हेयं स्वात्मा प्रियतमो शुचिः ।।
तयोरैक्यं प्रपश्चन्ति कित ज्ञानमतः परम्‌‌।।28।।
अर्थ—— शरीर हे घृणास्पद आहे आणि आत्मा हा निर्मल आहे. त्याचे एकत्व मानणे हे काय ज्ञान झाले, अर्थात ह्‌‌यातच सर्व अज्ञान स्पष्ट झाले.।।28।।

वपुर्जन्मजरायुक्त स्वात्माजोजड एव हि।।
तयोरैक्यं प्रपश्चन्ति किम ज्ञानमतः परम्‌‌।।29।।
अर्थ—— शरीर हे जन्म आणि वृध्दत्वाने युक्त आहे. आणि आत्मा हा अजन्मा आणि चैतन्यमय आहे. त्यांना एकच समजणे ह्‌यांत का शहाणपण आह।।29।।

वपुर्विकारयुक्तं हि स्वात्मा विकार वर्जितः।।
तयोरैक्यं प्रपश्यन्ति किमाश्चर्यमतः परम्‌ ।।30।।
अर्थ—— शरीर हे विकारयुक्त आणि आत्मा हा अविकारी आहे. आणि त्यांना एकच समजणे हे किती आश्चर्यकारक आहे. ।।30।।

वपुर्बाह्यं नियम्यञच स्वात्मा तस्य नियामकः।।
तयोरैक्यं प्रपश्यन्ति किम ज्ञानमतः परम।।31—32।।
अर्थ—— नियम्य म्हणजे ज्यावर नियंत्रण ठेवता येतेे ते. तर हे शरीर म्हणजे आपल्या नियंत्रणांत ठेवता येते. (अर्थात आत्म्याला त्यावर नियंत्रण ठेवता येते.) अर्थात आत्मा त्याचा नियंत्रक असतो. शरीर हे त्यांच्या ताब्यात असणारे एक यंत्र असते. साधन असते. ह्‌या दोघांचे शरीर व आत्मा एक्य आहे. असे समजणे हे काय मोठे ज्ञानी म्हणावे. ।।31—32।।

वपुर्दृश्यं मृत्युयुक्तं स्वात्मादृश्य लदाव्ययः।।
तयोरैक्यं प्रपश्यन्ति किम ज्ञानमतः परम्‌‌।।33।।
अर्थ—— शरीर हे मृत्यु सहित आहे. हे दृश्य स्वरुप आहे. आत्मा हा अदृश्य असून त्यातच राहणारा आहे. आणि आत्म्याला आणि शरीराला एकच समजणे हे काय शहाणपणाचे आहे. अर्थात नाहीं. ते मूढपणाचेच आहे. ।।33।।

वपुस्त्वङमांसयुक्तं हि स्वात्मानंदः स्वयं प्रभः।।
तयोरैक्यं प्रपश्यन्ति कि माश्चर्यमतः परम्‌।।34।।
अर्थ——शरीर हे त्वचा, मांसयुक्त आणि आत्मा हा स्वयंप्रकाशी आहे. त्या दोघांना एकच मानणे हे काय मोठ्‌या ज्ञानी पण्डिताचे काम आहे. ।।34।।

सुखं न देहजं क्वापि स्वात्मैव सुखरुपकः।।
परस्पराध्यासतश्च सुखं देहाद्विभासते।।35।।
अर्थ—— स्वात्मा हा स्वतः सुखरुप आहे आणि शरीरापासून मिळणारे सुख त्यांत कोठल्याही प्रकारे होत नाहीं. ते केवळ भ्रमाने तसे परस्पर एकत्व आहे, असे वाटते. ।।35।।

