Literature

धर्मावर गंडांतर

सुमारे साडेतीनशे वर्षापूर्वी हा भारत देश यवनांनी आक्रमिल्यामुळे अतिभयंकर अशा परिस्थितीत होता त्यांचे राज्य सर्व भारतावर झाल्यामुळे सगळीकडे गोंधळ माजला होता. त्यांच्या त्यावेळच्या अमानुष कृत्यांनी भारतीय जनता त्रस्त झाली होती. औरंगजेबासारखा करारी, कट्टर धर्माभिमानी राज्यकर्ता आपले अगणित सामर्थ्य व सामुग्री यांचा आपल्या मनाप्रमाणे वापर करून धर्म दिग्विजयासाठी निघाला होता. हिंदुहा शब्द नावालाही राहू नये अशा हिरीरीने तो बाहेर पडला होता व त्याच्याच रुवाबात वावरत होता. राज्यशासक म्लेंच्छ असल्यामुळे भारतात सर्वत्र अशांतता माजली होती. सनातन धर्मीय भयग्रस्त व स्त झाले होते. सज्जनांच्या हाळास पारावार नव्हता. धर्म रक्षणासाठी पुष्कळ महात्म्यांनी आत्मसमर्पणाची तयारी केली होती. अशा भीषण, घोर व अशांत परिस्थितीत जनतेला नाहि भगवान करणान्या यवनांना वठणीवर आणण्यासाठी त्यांचा निःपात करण्यासाठी व लोकांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठीच श्रीसमर्थांनी अवतार घेतला. ह्या यवनप्रणित हाहाकारा तोंड देण्यास अत्यंत बलिष्ठ अशा श्री समर्थांच्या अवताराचीच आवश्यकता होती. अखिळ भारतीय जनतेचे जीवन चितेने व भयाने व्यथित झाले होते.

केव्हाही कोणते संकट ओढवले जाईल, हे सांगणे कठीणच. विहिरीवर पाणी भरण्यास गेलेली स्त्री पाणी घेऊन घरी परत येईल किंवा नाही याचा वसा नव्हता. तसेच कामासाठी बाहेर पडलेला तवणही घरी परत येईलच याची खात्री देणे अशक्य होते. मोठमोठ्या श्रीमंतांना आपली संपत्तो केव्हा लुटली जाईल हेही सांगणे कठीण होते कोणतीही धार्मिक कृत्ये व विवाहादि मंगल समारंभ निर्विघ्नपणे पार पाडणे महाकठीण. सकाळी दर्शन घेतलेली देवतामूर्ती पुन्हा या ठिकाणी असेलच याचीही खात्री हती अशा भयानक परिस्थितीत अविवेकी व मूर्ख यवनांच्या दुष्कृत्यांनी भारतीय जनतः भयग्रस्त झाली होती. आपण आपल्या ह्या राक्षसी कृत्यांनी सर्वांना वाकवू शकू अशी घमेंड बाळगणान्या यवनांना वठणीवर आणण्यासाठी अतिसामर्थ्यवान, बलिष्ठ नशा श्रीसमर्थांच्या अवताराचीच त्यावेळी आवश्यकता होती.

