Literature

देह आत्मा नव्हे

तत्सृष्टा तदेवानुप्राविशत् । (तै. ) स इह प्रविष्टः आनखाग्रेभ्यः ।

( वृ.) इत्यादि उपनिषद्वाक्यांधारें देह निर्मून देहांत आत्मा प्रवेश करतो व देहाच्या नखशिखांत व्यापून असतो असे स्पष्ट होतें. कठोपनिषदांत हा आत्मा देह, इंद्रिय, मन, बुद्धि यांपेक्षां भिन्न आहे हे सांगण्याकरितां, देहाला रथाची, बुद्धीला सारथ्याची, मनाला लगामाची व इंद्रियांना घोड्यांची उपमा दिली आहे. या आत्म्याला यांच्या संगसंबंधांनीच शब्दादि विषयद्वारा मृत्युलोकाचा प्रवास, कर्तृत्वादि, भोक्तृत्वादि, आगंतुक लक्षणें व अनात्म देहादि विशिष्टोपाधि, यांचा कल्पित संबंध जडत असतो आणि असा इंद्रिय-मनांनी युक्त आत्माच भोक्ता होतो, असे सांगितले आहे. ती काठक श्रुति अशी.

आत्मानं रथिनं विद्धि शरीरं रथमेव तु । बुद्धिं तु साराथी विद्धि मनः प्रग्रहमेव च ॥

इंद्रियाणि हयानाहुर्विषयांस्तेषु गोचरान् । आत्मेन्द्रियमनोयुक्तं भोक्तेत्या हुर्मनीषिणः ॥

(कठ. अ. १ मंत्र ३-४)

या कठोपनिषदांतील दुसऱ्या दोन वाक्यांचा अर्थ पाहूं.

home-last-sec-img