आयोगो यथा नाग्नि देहो न सुखरुपकः।।
अयोगोलो ज्वलत्येव वाक्यवत्स्यात्सुखं वपुः।।36।।
अर्थ—— एखादा लोहगोल हा तप्त ठेवून लाल झाल्यावर स्वतः अग्नि नसतो. पण अग्निच्या संपर्कात आल्यामुळे अग्निसारखा भासतो. त्या प्रमाणे हा देह सुखरुपच आहे, असे (आत्मसंपर्कामुळे) भ्रमाने वाटते ”लोखंडाचा” गोळा जळतो, ह्या वाक्या प्रमाणे शरीराला सुखरुप असे म्हटले जाते. ।।36।।

अन्नविकारो जातं मलमांसैश्च रुपितम्‌।।
पञचभौतिकमेवेदं वपुरात्म सुखं न हि ।।37।।
अर्थ—— अन्न हे विकार उत्पन्न झाल्यावर स्वरुप बदलते. खाल्यानंतर अन्नाचे पचन होवून मल मांस आदि मध्ये रुपांतर होते. तसेच पंचमहाभूतांचे रुपांतर होवून हा देह बनतो. अर्थात ते विकारी आहेत. पण तसेच आत्मतत्व अविकारी असतो. ।।37।।

देह देहि विभागैक परित्यागेन भावना।।
देहमात्रे हि विश्वासः सङगोबन्धाय कथ्यते।।38।।
अर्थ—— देह (शरीर) आणि देही (आत्मा) हे एकच आहेत असा भ्रम उत्पन्न होतो. देह हा संग उत्पन्न झाल्यामुळे त्याचा (आत्म्याचा) विळखा उत्पन्न होतो. तो बंधना सारखा असतो आणि आम्हास देह म्हणजेच आत्मा असे वाटू लागतो. ।।38।।

देहे यावदहं भावो दृश्येस्मिन्यावदात्मता।।
यावन्ममेदमित्यास्था तावच्चित्तादि विभ्रमः।।39।।
अर्थ—— जो पर्यन्त ह्या देहामध्ये अहंभाव आणि दृश्यस्वरुपी देहामध्येच आत्मा आहे. एकत्वाची भावना आहे. तो पर्यंत मी आणि माझे ही भावना राहते. आणि तो पर्यन्त चित्ता चा विभ्रम मी म्हणजे माझे शरीर अशी भावना दृढ होते. ।।39।।

देहेन्द्रियेष्वहम्भाव इदं भावस्तदन्तिके।।
यस्य नो भवतः क्वापि स जीवन्मुक्त इष्यते ।।40।।
अर्थ—— देह आणि इन्द्रियांमधील मोहयुक्त मी आणि माझे हा भाव ज्याचा नष्ट झाला तो जीवनमुक्तच झाला. त्याला हा भाव कोठेच उत्पन्न होत नाहीं. ।।40।।

देहेन्द्रियेष्वहम्भाव इदं भावस्तदन्तिके।।
तावद्वि विषयासक्तिः कामोपि हि प्रजायते ।।41।।
अर्थ—— देह आणि इंन्द्रिये ह्या ठिकाणी अहंभाव, हेच मी आणि मोझे अशी पक्की समजूत झाली की त्यातूनच काम आणि क्रोध उत्पन्न होतो. विषयांमध्ये आसक्ति निर्माण होते. ।।41।।

कामेन विषयाकांक्षा विषयात्काममोहितः।।
द्वावेव सन्त्यजेन्नित्य निञजन मुपाश्रयेत्‌।।42।।
अर्थ—— काम उत्पन्न झाला म्हणजे सर्वच इन्द्रिय वासना निर्माण होतात. आणि मग सर्व विषयांचा भोग घेण्याचा मोह निर्माण होतो. परंतु ह्या दोन्ही मोहांचा त्याग करुन नित्य अक्षय अश्या ब्रह्मतत्वाचा आश्रय ध्यावा, त्याचे ध्यान करावें. ।।42।।