रामायणाचा अभ्यास केल्यास श्री मारुतीरायांच्या बरो वरीचा शक्तिमान, बुद्धिमान असा दुसरा कोणीही त्यावेळी नव्हता असेच आढळून येते. श्रीमारुतीराय हे श्रीशिवाचे अवतार श्रीशिवाचे कार्य सृष्टी संहाराचे. या जगाचा विनाश त्यांच्या बडूनच होतो. म्हणूनच महाकाल असे श्री शिवास म्हणतात. श्री शंकराकडून दुष्टांशही संहार होत असतो. कारण संहार कार्याचीच देवता श्रीकृष्ण परमात्म्यांनी सज्जनांचे रक्षण आणि छुटांचे निर्दालन या कार्यासाठीच अवतार घेतला होता. म्हणू महाभारतीय युद्धात अर्जुन धर्मयुद्धास विन्मुक्त झाला असता त्यांनी हवास आपल्या वीरावेशाने कालोऽस्मि लोकक्षयकृत्प्रवृद्धः(भ.गी. ११-१२) असे सांगून काल, द्र इत्यादि सर्व रूपे माझीच आहेत असेही त्यांनी भगवद्गीतेत सांगितले आहे. विश्वोत्पत्तिकार्य श्री ब्रह्मदेवाचे, विश्व संरक्षण कार्य श्री विष्णूंचे व संहार कार्य करण्याचे ठरविले तरी ती शक्ती श्रीशंकराचीच असते व एखादेवेळी श्रीशंकरानी अवतार घेऊन जनपालन कार्य करण्याचे ठरविले तरी ती शक्ती श्री विष्णूचीच असते. या त्रैमूर्तीचे आपापले कार्यक्षेत्र निश्चितच आहे. श्री मारुतीरायांनी जो पराक्रम गाजविला त्यास ते एकादश रुद्राचा अवतार होतें हेच मूळकारण होते व त्यामुळे त्यांनी चुटकीसारखे आपले संहार कार्य पार पाडले. श्रीमारुतीराय अत्यंत तेजस्वी, आदर्श अग्रगण्य व सर्व सामर्थ्यवान होते. वल, धैर्य यात त्यांची बरोबरी कोणीही करू शकत नव्हता. त्यांच्यावर शस्त्रास्त्रांचा मुळीच परिणाम होत नव्हता. बुद्धिमत्तां वरिष्ठम् । याप्रमाणे ते बुद्धी व शक्तीत श्रेष्ठ होते. अमोष ब्रह्मचर्ष, अतुल आत्मबल व आदर्श स्वामिभक्तियुक्त असे श्रीमारुतीरायाचे जीवन म्हणजे स्वार्थत्यागाचे मूर्तस्वरूपच ते जनहितदक्ष व महाबलशाली असले तरी विनयशील व स्वामिभक्त होते. यापेक्षा त्यांचे आणखी काय वर्णन करावे ? ते अनुकरणीय अशा सर्व सद्गुणांनी युक्त होते. त्यांच्या जीवनात एकही चूक शोधून काढणे अशक्यच. असे असले तरी त्यांनी आपली बुद्धी, शक्ती व सामर्थ्य यांचा कधीही दुरुपयोग केला नाही. हेच तर महात्म्यांचे व अवतारी पुरुषांचे विशेष लक्षण. जन्मतःच ही लक्षणे दिसत होती. जन्मतःच सूर्याकडे पाहून ते एक फळ असावेअसे समजून ते त्यास घरावयास गेले. हे त्यांच्या साहसी वृत्तीचे उदाहरण होय.यवनांनी सुरू केलेल्या कृष्ण व राक्षसी कृत्यांनी त्राही भगवान झालेल्या भारत देशातील भीती, अंध:कार दुख्ता हो समूळ नष्ट करण्यासाठी सामर्थ्यवान व्यक्ती कोणती ? अशी देव-सभेत चर्चा चालू असता श्रीमारुतीरायच ह्या कार्यास योग्य आहेत त्यांना भूतलावर अवतार घेण्यासाठी पाठविण्यात आले. तेच आपले समर्थ रामदास स्वामी महाराज होत

