Literature

धर्ममूळ वेद

वेदापासून सृष्टि झाली असल्यामुळे, सकळ सृष्टीचा मूळ धर्मग्रंथ वेद होय, हें ओघानेंच सिद्ध होतें; साऱ्या विश्वाचाच हा वैदिक धर्म आहे हें मनाला पटतें.

वेदोऽखिलो धर्ममूलम् ॥ स्मृतिशीले च तद्विदाम् ॥ 

आचारश्चैव साधूनामात्मनस्तुष्टिरेव च ॥ ( म. स्पृ. अ. २-६ )

संपूर्ण धर्माचें मूळ वेद होय. वेद, वेदानुसारी स्मृति, वेदस्मृतिवेत्या महात्म्यांचा सदाचार, आत्मसंतोष, हींच या धर्माचीं प्रमाणें होत, असें दुसऱ्या अध्यायाच्या सहाव्या श्लोकांत मनूनें सांगितले आहे. या धर्मांत एकंदरौत सदा चाराला फार महत्त्व आहे. सदाचारच याचें जीवन आहे.

श्रुतिस्मृत्युदितं धर्ममनुतिष्ठन्हि मानवः । 

इह कीर्तिमवाप्नोति प्रेत्य चानुत्तमं सुखम् ॥ ( मनु. २-९)

हाहि श्लोक मनुस्मृतीचाच आहे. श्रुतिस्मृतींनी निर्णित केलेला धर्म मानवाचला, या लोकांत कीर्ति व मरणोत्तर अमित सुखहि त्याला प्राप्त होतें, असा या श्लोकाचा अर्थ होतो. या श्लोकांतील ‘मानवः ‘ हा शब्द आखिल मानवजातीलाच उद्देशून आहे, असे सर्वांना कळून येण्यासारखें आहे. यावरून ‘श्रुतिस्मृत्युक्त धर्म’ हा आखल मानवांचा धर्म होय, असे

स्पष्ट होते. जिवंत असे तोपर्यंत सर्व दृष्टीनेंहि स्तुत्यजीवन होऊन मरणोत्तर अनंत सुखाचव्हावी म्हणून निसर्गतः ज्या कोण्या मानवाला वाटतें, त्यानें या श्रुतिस्मृत्युक्त धर्माचा अवलंब करावा, असे येथें ध्वनित होतें.

श्रुतिस्तु वेदो विज्ञेयो धर्मशास्त्रं तु वै स्मृतिः । ते सर्वार्थेष्वमीमांस्ये ताभ्यां धर्मो हि निर्वभौ ॥ (मनु. २ १० )

श्रुति हें नांव वेदाला आहे व धर्मशास्त्र हें नांव स्मृतीला आहे. वेद स्मृतीपासूनच धर्म निर्माण झाला. वेद हा जनक व तदनुसारिणी स्मृति, ही धर्माची जननी होय. त्यामुळे धर्माच्या विषयीं तर्क करावयाचाच झाल्यास तो या वेदस्मृतींना अनुकूल असाच केला पाहिजे. निःसार आणि गलिच्छ विषयसुखाच्या घाणेरड्या वासनेतून, आपली

कायमची सुटका व्हावी असे ज्याला वाटतें, तो परमात्मपदाचा अधिकारीच, या धर्माचे प्रीतीने अनुष्ठान करतो. अशाकरितांच हा धर्म आहे. अशांनीच या धर्माचे अनुष्ठान करावें. विषयवासनेचा ओढा या धर्माच्या आचरणानें कमी होतो. संयमाचा अभ्यास होतो. निर्विषय आत्मसुखाची वासना वाढते. संसारांत सर्वत्र क्षेम लाभतें, अनंतानंत आत्मानंदाचा लाभ क्रमेण होऊन, प्राणी दुःखरूप जन्ममरणांतून कायमचाच सुटतो. वैदिक धर्माची ही महत्ता आहे. वेदाचें हें गौरवास्पद वैशिष्ट्य आहे. रोग्याला अमृतप्राशनासारखें, भवरोग्यांना या धर्माचे आचरण विलक्षण परिणामकारी आहे. कशाहिविषयीं माणसानें या धर्माचें अनुष्ठान निष्ठेनें करावें व दिव्य जीवनाचा देवमाणूस व्हावें. अर्थ कामाच्या मगरमिठीतून अपाय न होऊं देतां हळूच सोडवून, परमपदाची प्राप्ति करून देण्यांत या धर्माचा हातखंडा आहे. या कारणामुळेच याला • सनातन वैदिक आर्य धर्म’ म्हणतात. वेदबीजापासून फोफावलेला अति विशाल असा हा धर्मवृक्ष, वेदबीजाचीच अमृत फळे जगभर पसरवितो. अखिल विश्वालाच निरतिशय आत्मानंदाची प्राप्ति करून देण्यास हा बद्धकंकण आहे. आणि खऱ्या धर्माचेंहि तेंच लक्षण आहे. वेदाची हीच शिकवण आहे. मोठ्यापुढे जाऊन मोठेच मागणे रास्त असे सांगण्याचा हा गर्भितहेतु मनांत ठेऊन या दृष्टीनेंच मनूनें सांगितलें आहे :

अर्थकामेश्वसक्तानां धर्मज्ञानं विधीयते । धर्मे जिज्ञासमानानां प्रमाणं परमं श्रुतिः ॥

यावरून दिसते कीं, निर्विषय आत्मसुखाच्या प्राप्तीने प्राणिमात्र मुक्त होण्याकरिता, प्रत्यक्ष परमात्म्यानेच सांगितलेला हा वेदोक्त धर्म सर्वांनाच अभ्युदय निःश्रेयसप्रद आहे. अर्थकामांच्या ठिकाणी अनासक्त असणाऱ्यासाठी हे धर्मज्ञान आहे आणि धर्म जाणण्याची इच्छा असणाऱ्यांना सर्वश्रेष्ठ प्रमाण म्हणजे एक श्रुतीच होय हा या वरील श्लोकाचा अर्थ.

home-last-sec-img