देहस्याप्रिय दुर्गन्धो भवत्यति प्रियङकरः।।
दुप्रेक्ष्यं हि सुरुपञच कामावेशोयमीदृशः।।43।।
अर्थ—— काम विषयाचा प्रादुर्भाव उत्पन्न झाल्यानंतर अप्रिय असा दुर्गंध पण चांगला वाटू शकतो. आणि जे रुप अत्यंत साधारण असते ते सुध्दा चांगले वाटू लागते. असा कामाचा प्रभाव असतो. ।।43।।

विषाश्चामृतद्‌‌भाति निर्मलञच मलं वपुः।।
भोग दुःखं सुखं चेति कामावेशोयमीदृशः।।44।।
अर्थ—— वीषसुध्दा अमृतासारखे वाटते आणि अमंगळ असे शरीर पण अत्यंत निर्मल आणि सुंदर वाटते. भोग दुःख हे पण सुखाचेच वाटतात. असा हा कामाचा प्रभाव आहे. ।।44।।

अधर्मो धर्मवद्‌भाति त्वन्यायो न्याय एव हि।।
आत्पश्च शत्रुवद्‌भाति कामावेशोयमीदृशः।। 45।।
अर्थ—— अधर्म व कर्तव्यहीनता हेच धर्म आणि कर्तव्य वाटू लागतात. अयोग्य अन्याय हेच योग्य व न्याय वाटु लागतात. आप्तेष्ठ व नातेवाईक हे शत्रुसारखे वाटू लागतात. असा हा कामप्रभाव आहे. ।।45।।

न भयं नापि लज्जाच बहृधैर्यं कुकर्मता।।
अतीवान्मत्ता चापि कामावेशोयमीदृशः।। 46।।
अर्थ—— भय लज्जा रहात नाहीं. दुष्कर्म करण्याची कांही लाज न वाटता तो बेधडक करतो व उन्मत्त मनाने धीट होतो. ।।46।।

विस्मारयति सम्बन्धं भोगभोग्यं न वेत्ति च ।।
विवेको लुप्यते यस्मात्‌ कामावेशोयमीदृशः।। 47।।
अर्थ—— आपले संबंध कसे कोठे आहेत कसे योग्य आहेत हे विसरुन तो कसा ही वागतो तसेच कोणच्या विषयाचा कसा उपभोग ध्यायचा हे विसरुन तो कसाही वर्तन करतो. असा हा कामप्रभाव आहे. ।।47।।

भीषयन्संस्थितोप्यग्रे मृत्युश्चापि मृतायते।।
महिषी कामयेन्मूढः कामावेशोयमीदृशः।। 48।।
अर्थ——परिणामी जे भीषण आहे, मृत्यु सुध्दा त्याला विस्मृत होतो. असा मूढ मृत्यु समीप आला तरी एकाद्या राणीची म्हणजे परत ग्रहस्थी बसविण्याची इच्छा करतो.।।48।।

सुपुण्यं हि स्वर्गोपि नरकायते।।
चाण्डाली चापि ग्राह्येव कामावेशोयमीदृशः।।49।।
अर्थ—— चांगले पुण्यदायक कर्म जे मंगल आणि पावन असते, तेही त्यास नरका समान हीन वाटू लागते आणि अगदी हीन चाण्डाल अशी व्यक्ति किंवा गोष्ट पण त्यास ग्राह्य वाटू लागते.।।49।।

यां प्रजार्थन्तु काम ईंशेन निर्मितः।।
न विधिर्न निषेधोस्य दुष्टांनां स्थितिरीदृषी।।50।।
अर्थ—— ज्या कल्पनेने की “प्रजोत्पादन होईल“ ह्या हेतुने ईश्वराने “काम“ निर्माण केला परंतु त्याचे विधि योग्य उपयोग आणि निषेध (अयोग्य उपयोग) हयांस छपरावर बसवून दुष्टांनी अशी स्थिति निर्माण केली.।।50।।