अवतारी पुरुषाची खूण

श्रीसमर्थ श्रीमारुतीरायाचे अवतार होते हे सिद्ध करण्याच्या दृष्टीने नंत-महंतांचे अवलोकन करणे आवश्यक आहे. अवतरी पुरुषास आपण पूर्वजन्मी कोण होतो या गोष्टीची आठवण असते व ते त्या त्या गोष्टींचा उल्लेख निर निराळ्या प्रसंगी करीत असतात. श्री संत तुकाराम महाराज व श्रीसमर्थ यांच्या यातून हेच सिद्ध होते. श्री तुकाराम महाराजांच्या * पुच्छ ते वळवळे कटिमाजी या एका अभंगातून हे उघड होते. श्रींनीसुद्धा श्रीराम प्रभू व श्रीमारुतीराय हे हे एकच होते हे सिद्ध करण्यासाठी राजाधिराज अवतरला जगदोद्वारा।असे म्हटले आहे. भक्त व भगवंत यात भेद नाही. नारद सूत्रात तस्मिन् तज्जने भेदभावात असे म्हटले आहे यावरून श्रीरामराय व श्रीमती यात भेद नव्हता हे स्पष्ट होते. श्रीरामप्रभूनी कृष्णानदीच्या बाबतीत श्री मारुतीरायांना कृष्णातीरी वास करून नेहमी पादस्पर्शास अनुकूल असे वातावरण ठेवावे असे सांगितले होते. यावरून त्या त्या परिस्थितीत योग्य ती देवता अवतार घेते असे स्पष्ट होते. अशा प्रकारे विचार करीत असता यवननाशासाठी बलिष्ट अ श्रीमती राना अवतार घेणे इष्ट होते व म्हणूनच श्री समर्थ रूपाने त्यांनी अवतार घेतला. श्रीसमर्थांनी निरनिराळ्या प्रसंगीमी मारुतिराय आहेअसे स्पष्ट म्हटले आहे. त्याच्याच पुष्टीसाठी काही उदाहरणे सांगतो.

सातारा जिल्ह्यात शहापूर नावाचे एक गाव आहे. तेथील कुळकर्ण्याची पत्नी सतीबाई ह्या नावाची होती. ती अत्यंत नास्तिक व कजाग होती. दाराशी कोणीही भिक्षेकरी आल्यास त्याला भिक्षा न देता त्याला वाईट साईट बोलावयाची पण श्रीसमर्थांच्या अतुल सामर्थ्याच्या अप्रतिम प्रभावाने व तपोवळाने तिला उपरती झाली. तिला श्रीसमर्थांनी श्रीमारुतीरायाचे स्वरूप दर्शन दिले नसे सांगतात. ती गोष्ट अशी –