कामश्चार्धबलः स्याद्वि विधितस्तस्य सेवने।।
न्यासिनां ज्ञानवैराग्यात्‌‌ समूलोयं विनश्यति।।51।।
अर्थ—— काम हा अर्धविकसित अश्या बलाने विद्यमान होतो. जेंव्हा विधियुक्त रीतीने त्याचे सेवन केले जाते आणि अश्या संयमी व्यक्तिचेे साधनेने जेव्हां वैराग्य उत्पन्न होते, त्यानंतर त्याचे उच्चाटन होते. ।।51।।

कार्यनाशाद्‌‌भवेच्चिन्ता नाशोस्माद्‌‌वासनाक्षयः।।
वासना प्रक्षयो मोक्षः सा जीवनमुक्ति रुच्यते।।52।।
अर्थ—— कार्याचा नाश झाल्यानंतर चिन्ता उत्पन्न होते. कामनाश झाल्यावर वासनाक्षय होतो. वासनामुक्ति हीच मोक्ष प्राप्ती आणि त्यालाच जीवन मुक्ति असे म्हणतात. ।।52।।

निषिध्द कर्मणा कामो दावाग्निर्वायुना यथा।।
विवर्धते परं भूयो दुर्गतेः कारणं भवेत्‌‌।।53।।
अर्थ—— निषिध्द कर्मे करुन काम तसाच फोफवतो ज्या प्रमाणे वायुमुळे दावानल जंगलात लागलेली आग झपाट्‌याने फैलते आणि त्याच प्रमाणे तो मोठया भीषण दुर्गतीला जन्म देतो. ।।53।।

नरकोप्यपकीर्तिश्च दारिद्रयं रोगः सम्भवः।।
वर्धिष्णुर्भोगदाहोस्य शामेन्नष्टेन्द्रियोपि नो ।।54।।
अर्थ—— नरक, दुर्गती, अपकीर्ति, रोगोत्पत्ति भोग ह्‌या पासून हा काम असा दाह निर्मित करतो की आपली इन्द्रिये नष्ट झाली तरी हा शमित होत नाहीं. ।।54।।

निस्तेजश्च निरुत्साही निरानन्दोति दुर्गतिः।।
अशान्तो दुर्जनश्चैवं भवति व्यभिचारतः।।55।।
अर्थ—— व्यभिचार अवैध रीतिने कामवासनेची पूर्ति केल्यास त्या व्यक्तिची अशी दशा होते की तो निस्तेज, निरुत्साही, आनंदरहित, दुर्गतिप्राप्त, अशान्त, क्रोधी दर्जन असा होतो. ।।55।।

कामो धावति सर्वत्र मदोन्मत्तगजेन्द्रवत्‌‌।।
ज्ञानाङकुशे समुत्पन्ने तीव्रं विभ्यत्यसौ तदा ।।56।।
अर्थ—— मनोन्मत हत्तीसारखा हा काम सर्वत्र सैरावैरा धावतो, ज्ञानरुपी अंकुश लावूनच त्याला नियंत्रित करता येते. ।।56।।

गृहेस्थेविधि युक्तेसोै भ्रष्टेसाविहितो भवेत्‌‌।।
कीदृशोपि भवेत्याजस्तीव्रं सौम्य विषं यथा।।57।।
अर्थ—— गृहस्थ सुध्दा विधियुक्त वागून सुध्दा जर भ्रष्टबुध्दि होवून कुमार्गाला लागला तर ते सुध्दा सौम्य विषपान केल्यासारखेच होइल. विष हे सौम्य असो किंवा तिव्र असो ते त्याज्यच आहे. ।।57।।

विहाय विधिगस्यात्र वरं विध्युक्तसेवनम्‌‌।।
तस्मादपि वरस्त्यागस्त्यागात्‌ कैवल्य मश्रुते।।58।।
अर्थ—— अशा अवैध सेवनापेक्षा विधियुक्त सेवन बरे ! आणि त्यापेक्षा त्यागच श्रेष्ठ आहे. आणि त्यागानेच कैवल्य सुखाचा आनंद घेता येतो।।58।।

अशेषेण परित्यागो वासनानां स उत्तमः।।
मोक्ष इत्युच्यते सद्‌‌भि स एव विमलक्रमः।।59।।
अर्थ—— सर्व वानांचा परित्याग करुन जेंव्हा त्या समाप्त होतात, तीच अवस्था उत्तम म्हटली जाते. संतानी त्यालाच पवित्र मार्ग म्हणून “मोक्ष“ असे सम्बोधिले आहे. ।।59।।

स्त्रीकामौ द्रव्यकामश्च द्वावेतावेकलक्षणौै।।
कर्याकार्यविवेकस्य लोपस्यादुभयोः समः।।60।।
अर्थ—— स्त्रीविषयक इच्छा दारेषणा आणि धनविषयक कामना ह्‌या दोन्हीही एक लक्षणीच आह.े. हयांची इच्छा झाल्यानंतर कार्य आणि अंकार्य न करण्या सारखे काय ह्‌याना विचारच रहात नाहीं. त्या दोन्ही इच्छामध्ये विवेकाचा लोप होतो. ।।60।।

वन धनानि महीपानां ब्राह्मणाः क्व जगन्ति वा।।
कोटयो ब्राह्मणा याता भूपा नष्टा परागवत्‌‌।।61।।
अर्थ—— कोटयावधी धनवान राजे आणि अगणित ब्राम्हण हया जगांत आले आणि गेले. जसे असंख्य परागकण नष्ट होतात. तसे ते गेले. ।।61।

अन्यथेच्छा स्वरुपो हि कामः प्रोक्तो मनीषिभीः।।
सत्यस्वरुप बोधेन निरिच्छः सन जयेदिमम्‌‌।।62।।
अर्थ—— विद्वान पण्डितांनी कामास अन्येच्छा दुसर्‌‌यापासून सुख मिळविण्याची इच्छा हयास हया स्वरुपाचा मानला आहे. आत्मज्ञानाचा बोध स्वयंप्रकाशी असून आत्मज्ञान झाल्यावर कामाचा पराभव करुन आपणास विजयी होता येते. ।।62।।

गुरुतो ज्ञानवैराग्यं गुरुतस्तत्वदर्शनम्‌‌।।
गुरु ही मुक्तिदं मत्वा जयेत्कामं सुसाधकः।।63।।
अर्थ— गुंरुपासूनच आत्मज्ञान प्राप्त होते. वैराग्याचे ज्ञान होवून गुरुमुळेच तत्वज्ञानाचे सार कळते. गुरुच मुक्तिदाता असतात, म्हणून जो चतुर साधक आहे त्याने हे जाणूनच कामावर विजय प्राप्त करुन घ्यावा. ।।63।।

तीर्थ गुर्वाश्रमें वासो गुरुसेवापरं तपः।।
गुरुकृपां गतिं मत्वा जयेत्कामं सुसाधकः।।64।।
अर्थ—— गुरुंचे आश्रमांत निवास करणे हे तीर्थाटनच समजावे. गुरुंची सेवा करणे म्हणजे मोठे तपच मानावे. आणि गुरुकृपा झाली म्हणजे परमगतीच मिळाली असे समजून साधकाने कामशत्रुला जिंकावे. ।।64।।

उष्णाहाराच्च पानाच्च तथैवात्यशनादपि।।
कामस्यास्य जनिं मत्वा जयेत्कामं सुसाधकः।।65।।
अर्थ—— उष्ण आहार आणि उष्ण पेय तसेच अति आहार ह्‌यापासून काम उत्पन्न होतो, हे समजून सुजाण साधकाने आपल्या कामावर जय मिळवावा. ।।65।।