सतीबाईचे परिवर्तन

एके दिवशी श्रीसमर्थ सतीबाईच्या घरी मिशेष गेले. श्रीसमर्थांच्या मुखातून रामनामाचा गजर ऐकताच तिला नत्यंत राग आला व ती तोंडास येईल ते बोल लागली. माझ्या भरल्या घरात रामाचे अभद्र नाव का घेतोस ?” असे म्हणून तिने आपल्या हातातील पोतेयाने श्रीसमर्थांना मारिले. त्या वेळी श्रीसमर्थ फक्त हसले व पुढे निघून गेले. नंतर दररोज भिक्षेस बाहेर पडताना प्रथम तिच्या दारी येऊन मग पुढे जावयाचे असा कार्यक्रम सुरू केला व सतीबाईच्या स्वभाव धर्मानुसार तिचाही कार्यक्रम चालू होता. असे चालले असता एके दिवशी काही कारणामुळे तिच्या नवऱ्यास राजाज्ञेवरून अटक झाली. त्यावेळी त्या भागावर बिदरच्या बादशहाचे राज्य होते. श्री समर्थ नेहमी प्रमाणे त्या दारी आले असता नित्याचा गडगडाट व अनुभव मिळाला नाही या गोष्टीचे त्यांना आश्चर्य वाटले व ओसरीवरही कोणी नाही असे पाहून घरात शिरले. अंतर्गृहात घरातील सर्व मंडळी एकत्र व दुःखी बसलेली आढळून आली. त्यावेळी हा काय प्रकार आहे ? याबाबत चौकशी करता नेहमीच्या रागीट व तुसडेपणाचा अभावच आढळला. संकटकाली फक्त परमेश्वरच वाली असतो असे मनात आणून व कोण, कोणत्या वेशाने व निमित्ताने येतो हे कळणे कठीण असा विचार करून सतीबाईने झालेली सर्व हकिकत श्रीसमर्थांना सांगितली. अशावेळी तरी ह्या बाईस देवाची आठवण झाली हे भाग्यच होय, असा समर्थांनी विचार करून त्या स्त्रीस तुझे पती आठ दिवसात घरी सुखरूप आल्यास तू भक्तिने श्रोशमनाम घेशील काय ? तू भक्तीने श्रीरामनाम घेण्याचे केलेस तर तुझे पती आठ दिवसाने घरी परत आणीन असे मी आश्वासन देतो. एवढेच नव्हे तर राजदरबारी त्याचा सन्मानही होईल असे म्हणाले. ते बोलणे ऐकन त्यावर विश्वास ठेवून मी तसे करीनअशी तिने कबुली दिली. कारण विकट परिस्थितीत माणसाचा हटवादीपणा नाहीसा होत असतो. बुडत्याला काडीचा आधारही म्हण आपणा सर्वांना माहित आहेच. असो, अशा रीतीने त्या सर्व मंडळींनी श्री समर्थांच्या धीर देणाऱ्या भाषणावर पूर्ण भरवसा ठेवून त्याप्रमाणे वागावयास निश्चयपूर्वक सुरवात केली. मात्र श्री समर्थाना तुम्ही तुमचे म्हणणे खरे करून दादाएवढीच विनंती केली. त्यावर तुमचे पती बहुमानाने घरी परत येतील असे खात्रीपूर्वक सांगून श्रीसमर्थ बिदरच्या बादशहाच्या दरवारी निघून गेले आणि तेथे आपल्या तपश्चर्येने आत्मबलाने व श्रीरामाच्या अतुल भक्तीने विचित्र घटना सुरू केली. समर्थांनी कुळकर्ण्याच्यावरील आरोपाचे कागद बादशहापुढे हजर करून तो निरपराधी आहे हे आपल्या बुद्धि चातुर्याने सिद्ध करून दिले. त्यांचे भाषण ऐकून बादशहा खप होऊन त्यानेकुळकर्णी निरपराधी आहे. यासाठी त्याला मुक्त करून व त्याचा बहुमान करून त्याचे घरी पोहोचते करावेअशी आज्ञा केली. नंतर कुळकर्णी व श्रीसमर्थ बरोबरच घराकडे येण्यास निघाले. रस्त्यात कुलकर्णी नीआपण कोण आहात ? आपण कोठून व कशासाठी आलात ? आपण माझ्यावर हे उपकार का केलत ? ह्या सर्व गोष्टीचा उलगडा करून आपण आपला परिचय करून द्यावा म्हणजे मी धन्य होईत. तसेच आपल्या ह्या उपकाराची फेड मी कशी करावी तेही कृपया सांगावे असे श्री समर्थांना विचारले. त्यावर मी तुझ्या सासुरवाडीचा गुमास्ता असून त्यांच्या आज्ञेप्रमाणे आलो होतो. इतकेच सांगून श्रीसमर्थ थोड्याच वेळात तेथून नाहीसे झाले. कुळकर्ण्यास ते नाहिसे झाल्यावे आढळताच हे भूत, पिशाच्च, देंवत यापैकी काही तरी असावेअशी शंका येऊन तो घाबरून गेला व छडा लावण्याचा विचार करीत करीत चौकसपणे इकडे तिकडे पहात पहात तो घरी पोहोचला. घरात शिरताच आपल्या पत्नीस तुझ्या माहेरी कोण गुमास्ता आहे बुवा ? त्याने माझ्यावर फार उपकार केलेत. तो कोणत्या गावचा ? तो तुझ्या ओळखीचा आहे काय ? त्याला भेटल्या शिवाय आपल्याला मुळीच समाधान वाटणार नाही. इतकेच काय ? पण भेटल्याशिवाय मी अन्नग्रहण करणार नाही. त्याने मला प्राणदान दिल. खरोखर त्याच्या बुद्धिचातुर्यानेच मी तुम्हास भटू शकलो.अशा प्रकारे कुतुहलाने निरनिराळे प्रश्न केले. त्याचे बोलणे ऐकून त्याची पत्नी गोंधळून जाऊन तुम्ही काय बोलता ! माझ्या माहेरी कोणीही गुमास्ता नाही. तुम्ही काही तरीच बोलता. माझ्या माहेरचे कोणी आले होते हे मुळीच खरे नाही. असे म्हणालो. ते ऐकून अग, तू पाहिले नसशील, सासऱ्यानी असे तो आवर्जून त्यांचा माणूस नक्की पाठविला होताअसे – तो आवर्जून म्हणाला. इतक्यात घरातील एका म्हातारीने कोण असणार ? आपल्याकडे भिक्षेस येतात तेच असतील. त्यांनीच ह्यांना आठ दिवसात परत आणतो असे सांगितले नव्हते का ? असे मध्येच सांगितले. हे ऐकताच तेच असणार | दुसरे कोणीही महात्मे असण्याची शक्यता नाही. त्यांच्या दर्शना-खेरीजमी आता पाणीही विणार नाहीअसे म्हणून कुळकर्णी बसून राहिले. अर्थातच सर्वज्ञ श्रीसमर्थांना ते कळले. सज्जनस्य हृदयं नवीनतम् या सुभाषिताप्रमाणे त्यांना इतरांचे दुःख कसे सहन होणार ? हा गृहस्थ अपाण्यावाचून व्रतवैकल्पासाठी बसल्याप्रमाणे एकाग्र चित्ताने वसलेला पाहून त्यांना त्याची दया आली व ते प्रगट झाले. श्रीसमर्थांना पहाताच घरातील एखाद्या मनुष्याचे गेलेले प्राण परत आल्यावर होणान्या आनंदाप्रमाणेच त्यांना आनंद झाला. मोठ्या आनंदाने त्यांनी श्रीसमर्थांचा पाय पूजादि सत्कार करून त्यांच्या प्रसादाचा स्वीकार केला. श्रीसमर्थ त्यांच्या घरी काही दिवस मुक्कामास होते. मधून मधून ते त्या गावाजवळील टेकडीवर जाऊन बसत असत. त्या टेकडीवर एक गुहा होती व ती आजही आहे.