संङकल्पप्रभवः कामो निःसंङकल्पात्‌‌ प्रणश्यति।।
निःसंङकल्पं सुखं मत्वा जयेत्कामं सुसाधकः।।66।।
अर्थ—— संकल्पातूनच म्हणजे कामना इच्छां मधूनच ”कामा” ची उत्पत्ति होते आणि जर कामनारहितता उत्पन्न झाली तरच ”काम” हा नष्ट होतो. म्हणूनच निःंसकल्प बनूनच चतुर साधकाने कामावर जय मिळवावा ।।66।।

सप्तधातुमयं देहं विकाराकारदुःखद्‌‌म।।
शववच्च जडं मत्वा जयेत्कामं सुसाधकः।।67।।
अर्थ—— सप्तधातुंपासून उत्पन्न हा जड देह आहे, असे जाणून आणि विकार आणि आकारापासून दुःख देणारा आणि ”शव” म्हणजे मृतशरीाप्रमाणेच हा देह जाणून हुशार आणि जाणकार तापसाने कामावर जय मिळवावा. ।।67।।

रजसो रेतसो जातं नकायतनं वपुः।।
तद्‌‌भोग नरकं मत्वा जयेत्काम सुसाधकः।।68।।
अर्थ—— रजस आणि रेतस्‌ पासून उत्पन्न होणारी नरकाचे घर अशी ही तनु आणि त्यांत आनंद देणारे भोग म्हणजे नरकच, हे समजून चतुर साधकाने कामावर जय मिळवावा. ।।68।।

समीचीनद्‌‌गुद्‌‌भूतो दोषद्‌ष्टया विनश्यति।।
भोगं दोषास्पदं मत्वा जयेत्कार्म सुसाधकः।।69।।
अर्थ—— दृष्टी चांगली असतांना जर त्यांत दोष (काम विकार)उत्पन्नझाला तर त्या व्यक्तिंचा कामामुळे नाश होतो. (काम हा दृष्टी टाकल्यावर उत्पन्न होतो) आणि भोग म्हणजे त्यापासून मिळणारा आनन्द उत्पन्न झाला तर तो सुध्दा दोष पूर्णच ध्रकःअसतो, हे ताडून साधकाने तत्पर राहून त्यावर नियंत्रण ठेवून जय मिळवावा. ।।69।।

अनित्यानि शरीराणि सुखभासो न शाश्वतः।।
अन्यन्नित्यं सुखं मत्वा जयेत्कामं सुसाधकः।।70।।
अर्थ—— शरीरे ही नश्वर आहेत आणि त्यांतील हे सुख पण नश्वरच आहे. म्हणन अन्य जे शाश्वत नित्य चिदानंद रुप सुख आहे ते ते ओळखून साधकाने सुखी व्हावें। ।।70।।

आभासमात्रदेहोयं मिथ्यैव स्वप्नदेहवत्‌‌।।
नित्यानित्यविवेकाच्च जयेत्कामं सुसाधकः।।71।।
अर्थ—— आभासरुपी देह हा जो आपणांस भ्रमामुळे अगदी आपला वाटतो, अगदी केवळ स्वप्नवत्‌‌ म्हणजे स्वप्न आपल्याला कांहीकाळ दिसते आणि ते आपल्याला अगदी खरेच वाटते परंतु जाग आल्यावर ताबडतोब समजते कीं अरे ! ते तर अगदी खोटेच आपल्या डोळयांपुढे दिसते. (जेंव्हा कीं खरी नेत्रेन्द्रिय ही ह्‌या शरीरात निद्रितावस्थेत बन्दच असतात) आणि ते सर्व नुसतेभास मात्रच होते! म्हणून नित्य आणि अनित्य अर्थात चिर आणि अचिर काय आहेत ह्‌याचा नीट विचार करुनच ह्‌या कामरुपी शत्रुवर विजय प्राप्त करावा. ।।71।।

प्रजोत्पत्यर्थमेवायं कामस्तु न हि मुक्तये।।
भिन्नमात्मसुखं मत्वा जयेत्कामं सुसाधकः।।72।।
अर्थ—— प्रजोत्पत्तीसाठीच काम आहे. ह्‌यातून कांही मुक्ति मिळणार नाहीं. आत्मसुख हे वेगळेच आहे, हे जाणून चतुर साधकाने काम विकारास जिंकावें. ।।72।।

दृश्यं नास्तीतिबोधेन स्वात्मानन्दस्वरुपतः।।
न स्त्री नैव पुमान्‌मत्वा जयेत्कामं सुसाधकः।।73।।
अर्थ—— आपले आत्मज्ञान आत्म्याचे स्वरुप जाण्ूान जो आनंद होतो तो दृश्यस्वरुपाचा नाहीं. म्हणून स्त्री किंवा पुरुष हा भेद आपल्या दृष्टीत न ठेवता, कुशल साधकाने कामावर विजय मिळवावा. ।।73।।

दृश्यं ह्यदृश्यतां नीत्वा स्थित्वा स्वानन्दमात्रतः।।
भिन्नाभावं हि कृत्वैवं जयेत्कामं सुसाधकः।।74।।
अर्थ—— आपल्या स्वानंदरुपात स्थित होवून आणि दृश्य जेआहेत्याला दृष्टीआड करुनच (समाधी अवस्थेत पाऊल ठेवून) एका वेगळयाच नीरव शांततेचा अनुभव घेवून काम विकारावर जय मिळवावा. ।।74।।

कार्यभावात्कामजनिः कार्याभावाद्विनानम्‌‌।।
कार्यशून्यात्मभावेन जयेत्कामं सुसाधकः।।75।।
अर्थ—— कार्यभाव म्हणजे एक प्रकारे अहं तत्वामध्ये लिप्त होणे. आसक्तियुक्त कार्य केल्याने काम विषयाची उत्पत्ती होते आणि आसक्ति रहित कार्य केल्याने विकाराची अनुपत्ति होते. म्हणून साधकाने कार्यशून्यत्व (मी हे केलेच नाही असे समजून म्हणजे कर्ता करविता तो. परमेश्वर आह)े ह्‌या दृढभावनेने प्रत्येक हालचाल केल्यास काम शत्रुवर जय मिळवावा. ।।75।।

ब्रह्मयर्चाद्विना नैव मोक्षप्राप्तिः कदाचन।।
छान्दोग्येस्पष्टमुक्तं यद्‌ ”ब्रह्मचर्य” सताङगतिः।।76।।
अर्थ—— ब्रह्मचर्य पालन केल्याशिवाय कधीी मोक्षप्राप्ती होणार नाही . छांदोग्य उपनिषदांत हे स्पष्ट केले आहे. की ब्रह्मचर्य हीच संताची गति आहे. ।।76।।

ब्रह्मप्राप्तितरोर्मूलं ब्रह्मचर्यमितीयते।।
ब्रह्मचर्यं विना न स्यात्‌‌ कस्यापि ब्रह्मधीः कदा।।77।।
अर्थ—— ब्रह्मप्राप्तीरुपी वृक्षाचे मूळ हेच ब्रह्मचर्य आहे. ब्रह्मचर्य विना कुणाचीही बुध्दि ब्रह्मतत्वाचे ज्ञान प्राप्त करण्यासाठी क्रियाशील होणार नाहीं. ।।77।।