श्रीसमर्थाकडून मारुतीरूप दर्शन

एके दिवशी कुणालाही न कळत श्री समर्थ त्या गुहेत बाहेर झालेच नाहीत. जाऊन बसले ते तीन चार दिवस बाहेर कुळकण्यांच्या घरची सर्व उहान थोर मंडळी श्री समर्थांचे चरण तीर्थ घेतल्याशिवाय अन्न ग्रहण करीत नसत. श्रीसमर्थ न आल्याने घरातीळ बाळगोपाल मंडळींनीही दूध पिणे बंद केले व सर्वांनाच अवधीत उपास घडले. हे पाहून सतोबाईस वाईट समर्थांच्या शोधासाठी बाहेर पडली. श्रीसमर्थ कोठे असतील ? कोठे बसले असतील ? असा विचार करीत करीत काट्याकुट्यांची पर्वा न करता तिने गावाजवळची सर्व एकांतस्थळे धुंडाळून काढली. दूर अंतरावर गेल्यावर श्रीराम जयराम जय जय राम असा आवाज तीन वेळा ऐकू आला. तो ऐकताच तिला अत्यानंद झाला व श्रीसमर्थ इथेच कोठेतरी असले पाहिजेत, असे म्हणून सहज पुढे गेली.. तेथे श्रीसमर्थांचे दर्शन होताच त्यांच्या चरणावर मस्तक ठेवून आनंदाने त्यांचे पाय धुवन काढले. तिची स्थिती त्यांच्या ध्यानी येऊन त्याती दयेने, बाळ, इतके कष्ट घेऊन इथे कशासाठी आलीस ? तुझा चेहरा तर उतरलेला दिसतोय ? जेवलो नाहीस वाटतं, कशासाठी आलीस ? असा प्रश्न केला. स्वामी | चरणतीर्थ घेतल्याशिवाय अन्नग्रहण करावयाचे नाही असा माझ्या आलेघरातील सर्वांचा नियम आहे. तरी आपण आता घरी येऊन आमच्यावर अनुग्रह करावा!अशी तिने प्रार्थना करताच श्री समर्थांनी मला कि नाही फारच भूक लागली आहे. घरापावेतो येण्याचे माझ्या अंगात त्राणच नाही. तू येथेच स्वयंपाक करून मला जवू घाल. मग भी तुझ्या घरी येईन. असे म्हटले. ते ऐकून येथे स्वयंपाक कसा करणार ? येथे भांडी, धान्य, सरपण तर काहीच नाही. मग स्वयंपाक कसा करायचा ? असे सतीबाई म्हणाली. त्य वेळी श्रीसमर्थांनी हे पहा, त्या समोरच्या दगडाखाली सर्व काही आहे ते घेऊन ये असे म्हणून माध्यान्हाहिक उरकून देवास नैवेद्य दाखविला जेवावयास बसण्यापूर्वी बाळमी आता जेवतो. जेवण संपेपर्यंत तू माझ्याकडे पाहू नकोस कारण तुला भीती वाटेल. ध्यानस्थ बैस.असे तिला सांगून जेवावयास बसले. काही झाले तरी स्त्रीबुद्धी चंचलच. आपल्याला असे का सांगितले ? पाहिले तर काय होईल ? कधीही असे न सांगणाऱ्या बीसमर्थांनी आजच असे का सांगितले ? अशा तिच्या मनात नाना शंका येऊन पाहू या जरा चुकले तर क्षमा करा असे म्हणू.असा विचार करून तिने श्रीसमर्थांकडे हळूच पाहिले. त्यावेळी तिला श्रीसमर्थ श्री मारुतीरायांच्या स्वरूपात दिसले. ती भव्य मूर्ती पहाताच ते तेज सहन न झाल्याने सतीबाई मूछित झाली. हे श्रीसमर्थांच्या लक्षात येताच जेवण संपवून, आचमन करून तिच्या अंगावर तीर्थ प्रोक्षण केले. गुरुही आईच. आपण गुरुमाऊली असे म्हणतोच. मुलाने कितीही चुका केल्या तरी आई त्याला क्षमा करून योग्य ते मार्गदर्शन करीत असतेच. गुरुची अज्ञा उलंघन केल्यास काय होते हे सतीबाईच्या ध्यानी यावे यासाठीच श्रीसमर्थांनी श्रीमारुतीरायाचे रूप धारण केले होते. तुम्हाला आणखी अशीच उदाहरणे सांगतो.