ब्रह्मचर्येण सन्तिष्ठेदप्रमादेन साधकः।।
दर्शनं स्पर्शनं केलिः कीर्तनं गुह्यभाषणं।।78।।
संङकल्पोध्यवसायश्च क्रियानिवृत्तिरेव च।।
एतन्मैथुनमष्टांङगं प्रवदन्ति मनीषिणः।।79।।
अर्थ—— ब्रह्यचर्यपालन करतांना साधकाला कांही दोष अर्थात्‌ चुका करण्या पासून सावधान रहावे लागेल. त्या म्हणजे स्त्रीयांचे दर्शन, स्पर्श, त्यांज बरोबर क्र्रीडा करणे, त्यां बरोबर एकांतातंत बोलणे, त्यांची इच्छा धरणे आणि त्यांचा संग करणे, तसेच त्याने गुणगान कीर्तन करणे हे आठ प्रकारचे मैथुन विद्वानांनी सांगीतले आहे. संकल्प इच्छा आणि त्या संंधात दीर्धोद्योग अर्थात, अध्यवसाय ह्‌या पासून निवृत्ति झाली पाहिजे. ।।78।79।।

विपरीतं ब्रह्मचर्यमनुमष्ठेयं ममुक्षुभिंः।।
ब्रह्मचर्यं जीवनं स्यान्मोक्षमार्गानुगामिनाम्‌‌।।80।।
अर्थ——ममुक्षुसाधकांकडून ह्‌याच्या विपरित वर्तन करणे जरुरी आहे. ब्रम्हचर्य हेच त्यांचे जीवन आहे. ज्यांना मोक्षमार्गावर अग्रेसर होणे आहे. ।।80।

कायेन मनसा वाचा सवा्रवस्थासु सर्वदा।।
स्त्रीमात्रे मातृभावो ही ब्रह्मचर्यमितीर्यते।।81।।
अर्थ—— मुमुक्षुसाधकांकडून ह्‌याच्या विपरीत वर्तन करणे जरुरी आहे. ब्रह्मचर्य हेच त्यांचे जीवन आहे. ज्यांना मोक्षमार्गावर अग्रेसर होणे आहे. ।।81

द्वितीयाभावतो नैव द्वितीया सम्भवः क्वचित्‌‌।।
द्वितीयाभावतः कुत्र स्त्रीभावस्य जनिर्भवेत्‌‌।।82।।
अर्थ—— काया,वाचा आणि मनाने सुध्दां सर्व अवस्थांमधील स्त्रीयांविषयी एक मातृभावच असणे ह्‌यास ब्रह्मचर्य म्हटले आहे. ।।82।।

”सर्व पुरुष एवेद” श्रुतिर्वक्तिः यतः स्वयम्‌‌।।
कुत्र स्त्री, कस्य तद्‌भावो भ्रान्तिरेव हि स्त्री मता।।83।।
अर्थ—— श्रुतिने स्वतः हे वचन उधृत केले आहे कीं सर्व पुरुषाय इदम्‌‌ अर्थात्‌‌ सर्व चैतन्यमयतर्त्वार्त पुरुष म्हणजे सच्चिदानंद तत्वच भरलेले आहे अर्थात विद्यमान आहे. तर मग कोठली स्त्री? आणि कोण कुठला भाव? सर्व भ्रान्तिच आहे. ।।83।।

अद्वयब्रह्मरुपोयं नित्यानन्दोखिलेष्विति।।
ब्रह्मभावे मनश्चारी ब्रह्मचर्यमितीर्यते।।84।।
अर्थ—— अद्वय म्हणजे मी एकच, दूसरे कोठले तत्व नाही. असा भाव जो असतो त्यालाच नित्य आनंद सर्वत्र भरला आहे, असे म्हणतात. आणि ह्‌या ब्रह्मरुप भावनेने जो विचरण करतो त्यासच ब्रह्मचारी असे म्हणतात. ।।84।।

इति श्रीसमर्थरामदासासानुगृहित श्रीरामपदपंङ्‌‌कजभृङगायमान श्रीमत्परमहंस परिव्राजकाचार्य भगवता श्री श्रीधरस्वामिना विरचिते मुमुक्षुसखः ग्रन्थे देहनुगुप्सितत्वं तथा कामनिन्दानाम सप्तम प्रकरणं सम्पूर्णम्‌‌।

home-last-sec-img