उर्वशीच उरमोडी:- श्रीसमर्थ सज्जनगडावरील ब्रह्मारण्यात तप करीत असता त्यात विघ्न आणण्यासाठी देवेंद्रानी उर्वशीला पाठविले होते. त्यावेळी ते श्रीमारुतीरायाच्या स्वरूपात तिच्यापुढे उभे राहताच ते भयानक रूप पाहून तिचे पाण्यात रूपांतर झाले व तीच आजची उरमोडी नदी.

वेणूताईंना श्रीमारुती दर्शन:- एकदा श्रीसमर्थ स्वयंपाक घरात जेवावयास बसले असता त्यांची शिष्या देणूताई काही वस्तू घेण्यासाठी तेथे आली असता श्रीसमर्थ श्रीमारुतीरायांच्या रूपाने जेवत असलेले पाहून त्यानाही त्या योगे श्रीमारुतीरायांचे दर्शन घडले.

श्री शिवाजी राजांना श्रीमारुती दर्शन :- श्री शिवाजी महाराज एकदा पन्हाळगडावर असता तेथे कीर्तने चालू होती. ह्या कीर्तनात श्री समर्थ उपस्थित असते तर बरे झाले असते. असा विचार त्यांच्या मनात आला. हा विचार पूर्ण होतो न होतो तोच श्रीसमयं तेथे प्रगट झाले. कीर्तन संपल्यावर श्रीसमर्थ जावयास

निघाले त्यावेळी श्री शिवाजी महाराजांनी इतक्या रात्री आपण कोठे जाणार असा प्रश्न पहा असे म्हणून एक करता क्षणीच हे पाय पन्हाळघावर तर एक पाय सज्जनगडावर असे श्रीसमर्थांनी स्वरूप धारण केल्याचे श्री शिवाजी महाराजांस दिसले.

॥ जय जय रघुवीर समर्थ ॥

home-last-sec-img